पोस्ट विवरण
सुने
रोग
तरबूज
कीट
कृषी ज्ञान
DeHaat Channel
14 Feb
Follow

कलिंगडामधील प्रमुख रोग व त्यांचे व्यवस्थापन (Major diseases and their management in Watermelon)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात कलिंगडाची लागवड अंदाजे 660 हेक्टर क्षेत्रावर केली जाते. कलिंगडाचे पीक हे उन्हाळी हंगामात नदीच्या पात्रात तसेच बागायती पीक म्हणून घेतले जाते. या पिकाची लागवड जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात केली जाते. तसेच मध्यम काळी पाण्याची निचरा होणारी जमीन या पिकास योग्य असते. या पिकांकरता जमिनीचा सामू 5.5 ते 7 योग्य असतो. या पिकासाठी उष्ण व कोरडे हवामान आणि भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असतो. योग्य हवामान, जमीन न मिळाल्यास कलिंगडाच्या पिकामध्ये विविध प्रकारचे रोग आढळून येतात. कलिंगड हे पिक कीड व रोगास फारच संवेदनशील आहे. कलिंगडावरील रोगांच्या प्रादुर्भावामुळे वेलींची वाढ होत नाही. रोगांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण कलिंगडाच्या पिकातील प्रमुख रोगांविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.

कलिंगडाच्या पिकावर आढळणारे प्रमुख रोग (Major Diseases of Watermelon:

  1. कलिंगडावरील मोझॅक व्हायरस (Watermelon Mosaic virus)

मोझॅक विषाणूचे मुख्यतः मावा किंवा व्यक्ति अथवा शेतीतील अवजारे अशा विविध प्रकारांनी वहन होते तसेच मोझॅक व्हायरसचा प्रसार आणि संसर्ग बियाण्यांद्वारे देखील होतो. मावा संपर्कानंतर काही तासातच अविरतपणे या रोगाचा प्रसार करतात.

लक्षणे (Symptoms):

  • मोझॅक प्रथम सर्वात लहान पानांवर दिसतो.
  • पीक, संक्रमणाची वेळ आणि हवामान परिस्थिती याप्रमाणे लक्षणे बदलतात.
  • एकुणच पानांवर ठिगळासारखे किंवा विखुरलेले उंचवटलेले ठिपके, मस्से येतात आणि विविध पद्धतीने पाने विकृत होतात.
  • फळांवरील रंग समान नसतो हे आणखी एक लक्षण आहे.
  • गडद हिरवे डाग किंवा फळांच्या एरवी पिवळसर असलेल्या पृष्ठभागावर धब्बे येतात.
  • पानावरील उंचवटलेले ठिपके कालांतराने करपट डागात रूपांतरित होतात.
  • पानांना नुकसान झाल्याने, या विषाणूच्या संक्रमणाबरोबर वाढीचा दर आणि उत्पादन देखील कमी होते.

उपाय (Remedy):

  • या रोगाच्या लक्षणांकरीता तसेच माव्यांच्या उपस्थितीकरीता शेताचे नियमित निरीक्षण करा.
  • यजमान नसलेल्या पिकांबरोबर पीक फेरपालट केल्यास विषाणूंना टाळण्यात मदत होईल.
  • आधीच्या पिकाचे अवशेष काढुन टाका.
  • मित्र किड्यांना नुकसान होऊ नये म्हणुन कीटनाशकांचा वापर सीमित ठेवा.
  • मुंग्यांच्या संख्येचे चिकट पट्ट्या लाऊन नियंत्रण करा.
  • जमिनीवर प्लास्टिक अच्छादन वापरून माव्यांना पळवुन लावुन रोगामुळे होणारे नुकसान कमी करा.
  • प्रत्येक ओळीत पडदे बांधल्यास माव्यांचा प्रतिबंध होईल.
  • थायामेथोक्सम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) ची 50-60 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून 15 दिवसांच्या अंतराने प्रति एकर फवारणी करावी किंवा
  • फिप्रोनिल 5% एससी (धानुका-फॅक्स) - 400 मिली प्रति एकर किंवा
  • जिओलाइफ नो व्हायरस 400 मिली प्रति एकर किंवा
  • फिप्रोनिल 40% + इमिडाक्लोप्रिड 40% डब्ल्यूजी (घरडा - पोलीस) 100 ग्रॅम प्रति एकर

  1. कलिंगडावरील भुरी रोग (Watermelon Powdery Mildew) :

कलिंगडामध्ये स्फिरोथीका फुलीजीना बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्यास या बुरशीमुळे पाने भुरकट पडतात.

लक्षणे (Symptoms):

  • रोगाची सुरवात प्रथम जुन्या पानांपासून होते.
  • पानांच्या दोन्ही पृष्ठभागांवर पिठासारखी पांढरी बुरशी वाढते.
  • प्रादुर्भाव झालेली पाने पिवळी पडून करपतात आणि वेली वाळतात.
  • हा रोग देठ, खोड आणि फळांवरही पसरतो. यामुळे वेलींची वाढ खुंटते.
  • रोगाचे प्रमाण वाढल्यावर पाने पिवळी पडून गळतात.

उपाय (Remedy) :

  • भुरी रोगाची लक्षणे दिसताच, फवारणी प्रतिलिटर पाणी
  • अ‍ॅपेलोमायसेस क्विस्क्वालिस (कात्यायनी-अ‍ॅपेलोमायसेस) 1 लिटर प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन 10 ते 15 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा पिकात एकरी फवारणी करावी किंवा
  • मायक्लोब्यूटानिल 10% डब्ल्यू (इंडोफील-बून) 100 ग्रॅम किंवा झिनेब 68% + हेक्साकोनॅझोल 4% डब्ल्यू (इंडोफील-अवतार) 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी याप्रमाणे घेऊन एकरी फवारणी करावी.
  • अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेबुकोनाझोल 18.3% एससी (देहात-ॲझिटॉप) - 300 मिली/एकर किंवा
  • अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) - 200 मिली प्रति एकर फवारणी करावी.
  • पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 8-10 दिवसांच्या अंतराने बुरशीनाशक बदलून करावी.

  1. कलिंगडावरील काळा करपा (Watermelon Anthracnose):

या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने जादा आर्द्रता किंवा पावसामुळे होतो. तसेच, रोगाचा प्रसार प्रथम प्रादुर्भाव रोगग्रस्त अवशेष आणि बियाण्यांमार्फत होतो.

लक्षणे (Symptoms):

  • बहुतांश वेलवर्गीय भाज्यांमध्ये पानावर पानथळ, लहान, पिवळसर आणि नंतर तपकिरी ठिपके पडतात.
  • रोगग्रस्त पाने करपतात.
  • पानांचे देठ आणि वेलीवर रोगाचे ठिपके पडून पाने व वेली सुकून वाळतात.
  • कलिंगडाच्या पानावर ओलसर तपकिरी - काळ्या रंगाचे ठिपके पडतात.
  • कलिंगडाच्या फळांवर खोलगट आणि काळ्या कडा असलेले खडबडीत ठिपके पडतात.
  • ढगाळ हवामानात या ठिपक्यांवर गुलाबी बुरशीची वाढ होते. तसेच लालसर डिंकासारखा द्रव पाझरताना दिसतो.

उपाय (Remedy):

  • पिकाची फेरपालट करावी.
  • रोगविरहित फळांचे बी वापरावे.
  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
  • पिकाची लागवड मंडप अथवा ताटी पद्धतीने करावी.
  • वेलीचा संपर्क जमिनीशी येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने, फळे काढून नष्ट करावी.

बीजप्रक्रिया:

  • कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 2.5 ते 5 ग्रॅम प्रतिकिलोने बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • रोगाची लक्षणे दिसताच किंवा लागवडीनंतर 45 दिवसांनी,
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 400 ग्रॅम प्रति एकर 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
  • अँथ्रकनोज नियंत्रणासाठी अझॉक्सीस्ट्रोबिन 11% + टेब्युकोनाझोल 18.3% एससी (देहात-Azytop) 300 मिलीची 200 लिटर पाण्यातून फवारणी केल्यास पिकाला रोगापासून वाचविता येऊ शकते.

  1. कलिंगडावरील केवडा (Watermelon Downy Mildew):

लक्षणे (Symptoms) :

  • सुरवातीला पानाच्या वरच्या वाजूला फिक्कट हिरवट-पिवळसर रंगाचे ठिपके दिसतात.
  • ढगाळ वातावरणात या ठिपक्यांच्या खालील बाजूला जांभळट रंगाच्या बुरशीची वाढ झालेली दिसते. नंतर हेच जांभळट डाग पांढरे-काळे किंवा राखाडी होतात.
  • विशेषतः पूर्ण वाढ झालेल्या पानांवर रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो.
  • तीव्र प्रादुर्भावामध्ये पानाचे देठ, बाळ्या, फांद्यावरही आढळतो. प्रादुर्भाव झालेली पाने करपतात व गळून पडतात.
  • रोगग्रस्त वेलींना फुले-फळे कमी प्रमाणात व लहान आकाराची लागतात. त्यांचा दर्जा कमी आणि बेचव असतो.
  • वेली लवकर सुकतात. परिणामी उत्पादनात मोठी घट होते.

उपाय (Remedy) :

  • जमीन उत्तम निचरा होणारी असावी.
  • योग्य अंतरावर पिकाची लागवड करावी.
  • रोगप्रतिकारक जातींचा उपयोग करावा.

बीज प्रक्रिया:

  • मेटॅलॅक्झिल 35% डब्ल्यूएस (मॅट्रिक्स) ने 6 ते 7 ग्रॅम प्रति किलो बियाण्याची प्रक्रिया करावी.
  • पिकाची लागवड ताटी किंवा मंडप पद्धतीने करावी.
  • खेळती हवा, भरपूर सूर्यप्रकाश यामुळे रोगाचे प्रमाण कमी राहते.
  • रोगांची लक्षणे दिसताच रोगग्रस्त पाने काढून नष्ट करावीत.

प्रतिबंधात्मक उपाय (Remedy) :

  • अझॉक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनोकोनाझोल 11.4% एससी (देहात-सिमपेक्ट) 200 मिली 200 लिटर पाणी फवारणी करावी किंवा
  • क्लोरोथालोनिल 75% डब्ल्यू पी (सिजेंटा-कवच) 400 ग्रॅम किंवा
  • मॅन्कोझेब 75% डब्ल्यूपी (देहात DEM-45) 500 ग्रॅम किंवा
  • कॉपर ऑक्झिक्लोराईड (क्रिस्टल-ब्लू कॉपर) 500 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी - उगवण झाल्यानंतर 20 दिवसांनी फवारणी करावी.

नियंत्रणात्मक उपाय:

  • रोगाचा प्रादुर्भाव दिसताच, मेटॅलॅक्सिल 4.0 % + मॅन्कोझेब 64 % डब्ल्यू/डब्ल्यू (सिजेंटा-रिडोमिल गोल्ड) 400 ग्रॅम प्रति 200 लिटर पाण्यातून फवारावे.
  • पुढील फवारणी आवश्यकतेनुसार 10 दिवसांच्या अंतराने घ्यावी.

  1. कलिंगडावरील मर रोग (Watermelon Fusarium Wilt):

कलिंगड पिकामध्ये मर रोगाची जास्त समस्या येते. हा बुरशीमुळे होणारा रोग असून पिक फुलावर असताना या रोगाचा प्रादुर्भाव होतो.

लक्षणे (Symptoms) :

  • पाने पिवळी पडतात.
  • फुल गळ होऊन वेल निस्तेज दिसतात व कालांतराने मरते.

उपाय (Remedy) :

  • पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे.
  • तसेच लागवडी नंतर प्रत्येकी 20, 40 व 60 दिवसांच्या अंतराने जैविक स्लरी करून ट्रायकोडर्मा 1 किलो व सुडोमोनास 1 किलो एकत्र करून एकरी द्यावे.
  • स्लरी बनविण्यासाठी गोमूत्र, दही किंवा ताक, गुळ यासारखे घटक वापरावे.
  • कासुगामाइसिन 3% एसएल (कासू बी-धानुका) 400 मिली किंवा
  • व्हॅलिडामायसिन 3% एल (जेयू-वॅल्यू) 400 मिलीने प्रति एकर ट्रेंचिंग करावे.

तुम्ही तुमच्या कलिंगड पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1) कलिंगड पिकाचा मुख्य हंगाम?

कलिंगड फळांचा मुख्य हंगाम उन्हाळयात असतो.

2) कलिंगड पिकाच्या लागवडीसाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या?

जमिनीची मशागत, लागवडीचे अंतर, बियाणे, खत, पाणी, कीड रोग नियोजन

3) कलिंगड पिकातील मुख्य कीटक?

मावा, थ्रीप्स, तुडतुडे, नागअळी हे कलिंगड पिकात प्रामुख्याने आढळून कीटक आहेत.

40 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ