पोस्ट विवरण
सुने
पशुपालन ज्ञान
पशु ज्ञान
2 year
Follow

प्राण्यांच्या आहारात 'अ' जीवनसत्वाची आवश्यकता

नमस्कार मंडळी,

प्राण्यांमध्ये प्रकर्षाने जाणवणाऱ्या जीवनसत्व 'अ' च्या आवश्यकतेविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. मंडळी, जीवनसत्व 'अ' हे चरबी-विरघळवण्यात उपयुक्त आहे, जे सहसा जास्त चरबीयुक्त पदार्थांमध्ये आढळते. हे एक अँटिऑक्सिडंट आहे जे प्राण्यांचा शारीरिक विकास, रोगाप्रति प्रतिकारशक्ती सुधारणे अशा अनेक प्रक्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. प्राण्यांच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी आणि आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे. जनावरांची त्वचा मऊ आणि केस चमकदार ठेवण्यासाठी जीवनस्तव 'अ' उपयुक्त व महत्वाचे आहे. एक उत्कृष्ट अँटिऑक्सिडेंट असल्याने, ते प्राण्यांच्या शरीराचे फ्री रॅडिकल्सच्या नुकसानापासून संरक्षण करते.

आता जाणून घेऊया प्राण्यांना आहारातील ‘अ’ जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते याविषयीची माहिती.

  • 'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांची दृष्टी कमकुवत होऊ शकते.

  • त्यांना रातांधळेपणासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.

  • 'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये रोग होण्याची शक्यता वाढते.

  • प्राण्यांच्या केसांशी संबंधित समस्या वाढतात.

  • प्राण्यांना त्वचेचे आजार होऊ शकतात.

  • प्राण्यांच्या श्वसनमार्गामध्ये संसर्ग होण्याचा धोका वाढतो.

  • प्राण्यांची प्रजनन क्षमता कमी होऊ शकते.

  • गर्भाचा योग्य विकास होत नाही.

  • 'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांमध्ये गर्भपात होण्याचा धोका असतो.

'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे येणाऱ्या समस्यांविषयी तर आपण जाणून घेतलं. आता जाणून घेऊया ही 'अ' जीवनसत्वाची कमतरता कशी दूर करावी याविषयीची माहिती. तर मित्रहो, जनावरांना 'अ' जीवनसत्वाने समृद्ध आहार द्या. जनावरांच्या आहारात हिरवे गवत, हिरवा चारा इत्यादींचा समावेश करा. प्राण्यांच्या शरीरातील ‘अ’ जीवनसत्त्वाची कमतरता दूर करण्यासाठी ‘देहात दूध प्लस’चा आहारात समावेश करा. तसेच गाय आणि म्हशीच्या आहारात दररोज 50 ग्रॅम दुधाचा समावेश करा आणि वासरे, मेंढ्या आणि शेळ्यांना दररोज 20 ग्रॅम दूध देणे विसरू नका. यासंबंधीच्या अधिक माहितीसाठी, तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून पशुवैद्यांचा मोफत सल्ला देखील मिळवू शकता.

  • देहात दूध प्लसमध्ये असलेल्या पोषक तत्वांविषयीची आणि त्याच्या सेवनाच्या फायद्यांविषयीची माहिती इथून https://dehaat-kisan.app.link/LveKs8XMgAb मिळवा.

  • तुमच्या जनावरांमध्ये जीवनस्तव 'अ' च्या कमतरतेची लक्षणे दिसत आहेत का? 'अ' जीवनसत्वाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही जनावरांना काय खायला घालता? याबाबतचे आपले अनुभव इतर पशु पालकांसह कमेंट्सद्वारे शेयर करा.

  • पशुपालनाशी संबंधित इतर रंजक आणि महत्वपूर्ण माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा.

Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ