रेटीकुलम हर्निया : रवंथ करणाऱ्या जनावरांसाठी घातक

गाई, म्हशीमध्ये रेटीकुलम हर्निया हा आजार दिसून येतो. या आजाराचे प्रमाण म्हशींमध्ये जास्त प्रमाणात दिसते. या आजाराचे कारण म्हणजे रवंथ करणारे जनावर अधाशासारखे प्रथम चारा खाते, त्यावर कोणतीच चघळण्याची प्रक्रिया न करता गिळून टाकते. सदर प्रक्रिया ही चरत असताना होत असते. विश्रांतीच्या वेळी जनावरे खाल्लेला चारा परत तोंडात घेऊन चघळतात. चरताना जेव्हा एखादी एखादी अखाद्य वस्तू जसे की सुई, तार, खिळा शरीरात जातो, तेव्हा रेटीकुलम हर्निया या आजाराची सुरवात होते. या आजाराने बाधित जनावरे प्रथमतः चारा खाणे, पाणी पिणे बंद करतात, दुधाळ जनावर दूध देणे बंद करतात. या आजाराच्या उपचारासाठी तातडीने पशुचिकित्साकडे जाऊन उपचार करावेत.
तुमच्या जनावरांमध्ये अशी कोणती लक्षणे दिसत आहेत का? आजच रक्त तपासणी आणि क्ष किरण तपासणी करून घ्या तसेच तुमच्या जनावरांना काय त्रास होत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे कळवा. याशिवाय, तुम्ही येथे दिलेल्या https://www.dehaat.online/cattle-feed/ लिंकवर क्लिक करून, वेळेचा स्लॉट निवडू शकता आणि व्हिडिओ कॉलद्वारे पशुवैद्यकांना विनामूल्य प्रश्न देखील विचारू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
