सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
21 Jan
Follow
८७० ग्रामपंचायतींमध्ये डिजिटल इंडिया सेवा केंद्र

जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत एक डिजिटल इंडिया सेवा केंद्र बनविण्यात येणार आहे. ८७० ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात एक अत्याधुनिक असे सेवा केंद्र बनविण्यात येणार आहे. केंद्रशासनाच्या इलेक्ट्रॉनिक व सूचना प्रौद्योगिकी मंत्रालयाच्या वतीने डिजिटल इंडिया आपले सेवा केंद्र (DICSC- Digital India Common Service Centre) हा नवीन पथदर्शी प्रकल्प राज्यातून एकमेव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती मोबाइल व्हॅनला बुधवारी (ता. १५) जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले.
40 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
