आंबा, काजू पीकविमा परतावा २८ ऑगस्टपूर्वी द्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना २८ ऑगस्टपूर्वी विमा परतावा देण्यात यावा अन्यथा २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेने कृषी विभागाला दिला आहे. हवामानावर आधारित फळपिक विमा योजना गेल्या काही वर्षापासून राबविण्यात येत आहे. कोकणातील आंबा आणि काजू या दोन पिकांचा या योजनेत समावेश आहे. या वर्षी जिल्ह्यातील ४२ हजार १९० शेतकऱ्यांनी १९ हजार ९११ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले. यामधील १४ हजार ६६८ हेक्टर क्षेत्र आंबा पिकाखाली असून ५ हजार २४३ हेक्टर क्षेत्र काजू पिकाखालील आहे. शेतकऱ्यांनी हे क्षेत्र संरक्षित करण्यासाठी १२ कोटी ८५ लाख रुपये स्वहिस्सा विमा कंपनीकडे भरला आहे. या वर्षी सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमानवाढ यांसारख्या कारणामुळे जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांचे नुकसान झाले असून अनेक मंडळातील शेतकऱ्यांना विमा परतावा मिळण्याचा अंदाज आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ