सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
आंदोलन कृषी अधिकाऱ्यांचे; हाल शेतकऱ्यांचे, पीएम किसानचे काम ठप्प झाल्याने अनुदानाची प्रतिक्षा

पीएम किसानच्या कामाचा भार कृषी विभागाकडे देण्यात आला आहे. दरम्यान या विभागात पुरेसे मनुष्यबळ नसल्याने असहकार आंदोलन पुकारण्यात आले आहे. यामुळे 'पीएम किसान'चे कामकाज ठप्प झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात २० हजार शेतकरी लाभार्थ्यांचे कामकाज प्रलंबित असून, त्यांना लाभाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या योजनेसाठी मनुष्यबळ पुरविण्याचा प्रस्ताव शासन दरबारी आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केले आहे. परिणामी या योजनेचे काम राज्यभर १५ दिवसांपासून ठप्प आहे. याचा फटका मात्र शेतकऱ्यांना बसत आहे.
45 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
