पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

आंतरपीक म्हणून तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

तूर उत्पादकांना शासनाच्या किमान हमी दरानुसार खरेदी केंद्रावर तुरीची विक्री करण्यासाठी पेऱ्याची अडचण येत होती. या बाबत राज्याच्या पणन विभागाने शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा दिला आहे. सोयाबीन, उडीद, मूग या पिकासोबत तुरीचा पेरा नोंदलेल्यांना या पिकाचे संपूर्ण क्षेत्र तर कपाशी सोबत तुरीचा पेरा नोंदलेल्यांना या पिकाच्या अर्धे क्षेत्र तूर नोंदणीसाठी ग्राह्य धरण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे केवळ आंतरपीक म्हणून तुरीची नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.


65 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ