द्राक्ष बागेत ऑक्टोबर महिन्यात करावयाची कामे (Activities to be done in the Grape crop in October)

नमस्कार मंडळी,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
द्राक्ष हे महत्त्वाचे निर्यातक्षम; परंतु अल्पकाल टिकणारे फळ आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात द्राक्ष लागवडीखालील क्षेत्र सर्वात जास्त आहे. महाराष्ट्रात नाशिक येथे द्राक्षांची लागवड फारच मोठया प्रमाणावर होते त्याचबरोबर, पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या ठिकाणीही द्राक्षांची लागवड केली जाते. आजच्या लेखात आपण द्राक्ष बागेत ऑक्टोबर महिन्यात कोणती कामे करायची याविषयीची माहिती जाणून घेऊया.
फळ छाटणीपूर्वी पानगळ करणे:
फळ छाटणीनंतर काडीवरील डोळे लवकर व एकसारखे फुटण्यासाठी साधारणपणे 12 ते 15 दिवस छाटणी अगोदर इथेफॉन 39% एसएल (हायफिल्ड-एजी) ची फवारणी घ्यावी. फवारणी पूर्वी द्राक्ष वेलीला पाण्याचा हलकासा ताण देणे गरजेचे असते. जमीन वापशात ठेवावी जास्त ओलावा असल्यास पानगळीचे परिणाम दिसत नाहीत. इथेफॉन 2.5 ते 3 मिली + 0:52:34 (देहात- न्यूट्री एमकेपी) या विद्राव्य खताची 5 ग्राम प्रती लिटर याप्रमाणे फवारणी करावी. वेलीवर फवारणी करताना कव्हरेज चांगले झाले पाहिजे. एकरी पाचशे लिटर पाणी फवारणीसाठी वापरावे. 10 ते 12 दिवसात पूर्ण पानगळ होते यावेळी वेलीमधील इथिलीन चे प्रमाण वाढत जाते व ऑकझिन्सचे प्रमाण कमी होत जाते तसेच पानातील अन्नद्रव्यांचे देठाद्वारे वहन होऊन काडी व डोळ्यामध्ये साठते. पानगळ केल्याने काडीवरील सर्व डोळ्यांना सूर्य प्रकाश मिळून त्याचा डोळे एकसारखे व लवकर फुटण्यास फायदा होतो.
प्रयोग शाळेत काडी तपासणी करणे:
फळ छाटणी पूर्वी प्रतिनिधिक स्वरुपात बागेतील काड्या तपासणी साठी काढून प्रयोगशाळेत पाठवून काडीवरील डोळे तपासणी करावी. काडी तपासणी रिपोर्ट नुसार कोणत्या डोळ्यामध्ये सशक्त चांगली घड निर्मिती झाली आहे ते पाहावे त्यामुळे बाग फेल जाण्याची शक्यता राहत नाही. त्यानुसार फळ छाटणी करावी. सर्व साधारणपणे सबकेन च्या पुढे एक दोन डोळे राखून छाटणी करावी.
हायड्रोजन सायनामाईडचा वापर:
छाटणी नंतर बाग एकसारखी फुटून येण्यासाठी हायड्रोजन सायनामाईड 50% एसएल (हायफिल्ड-एजी:डोमेट)चा वापर करावा. काडीवरील डोळ्यांना पेस्ट लावताना सबकेन च्या मागील तीन व पुढील दोन डोळ्यांना पेस्ट लावावी. जेणेकरून सदर डोळ्यामधून चांगले घड मिळण्याची खात्री राहते तसेच इतर डोळ्यामधील अनावश्यक फुटीची वाढ रोखता येते. फळ छाटणी वेळी वेलीवर प्रती स्क्वेअर फुटास एक अथवा दीड काडी ठेवावी.
बोर्डो मिश्रणाची फवारणी:
फळ छाटणी नंतर वेलीवर सुप्त अवस्थेत असणाऱ्या डाऊनी, भुरी, करपा रोगाच्या स्पोअर्सच्या नियंत्रणासाठी बोर्डो 1% ची फवारणी करावी. फवारणी करताना संपूर्ण वेल, जमिनीवरील काड्या व पानगळ झालेल्या ठिकाणी फवारणी करावी त्यमुळे काडीवरील निघणाऱ्या नवीन फुटीवर डाऊनी, भुरी, करपा रोगाचा प्रादुर्भाव लवकर होणार नाही.
कीड नियंत्रण:
फळ छाटणी नंतर 4 ते 5 दिवसांनी उडदया किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यू जी (देहात-कॉन्ट्रोपेस्ट) या किडनाशकाची 0.5 मिली प्रती लिटर प्रमाणे फवारणी घ्यावी. सध्या ऑक्टोबर हिट असल्याने तापमानात वाढ होत आहे तसेच यावर्षी पाऊस कमी झाल्याने वेलीवर सुप्त अवस्थेत पाण्याचा ताण देखील दिसून येत असल्याने यावर्षी मिलीबग चा प्रादुर्भाव वाढणार आहे त्यासाठी सुरुवातीपासून खोडे व ओलांडे बुप्रोफेझीन 25% एससी (इंडोक्रॉप सॉल्युशन-बुप्रोब्लास्ट) या कीड नाशकाने फवारणी करून धुवून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
खत व्यवस्थापन:
फळ छाटणी अगोदर बागेतील माती तपासणी करून घ्यावी. माती परिक्षण अहवालानुसार फळ छाटणी नंतर बागेस खते द्यावीत. फळ छाटणी नंतर सुरुवातीला 13:0:45 (देहात- न्यूट्री KNO3) हे विद्राव्य खत ड्रीप द्वारे एक किलो प्रती एकर याप्रमाणे द्यावे.
तुम्ही तुमच्या द्राक्ष पिकात ऑक्टोबर महिन्यात कोणती कामे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. द्राक्ष वेलीला लागणारे प्रमुख रोग कोणते?
भुरी, करपा आणि केवडा हे द्राक्ष पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.
2. द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी योग्य हवामान कोणते?
द्राक्ष पिकाच्या योग्य शाखीय वाढीसाठी उष्ण व कोरडे वातावरण उपयुक्त ठरते.
3. महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड कुठे होते?
महाराष्ट्रात सर्वाधिक द्राक्ष लागवड नाशिक जिल्ह्यात होते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
