पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
20 Mar
Follow

शेळी पालनातील अर्ध बंदिस्त पद्धतीचे फायदे! (Advantages of the Semi-confined goat keeping system in Goat farming!)


नमस्कार पशुपालकांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

शेळीपालन हा शेती पूरक व्यवसाय असून कमी भांडवल व कमी जागेत हा व्यवसाय करता येण्यासारखा आहे. ज्यांना इतर जनावरांपेक्षा जसे की गाय, म्हैस या जनावरांपेक्षा खूप कमी प्रमाणात खाद्य लागते. जर आपण विचार केला तर एका गाईला लागणाऱ्या खाद्यामध्ये दहा शेळ्या जगू शकतात. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय अत्यंत फायदेशीर आहे. शेळीपालन व्यवसाय वेगवेगळ्या पद्धतींनी करता येतो. प्रत्येक पद्धतीमध्ये वेगवेगळ्या सोयीस्कर गोष्टी व अडचणी असतात. शेळीपालनासाठी आपल्याकडील उपलब्ध गोष्टी व त्यानुसार गोठ्याची रचना व पद्धतीचा अवलंब करावा. शेळीपालन व्यवसाय पूर्ण बंदिस्त पद्धत, अर्ध बंदिस्त पद्धत आणि परंपराग चराऊ पद्धत अशा तीन पद्धतींनी केला जातो. आजच्या आपल्या या भागात आपण त्यातीलच एका म्हणजे अर्ध बंदिस्त पद्धतीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

अर्ध बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय?

अर्ध बंदिस्त किंवा मिश्र व्यवस्थापन पध्दतीमध्ये मर्यादित स्वरुपात मुक्त आणि बंदिस्त पध्दतीचा समावेश केला जातो. परंतु, मुळ ठिकाणापासून शेळ्यांचे कळपाचे स्थलांतर केले जात नाही. शेळ्या एकाच ठिकाणी ठेऊन त्यांचे संगोपन केले जाते.

अर्ध बंदिस्त किंवा मिश्र व्यवस्थापन पद्धत:

  • शेळ्या मित्र कळपामध्ये जोपासल्या जातात. तसेच कळपाचे आकारमान ५० पेक्षा अधिक नसते.
  • शेळ्यांचे कळप, नैसर्गिक कुरण, शेतातील बांधावर, धान्य पिकाची काढणी केलेल्या क्षेत्रावर तसेच झाड पाल्यावर दैनंदिन ६ ते ८ तास चारल्या जातात.
  • परंतु, फक्त नैसर्गिक चाऱ्यावर शेळ्यांच्या अन्नद्रव्याची गरज पूर्ण होऊ शकत नाही. त्याकरिता रात्रीच्या वेळी गोठ्यात हिरवी वैरण, कोरडा चारा तसेच खुराक गरजेनुसार दिला जातो. पिण्याच्या पाण्याची, क्षार चाटणाची गोठ्यात सोय केली जाते.
  • गाभण दुभत्या शेळ्या आणि वाढत्या वयातील करडांची विशेष काळजी घेतली जाते.

अर्ध बंदिस्त शेळीपालनाचे फायदे:

  • अर्ध बंदिस्त शेळीपालन पद्धतीमध्ये खाद्यावरील खर्च काही प्रमाणात कमी करता येतो.
  • बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत होऊन, विविध प्रकारचा चारा शेळ्यांच्या पोटात जातो.
  • गोठ्यातील एकूणच खर्चावर नियंत्रण ठेवता येते.
  • शेळ्यांचा चांगला व्यायाम होऊन, आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

अर्धबंदिस्त शेळीपालनाचे तोटे:

  • चरत असताना, निरोगी शेळ्या रोगाने बाधित इतर शेळ्यांच्या संपर्कात आल्याने रोगाचा प्रादुर्भाव होतो.
  • शेळ्यांनी खाल्लेल्या एकूण आहाराचे मोजमाप करता येत नाही.
  • पुर्णपणे मोकाट किंवा अर्धबंदिस्त पद्धतीने शेळी पालन करण्यासाठी कुरणांची, चराऊ क्षेत्राची गरज असते.
  • सध्या कुरणांचे कमी होत चालले क्षेत्र ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पुढील काळाचा विचार करता बंदिस्त शेळीपालन पद्धतच अधिक व्यवहार्य ठरणार आहे.

तुम्ही तुमच्या शेळी पालन व्यवसायासाठी कोणत्या प्रकारच्या पद्धतीचा अवलंब करता व त्यासाठी काय काय उपाययोजना करता? हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. शेळी पालन व्यवसायाचे किती प्रकार आहेत?

शेळी पालन व्यवसायाचे एकूण तीन प्रकार आहेत. पूर्ण बंदिस्त पद्धत, अर्ध बंदिस्त पद्धत आणि परंपराग चराऊ पद्धत अशा तीन पद्धतींनी शेळी पालन व्यवसाय केला जातो.

2. अर्ध बंदिस्त शेळीपालन म्हणजे काय?

अर्ध बंदिस्त किंवा मिश्र व्यवस्थापन पध्दतीमध्ये मर्यादित स्वरुपात मुक्त आणि बंदिस्त पध्दतीचा समावेश केला जातो. परंतु, मुळ ठिकाणापासून शेळ्यांचे कळपाचे स्थलांतर केले जात नाही. शेळ्या एकाच ठिकाणी ठेऊन त्यांचे संगोपन केले जाते.

3. अर्ध बंदिस्त शेळी पालन पद्धतीचा फायदा?

अर्ध बंदिस्त शेळी पालन पद्धतीमध्ये शेळ्यांना बाहेरचा झाडपाला खाल्ल्यामुळे खाण्याच्या खर्चात बचत होऊन, विविध प्रकारचा चारा शेळ्यांच्या पोटात जातो.

35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ