पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशुपालन ज्ञान
पशुसंवर्धन
DeHaat Channel
26 Feb
Follow

जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीन विषबाधा (Aflatoxin poisoning in animals)


जनावरांमध्ये अफ्लाटॉक्सीन विषबाधा (Aflatoxin poisoning in animals)

अफ्लाटॉक्सीन हा दुय्यम पदार्थ असून तो ॲस्परागस फ्लावस आणि ॲस्परागस परासायटीकास या बुरशीपासून तयार होतो. जेव्हा वातावरणातील आद्रता 15 टक्के आणि तापमान 25 ते 32 अंश सेल्सिअस असते, तेव्हा धान्यामध्ये तयार झालेले अफ्लाटॉक्सीन जास्त काळ राहते. या बुरशीची वाढ पीक शेतात असताना, धान्य तयार करताना किंवा धान्याची अयोग्य साठवण केल्यास होते.

उपाययोजना:

  • बुरशीयुक्त चारा, पशू खाद्य जनावरांना खाऊ घालणे बंद करावे.
  • धान्य खरेदी करताना ते बुरशीयुक्त नाही याची खात्री करावी.
  • पिकाची कापणी, मळणी करतानाच बुरशीयुक्त चारा वेगळा करून ठेवावा.
  • पशुखाद्याची साठवण ओलसर ठिकाणी करू नये.
  • बाधित जनावरांना जादा प्रोटीनयुक्त पशू खाद्य द्यावे.
  • बाधित जनावरांना जीवनसत्त्व ई, सेलेनीयमचा पुरवठा करावा.

तुम्हाला अफ्लाटॉक्सीन विषबाधेबद्दल माहिती आहे का? तुम्ही या विषबाधेपासून तुमच्या जनावराचे संरक्षण कसे करता? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच अशाप्रकारच्या अजून माहितीसाठी "पशुसंवर्धन" चॅनेलला फॉलो करायला विसरू नका.

43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ