पोस्ट विवरण
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजना, महाराष्ट्र (Agricultural Mechanization (SMAM) Scheme, Maharashtra)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
अवजारांच्या खरेदीसाठी 80 टक्क्यांपर्यंत अनुदान दिल्या जाणाऱ्या विशेष कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेविषयीची माहिती आपण जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा शेती हा पारंपारिक तसेच प्रमुख व्यवसाय आहे. आर्थिक परिस्थिती कमजोर असल्याने बहुतांश शेतकरी शेतीसाठी उपयुक्त अशी अवजारे खरेदी करण्यासाठी असमर्थ असतात. राज्यातील शेतकऱ्याच्या या सर्व समस्यांचा विचार करून शेती क्षेत्रात आधुनिक यंत्र सामग्रींचा वापर वाढावा तसेच शेती कार्य जलद गतीने व्हावे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी या उद्देशाने राज्य शासनाद्वारे राज्यात कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्यात आली आहे.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेचा उद्देश:
- कृषी यांत्रिकीकरण (SMAM) या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून वेळेची बचत होईल आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
- कृषी क्षेत्रात शेती उपकरणांचा वापर करणे सुलभ व्हावे.
- कृषी यांत्रिकरणाला प्राधान्य देणे.
- शेती कार्य जलद गतीने व्हावे व शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ व्हावी.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेची वैशिष्ट्ये:
- या योजनेअंतर्गत खूप साऱ्या कृषी उपकरणांवर अनुदान दिले जाते. जेणेकरून शेतकरी शेती उपयुक्त उपकरणे खरेदी करू शकतील व शेती कार्य जलद गतीने करू शकतील व स्वतःच्या आर्थिक उत्पन्नात वाढ करू शकतील.
- कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदान राशी लाभार्थी शेतकऱ्याच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- राज्यातल्या सर्व जाती धर्मातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- कृषी यांत्रिकीकरण योजना ही केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग आणि राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग आहे.
- योजनेअंतर्गत अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहित धरण्यात येत नाही.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे:
- ट्रॅक्टर, पॉवर टीलर
- स्वयंचलित अवजारे: रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड)
- ट्रॅक्टर चलीत अवजारे: रोटाव्हेटर, पीटीओ ऑपरेटेड वीडर, रेज्ड बेड प्लांटर, पल्टी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र (थ्रेशर/मल्टी क्रॉप थ्रेशर), कॉटन श्रेडर, ट्रॅक्टर माउन्टेड स्प्रेयर
- काढणी पश्चात वापरायची उपकरणे: मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राईंडर पल्व्हराइजर/पॉलीशर, क्लिनर कम ग्रेडर
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान:
- अल्प व अत्यल्प भुधारक, अनुसूचित जाती/जमाती आणि महिला शेतकरी : 50 टक्के अनुदान
- इतर शेतकरी : 40 टक्के अनुदान
- राईस मिल, दाल मिल, पैकिंग मशीन, ग्राईंडर/पल्वरायजर/पॉलीशर च्या बाबतीत अल्प/अत्यल्प/महिला/वृद्ध : 60 टक्के अनुदान
- इतर लाभार्थी : 50 टक्के अनुदान
- शेतकरी उत्पादक कंपनी आणि शेतकरी गट यांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी : 60 टक्के अनुदान (24 लाख रु. पर्यंत अनुदान)
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेअंतर्गत आरक्षण:
महिलांसाठी : 30 टक्के निधी
दिव्यांग व्यक्ती : 3 टक्के निधी
जर महिला व दिव्यांगांसाठी अर्ज आले नाहीत तर सदर निधी इतर शेतकऱ्यांसाठी वापरण्यात येईल.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेचे लाभार्थी:
महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकरी
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान:
कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी 80 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेचा फायदा:
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे झाले आहेत. यामुळे शेतीच्या कामांमध्ये कार्यक्षमता आणि उत्पादकता लक्षणीयरीत्या वाढली आहे. यामुळे शेतीचे खर्च कमी झाले आहेत आणि रोजगार निर्मितीही झाली आहे. या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक आधुनिक आणि स्पर्धात्मक बनली आहे.
- कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी आर्थिक अनुदान दिले जाते.
- या योजनेमध्ये शेतकऱ्यांना शेतीसंबंधित विविध प्रकारच्या अवजारांसाठी अनुदान दिले जाते.
- या योजनेमुळे गरीब व गरजू शेतकऱ्यांना शेतीची कामे कमी वेळात आणि वेळेवर होण्यासाठी लाभ होणार आहे.
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे राज्यातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला मोठी गती मिळाली आहे.
- या योजनेमुळे शेतीची उत्पादकता आणि कार्यक्षमता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
- या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या कष्टांमध्ये मोठी घट झाली आहे.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेसाठी आवश्यक पात्रता:
अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेच्या अटी व शर्ती:
- फक्त महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल.
- महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
- अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःची शेतीयोग्य जमीन असणे आवश्यक आहे.
- शेतकरी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मधील असल्यास त्याच्या जवळ जातीचा दाखला असणे आवश्यक आहे.
- योजनेअंतर्गत मिळणारी अवजारे किमान 6 वर्षे हस्तांतर/पुनर्वीक्री/गहाण ठेवता येणार नाहीत.
- शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ असणे गरजेचे आहे.
- अर्जदारास ट्रॅक्टर किंवा यंत्र/अवजार यांपैकी फक्त एकाच गोष्टीसाठी अनुदान दिले जाईल.
- अर्जदाराच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याने ट्रॅक्टर चा लाभ मिळवला असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारासाठी लाभ मिळण्यास अर्जदार पात्र असेल परंतु त्याने ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक आहे.
- शेतकऱ्याने एखाद्या अवजाराचा लाभ घेतला असल्यास त्याच अवजारासाठी पुढील 10 वर्षे लाभ घेता येणार नाही परंतु दुसऱ्या अवजारासाठी अर्ज करता येईल.
आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- रहिवाशी दाखला
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- जातीचा दाखला
- जमिनीचा 7/12 व 8अ
- बँक खाते पासबुक
- यंत्र/अवजारांचे कोटेशन
- परीक्षण अहवाल
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- प्रतिज्ञा पत्र
लाभार्थी निवड पद्धत:
- जमा झालेल्या अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाईन छाननी करण्यात येते व पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना पुर्व सम्मती आदेश ऑनलाईन देण्यात येतो व त्याबाबतचा शेतकऱ्यांच्या मोबाईल वर SMS पाठवला जातो.
- शेतकरी पूर्वसंमती आदेश महाडीबीटी पोर्टल वर लॉगिन करून पाहू शकतील.
- ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली नाही परंतु ते प्रतिक्षा यादीत आहेत असे लाभार्थी पुढील वर्षी त्याच बाबीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबिटी पोर्टल वर मागील वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा पर्याय निवडावा लागेल व त्यांना या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदाराला सर्वात प्रथम कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर गेल्यावर कृषी विभागात कृषी यांत्रिकीकरण योजना वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
- सर्व माहिती भरून झाल्यावर Save बटनावर क्लिक करावे लागेल
- अशा प्रकारे तुमची कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत:
- अर्जदार शेतकऱ्याला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात कृषी विभागात जाऊन कृषी यांत्रिकीकरण योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडावी लागतील व अर्ज कार्यालयात जमा करावी लागतील.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
- महाराष्ट्र कृषी यांत्रिकीकरण योजना अधिकृत वेबसाईट https://mahadbt.maharashtra.gov.in/Login/Login
तुम्ही कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेची अधिकृत वेबसाईट कोणती?
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेची https://mahadbt.maharashtra.gov.in/Login ही अधिकृत वेबसाईट आहे.
2. कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेचे उद्देश काय?
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना शेती कामासाठी आधुनिक यंत्र सामग्रीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे जेणेकरून वेळेची बचत होईल आणि त्यांच्या शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
3. कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेद्वारे शेतकऱ्यांना किती अनुदान देण्यात येते?
कृषी यांत्रिकीकरण (SMAM) योजनेद्वारे शेतकऱ्यांना 80% पर्यंत अनुदान देण्यात येते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ