सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अलिबागचा पांढरा कांदा आला बाजारात, यंदा उत्पादन वाढले, व्यापाऱ्यांच्या खरेदीकडे शेतकऱ्यांचे लागले डोळे

अलिबाग - अलिबागचा औषधी आणि गुणकारी असलेला पांढरा कांदा बाजारात विक्रीस आला आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, नेहुली, वेश्वी, वांडगाव, मुळे, धोलपाडा, खंडाळे, रुळे, तळवळी या गावात पांढरा कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. अलिबाग मधील 250 हेक्टरवर कांदा लागवड केली जाते. यंदा अवेळी पाऊस पडल्याने कांदा पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र तशी वेळ शेतकऱ्यांवर आली नाही. यावेळी तालुक्यात पांढरा कांद्याचे उत्पादन वाढले आहे. त्यामुळे बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.
38 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
