पोस्ट विवरण
सुने
रोग
कृषि
नींबू
कृषि ज्ञान
शेतकरी डॉक्टर
DeHaat Channel
21 Mar
Follow

लिंबू पिकातील सिट्रस ग्रिनिंग रोगाविषयी सर्वकाही! (All about Citrus greening disease in Lemon crop!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

भारत हा जगातील सर्वात मोठा लिंबू उत्पादक देश आहे. भारत तामिळनाडू, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, आसाम, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात इत्यादी राज्यांमध्ये लिंबाची लागवड केली जाते. एकदा लिंबाची लागवड केल्यावर त्यापासून 10 वर्षे उत्पादन घेता येते. लिंबू हे कमी खर्चात जास्त नफा देणारे पीक आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे वर्षभर बाजारात लिंबाची मागणी कायम राहते. लिंबाचे रोप सुमारे ३ वर्षांनी चांगले वाढते आणि लिंबाची झाडे वर्षभर उत्पन्न देत राहतात. एका एकरात लिंबू लागवड करून वर्षाला सुमारे 4 ते 5 लाख रुपयांचे उत्पन्न मिळू शकते. देशातील अनेक शेतकरी लिंबाची लागवड करून भरपूर नफा कमावत आहेत. मात्र लिंबू पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. यातीलच एक महत्वाचा रोग म्हणजे सिट्रस ग्रिनिंग. या रोगाचे दुसरे नाव 'हाँगलॉन्गबिंग' (एचएलबी) असे सुद्धा आहे. या रोगामुळे लिंबू पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण लिंबू पिकातील या रोगाविषयी व याच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

सिट्रस ग्रिनिंग (Lemon Citrus Greening):

  • सिट्रस ग्रिनिंग हा लिंबूवर्गीय फळझाडांमधील एक महत्त्वाचा रोग असून, अनेक राज्यांमध्ये उत्पादनावर मोठा परिणाम करतो.
  • हा रोग जवळ जवळ सर्व जातींची लिंबूवर्गीय फळझाडे संक्रमित करतो.
  • रोगाची लक्षणे बहुधा परिवर्तनशील असतात आणि बहुतांश भागांसाठी विशिष्ट नसतात.
  • बऱ्याच वेळेस सिट्रस ग्रिनिंग रोगग्रस्त झाड आणि जस्त किंवा लोह यासारख्या खनिजांच्या कमतरतेची लक्षणे सारखीच दिसतात. त्यामुळे अनेक वेळा शेतकऱ्यांचा गोंधळ उडतो.

सिट्रस ग्रिनिंग रोगाची लक्षणे (Lemon Citrus Greening disease symptoms):

  • पिवळ्या कोंबाचा उदय हे सिट्रस ग्रिनिंग होण्याच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. म्हणून या रोगाचे दुसरे नाव 'हाँगलॉन्गबिंग' (एचएलबी) असे सुद्धा आहे.
  • पानांवर डाग पडणे.
  • रोगाची तीव्रता अधिक झाल्यास पानाचा काही भाग हिरवा राहून बाकी भाग पिवळा पडतो.
  • फांद्या मृत झाल्यामुळे झाडे विरळ दिसतात.
  • रोगग्रस्त फळे आकाराने लहान, कुरूप, चवीला कडू व निम्न दर्जाची असतात. अशी फळे, बीजविरहित असतात.

व्यवस्थापन (Lemon Citrus Greening disease Management):

  • टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड* 600 पीपीएम (1200 ग्रॅम प्रति 200 लिटर पाणी) या प्रमाणे तयार केलेल्या द्रावणाची हिवाळ्यात (डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यात) 45 दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी.
  • झिंक सल्फेट व फेरस सल्फेट (200 ग्रॅम प्रत्येकी) झाडाच्या अळ्यामध्ये दोन वेळा विभागून वापरावे.
  • रोगाचा प्रसार करणाऱ्या एशियन सिट्रस सायला या किडीच्या सक्रिय काळात थायामेथोक्झाम 25% डब्ल्यूजी (देहात-Asear) 100 ग्रॅमची किंवा
  • इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 100 मिली प्रति 100 लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.
  • पुढील फवारणी 15 दिवसांच्या अंतराने कीटकनाशक बदलून करावी.

फवारणी करताना घ्यावयाची काळजी:

  • फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
  • फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
  • शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
  • फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
  • औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
  • फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
  • एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
  • कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
  • फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
  • फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.

तुम्ही लिंबू पिकातील सिट्रस ग्रिनिंग रोगाचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. लिंबू पिकाला लागणारे प्रमुख रोग कोणते?

कँकर/खैऱ्या रोग, पायकूज व डिंक्या रोग, शेंडे मर रोग हे लिंबू पिकाला लागणारे प्रमुख रोग आहेत.

2. लिंबू पिकासाठी योग्य हवामान कोणते?

लिंबू वनस्पतीसाठी अर्ध-शुष्क हवामान सर्वोत्तम आहे.

3. लिंबू पिकासाठी कोणती जमीन योग्य असते?

लिंबू रोपासाठी वालुकामय, चिकणमाती सर्वोत्तम मानली जाते. याशिवाय लाल लॅटराइट जमिनीतही लिंबू पिकवता येतो.

41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ