20 कलमी कार्यक्रमांमध्ये समाविष्ट राष्ट्रीय बायोगॅस योजनेविषयी सर्वकाही! (All About National Biogas Scheme!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे. आजच्या लेखात आपण याच राष्ट्रीय बायोगॅस योजनेविषयी जाणून घेणार आहोत.
राष्ट्रीय बायोगॅस योजना:
- केंद्र शासनाच्या 20 कलमी कार्यक्रमांतर्गत समाविष्ट योजना.
- केंद्र शासनाच्या नविन व नविकरणीय ऊर्जा मंत्रालया (MNRE) मार्फत राबविली जाते.
- 100% केंद्र पुरस्कृत योजना
- उभारणीनंतर 5 वर्ष देखभाल दुरस्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेची
योजनेची उद्दिष्टे:
- स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅसचा वापर करणे.
- ग्रामीण भागातील स्त्रियांचे धुरापासून संरक्षण करणे व सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासून सुटका करणे.
- सरपणासाठी आवश्यक असलेली लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे.
- बायोगॅस प्रकल्पापासुन निर्माण होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी करणे.
- शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करून गाव व परिसर स्वच्छ करणे.
- बायोगॅसचा वापर गॅस चलित इंजिन व रेफ्रिजरेटरमध्ये करून डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे.
योजने अंतर्गत लाभार्थीस मिळणारे अनुदान:
- 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- रु. 5500/-
- 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- रु. 9000/-
- बायोगॅस सयंत्रास शौचालय जोडणी केल्यास जादाचे अनुदान :- रु.1200/-
- टर्न की फी रक्कम प्रति सयंत्र रु. 1500/- एकूण प्रति सयंत्र अनुदान रु. 10,500/-
बायोगॅस योजना महत्त्व:
राष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रमाला अनेक सामाजिक-आर्थिक आणि पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्याच्या क्षमतेमुळे महत्त्व आहे:
पर्यावरणीय फायदे : बायोगॅस तंत्रज्ञान आणि जैव खते यांच्या वापरास प्रोत्साहन देऊन, कार्यक्रम पर्यावरण संवर्धन, कचरा कमी करणे आणि हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यास हातभार लावतो. बायोगॅस उत्पादनामुळे सेंद्रिय कचऱ्याच्या विघटनातून मिथेन या शक्तिशाली हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते.
ग्रामीण विकास : कार्यक्रम बायोगॅस संयंत्रांच्या स्थापनेद्वारे आणि ऑपरेशनद्वारे उत्पन्नाच्या संधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण जीवनमान वाढवतो. हे बायोगॅस बांधकाम, ऑपरेशन आणि देखभाल यांमध्ये रोजगाराच्या संधी निर्माण करते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते आणि स्थानिक समुदायांचे सक्षमीकरण होते.
ऊर्जा सुरक्षा : बायोगॅस तंत्रज्ञान स्वयंपाक आणि पाणी गरम करण्याच्या उद्देशाने सरपण आणि शेण यासारख्या पारंपारिक बायोमास इंधनावरील अवलंबित्व कमी करते. स्वच्छ आणि विश्वासार्ह ऊर्जा स्त्रोतांमध्ये प्रवेश प्रदान करून, कार्यक्रम ऊर्जा सुरक्षिततेमध्ये योगदान देतो आणि ग्रामीण कुटुंबांसाठी जीवनमान सुधारतो.
शाश्वत शेती : जैव खतांचे उत्पादन आणि वापरामुळे मातीचे आरोग्य, सुपीकता आणि पीक उत्पादकता सुधारते, शाश्वत कृषी पद्धतींना चालना मिळते आणि रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते. जैव खते मातीची जैवविविधता आणि परिसंस्था सेवा पुनर्संचयित करण्यासाठी देखील योगदान देतात.
अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:
- गट विकास अधिकारी यांचे नावे विहीत नमुन्यात अर्ज.
- लाभार्थींच्या नावे शेतीचा 7/12 व 8 अ चा उतारा.
- लाभार्थी भूमिहीन शेतमजुर असल्यास तलाठयांचा दाखला
- लाभार्थ्याच्या पुर्ण केलेल्या सयंत्रासह फोटो
- ग्रामसेवकांचा 5 ते 6 जनावरे असल्याचा दाखला लाभार्थीने सयंत्र स्वखर्चाने बांधुन पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल करावा
बायोगॅस योजनेचे मुख्य प्रकार:
घरगुती बायोगॅसची निर्मिती : घरगुती बायोगॅस ची निर्मिती करून घरगुती इंधनावरील खर्च कमी करणे .
खत निर्माण : बायोगॅस द्वारे खताचे उत्पादन करून, उत्पादित खताचा चा वापर शेतीसाठी करणे , सोबत अधिक उत्पादित खतापासून आर्थिक उत्पादनावर भर देणे.
प्रशिक्षण आणि शिक्षण : बायोगॅस आणि जैविक च्या उत्पादनासाठी ग्रामीण भागातील युवक आणि शेतकरी वर्गाला प्रशिक्षित करून त्यांना कौशल्य विकासात भर घालणे
बायोगॅस संबंधी सर्व साधारण संकीर्ण माहिती:
- गोठयामध्ये बांधुन असणाऱ्या एका दुभात्या जनावरापासून 24 तासात सरासरी 10 ते 15 किलो शेण मिळु शकते व बाहेरुन चरुन येणाऱ्या जनावरापासून सरासरी 7 ते 10 किलेा शेण मिळू शकते तसेच लहान वासरापासून दिवसाला 2 ते 3 किलो शेण मिळू शकते .
- एक किलो शेणापासून सुमारे 40 लि. बायोगॅस निर्माण होतो तसेच 1 किलो खरकटे पासुन सुमारे 80 लि. गॅसची निर्मिती होते.
- एका व्यक्तीच्या दैनंदिन गरजेसाठी सुमारे 250 लि. बायोगॅसची आवश्यकता असते.
- एक घनमिटर बायोगॅस म्हणजे 1000 लि. गॅस
- पाच लिटरच्या डब्यामध्ये सर्वसाधारणपणे 18 ते 20 किलो शेण बसते.
तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. बायोगॅस म्हणजे काय?
बायोगॅस म्हणजे जैविक प्रक्रियांमधून बाहेर पडणारा वायू.
2. बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणार गॅस कशासाठी वापरला जातो?
बायोगॅस गॅसिफायरमधून तयार होणारा प्रोड्युसर गॅस पाणी उपसण्यासाठी, वीजनिर्मितीसाठी, तसेच स्वयंपाकासाठी देखील वापरला जातो.
3. बायोगॅस योजनेचे मुख्य प्रकार कोणते?
घरगुती बायोगॅसची निर्मिती, खत निर्माण, प्रशिक्षण आणि शिक्षण हे बायोगॅस योजनेचे मुख्य प्रकार आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
