पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
5 Apr
Follow

मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेविषयी सर्व काही! (All about the Soil Health Card Scheme!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

मृदा आरोग्य कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून फेब्रुवारी २०१५ पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या द्वारे सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य कार्ड म्हणजेच मृदा आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीची उचित माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीनुसार कोणती पिके घ्यायची याचीही माहिती देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर 3 वर्षांनी मृदा स्वास्थ्य कार्ड दिले जाईल, जेणेकरून त्यांना जमिनीतील पोषक घटकांसह जमिनीची पीएच पातळी, आर्द्रता इत्यादी गोष्टी देखील कळू शकतील. या कार्डमुळे शेतकर्‍यांना त्यांच्या शेतातील माती निरोगी ठेवण्यात, जमिनीची अनुकूलता आणि उत्पादकता वाढविण्यात मदत होईल. चला तर मग जाणून घेऊया या योजनेविषयीची सविस्तर माहिती.

मृदा आरोग्य कार्ड योजनेची उद्दिष्टे:

  • या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या माहितीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल.
  • मृदा चाचणी करून प्रयोग शाळांच्या कार्याला बळकटी देणे.
  • जमिनीची सुपीकता मोजण्याचे समान समान मानक तयार करणे.
  • मृदा परीक्षण करून पोषक द्रव्यांचे व्यवस्थापन करणे.
  • जमिनीला खते देताना पोषकद्रव्ये कळावीत यासाठी शेतकऱ्यांना दर तीन वर्षांनी मृदा आरोग्य कार्ड बनवून देणे.
  • या योजनेकरता शासनाने चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी आणि आरोग्य कार्ड जारी करण्यासाठी रुपये शंभर करोड ची तरतूद केलेली आहे

आता जाणून घेऊया, मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेचे फायदे:

  • माती परीक्षणाद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या लागवडीच्या जमिनीतील क्षार आणि आम्लयुक्त घटकांची माहिती मिळू शकते.
  • जमिनीतील पोषकतत्वांनुसार शेतकरी वेगवेगळी पिके निवडू शकतात.
  • जमिनीत पोषकतत्वांची कमतरता असल्यास शेतकरी त्या पोषकतत्वांची पूर्तता करू शकतात.
  • त्यामुळे मातीचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.
  • शेतकऱ्यांना चांगले उत्पादन घेता येईल.

माती परीक्षण प्रक्रिया:

  • प्रथम शेतातील मातीचा नमुना घेतला जातो.
  • त्यानंतर नमुना चाचणीसाठी माती परीक्षण केंद्राकडे पाठविला जातो.
  • तेथे तज्ज्ञांकडून माती परीक्षण करून अहवाल तयार केला जातो.
  • त्यानंतर हे अहवाल शेतकऱ्यांच्या नावासह वेबसाइटवर अपलोड केले जातात. यासोबतच शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल नंबरवरून अहवालाची माहितीही देण्यात येते.
  • काही दिवसांनी शेतकऱ्यांना मृदा स्वास्थ्य पत्रिकाही छापून दिल्या जातात.

मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेसाठी अर्ज कसा करावा?

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेच्या अधिकृत वेबसाइटला https://soilhealth.dac.gov.in/ भेट द्यावी.
  • अधिकृत वेबसाइटच्या होम पेजवर 'लॉग इन' बटणावर क्लिक करा.
  • यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. येथे मागितलेली माहिती भरा.
  • यानंतर एक नवीन पेज उघडेल. येथे लॉगिन फॉर्मच्या खाली असलेल्या 'नवीन वापरकर्त्याची नोंदणी करा' बटणावर क्लिक करा.
  • आता तुमच्या समोर नोंदणी फॉर्म उघडेल.
  • सर्व आवश्यक माहिती भरा आणि 'सबमिट' बटणावर क्लिक करा.

पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी तुम्ही मृदा आरोग्य कार्ड योजनेचा लाभ घेतला आहे का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेसाठी अर्ज करायला अधिकृत वेबसाईट कोणती?

मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेसाठी https://soilhealth.dac.gov.in/ वरून अर्ज करता येईल.

2. मृदा स्वास्थ्य कार्ड योजनेचे ध्येय काय आहे?

मृदा स्वास्थ्य कार्ड या योजनेचे ध्येय शेतकऱ्यांना चाचणी केलेल्या माहितीनुसार खतांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. ज्याद्वारे शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकेल.

3. मृदा स्वास्थ्य कार्ड योजना केव्हा सुरु करण्यात आली?

मृदा स्वास्थ्य कार्ड योजना ही भारत सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून फेब्रुवारी २०१५ पासून माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या द्वारे सुरू करण्यात आलेली आहे.

34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ