पोस्ट विवरण
कोरफड लागवड: कमी खर्च, जास्त नफा! (Aloe vera cultivation: Low Cost, High Profit!)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारतातील कोरफडची शेती ही अलीकडे खुप प्रचलित होत आहे कारण प्रति एकर कोरफड उत्पादनाचा नफा सामान्य शेतीतील नफ्यापेक्षा खूप जास्त आहे. कोरफड खूप कमी पाणी आणि मेहनतीत करता येते. कोरफडीचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी तसेच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कोरफड ही औषधी गुणांनी युक्त आहे, कोरफडमध्ये असलेले पोषक घटक त्वचेसाठी व केसांसाठी उपयोगी असल्याचे सांगितले जाते. अनेक शेतकरी कोरफड लागवड व्यावसायीक स्तरावर करताना दिसतात. कोरफड ही बहुवार्षिक औषधी वनस्पती असून साधारणतः 1.5 ते 2.5 फुटापर्यंत वाढते. पाने लांब, जाड असून त्यामध्ये गरांचे प्रमाण जास्त असते. पानांची लांबी 25 ते 30 सेमी तर जाडी 3 ते 4 सेमी असते. कोरफडीची लागवड कंदाद्वारे केली जाते. आजच्या आपल्या या लेखात आपण कमी खर्चात जास्त नफा देणाऱ्या या पिकाच्या लागवडीविषयी जाणून घेणार आहोत.
कोरफड लागवडीसाठी योग्य जमीन (Suitable soil for Aloe vera Cultivation):
कोरफडीची लागवड सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये करता येते. पाण्याचा निचरा होणारी, रेताड व हलकी जमीन कोरफड लागवडीस योग्य असते.
कोरफड लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Climate for Aloe vera Cultivation):
उष्ण, दमट व कोरड्या हवामानात कोरफड पिकाची वाढ चांगली होते.
कोरफड लागवडीसाठी योग्य हंगाम (Suitable Season for Aloe vera Cultivation):
कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते.
कोरफड लागवड (Aloe vera Cultivation):
- जमीन चांगली नांगरुन, वखरुन भुसभुशीत करावी.
- काडीकचरा वेचल्यानंतर एकरी 4 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे.
- नंतर जमीन सपाट करुन सरी-वरंबे पाडावेत.
- कोरफडीची लागवड फुटव्यापासूनच केली जाते.
- लागवड करतांना दोन ओळीत 60 सेमी व दोन झाडात 45 सेमी अंतर ठेवावे.
- लागवडीसाठी एकरी 4 ते 7.2 हजार कंद आवश्यक आहेत.
पूर्वमशागत:
जमिनीची नांगरणी करून 2 ते 3 पाळ्या द्याव्यात. जमीन चांगली भुसभुसीत झाल्यावर लागवड करावी.
खत व्यवस्थापन (Fertilizer Management in Aloe vera):
- जमिनीची मशागत करण्यापूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत आणि एकरी 140 ते 160 किलो निंबोळी पेंड खत लागवडीपूर्वी मिसळावी.
- लागवडीपूर्वी एकरी नत्र 14 किलो, स्फुरद 28 किलो व पालाश 28 किलो द्यावे.
- लागवडीनंतर 40 ते 60 दिवसांनी 14 ते 16 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. या पिकास जास्त पाण्याची आवश्यकता नसते.
- पाण्याची उपलब्धता व जमिनीच्या प्रतिनुसार पिकास हलके ते मध्यम पाणी द्यावे.
- लागवडीनंतर 40 दिवसांनी पहिली खुरपणी करावी.
पाणी व्यवस्थापन (Water Management In Aloe vera):
- पावसाळ्यात व हिवाळ्यात कोरफडीस पाण्याची जास्त आवश्यकता नसते.
- उन्हाळ्यात 15 दिवसातून एकवेळ पाणी द्यावे लागते.
आंतरमशागत:
- वेळोवेळी निंदणी करुन वाफे तणरहीत करावे.
- बुंध्याजवळील माती भुसभुसशीत ठेवल्याने झाडाची वाढ चांगली होते.
कीड व रोग (Aloe vera Insects and disease):
कोरफड पिकात कोळी, मावा, भुंगेरा, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण हे कीटक तर पानांवरील ठिपके, तांबेरा, मूळ कूज हे रोग मुख्यतः आढळून येतात.
उत्पादन:
प्रतिवर्षी एकरी 44 ते 46 क्विंटल हिरवी पाने मिळतात.
मिळकत व दर:
- कोरफडीच्या पानांना रु 5000 प्रति टन म्हणजे किलोला रु 5 भाव मिळतो.
- जमिनीच्या प्रकारानुसार जे उत्पादन येते व जसा भाव व मागणी असते त्याप्रमाणे एकरी 40 हजार ते 60 हजार रुपये उत्पन्न हाती येते.
- या पिकासाठी सुरवातीचा खर्च सोडता निव्वळ रु 10,000 मशागत व अन्य खर्च होतो.
- कमी मेहनत व कमी खर्चात उत्पादन व उत्पन्न मिळत असल्याने इतर पिकांच्या तुलनेत कोरफड किफायतशीर ठरते.
- कोरफडीच्या पानांना उन्हाळ्यात जास्त म्हणजे रु 8 प्रति किलोपर्यंत भाव मिळू शकतो. पुणे- मुंबई भागात तो रु 10 पर्यंतही मिळू शकतो
अशा प्रकारे तुम्हाला देखील कोरफड लागवड करायची असेल तर, तुम्हाला वरील माहिती फायदेशीर ठरू शकते? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात कोरफडीचे पीक कुठे घेतले जाते?
भारतामध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात व्यावसायिक पातळीवर कोरफडीचे पीक घेतले जाते.
2. कोरफड पिकासाठी महाराष्ट्रातील योग्य लागवड कालावधी कोणता?
कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते.
3. कोरफड लागवडीसाठी योग्य हंगाम कोणता?
कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ