पोस्ट विवरण
कोरफड पिकातील प्रमुख रोग आणि त्यांचे व्यवस्थापन (Aloe Vera : Major Diseases, Symptoms and Control)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारतातील कोरफडीची शेती लोकप्रिय होत आहे कारण प्रति एकर कोरफड उत्पादनाचा नफा सामान्य शेतीपेक्षा खूप जास्त आहे. कोरफड खूप कमी पाणी आणि मेहनतीत करता येते. कोरफडीचा उपयोग अनेक आयुर्वेदिक औषधे बनविण्यासाठी तसेच कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. कोरफड ही औषधी गुणांनी युक्त आहे, कोरफडमध्ये असलेले पोषक घटक त्वचेसाठी व केसांसाठी उपयोगी असल्याचे सांगितले जाते. अनेक शेतकरी कोरफड लागवड व्यावसायीक स्तरावर करताना दिसतात. कोरफड ही बहुवार्षिक औषधी वनस्पती असून साधारणतः 1.5 ते 2.5 फुटापर्यंत वाढते. पाने लांब, जाड असून त्यामध्ये गरांचे प्रमाण जास्त असते. पानांची लांबी 25 ते 30 सेंमी तर जाडी 3 ते 4 सेंमी असते. कोरफडीची लागवड कंदाद्वारे केली जाते. कोरफड पिकावर होणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. हेच नुकसान टाळता यावे म्हणूनच आजच्या या लेखात आपण कोरफड पिकातील प्रमुख रोग आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
कोरफड पिकातील प्रमुख रोग:
पानांवरील ठिपके (Leaf Spot):
लक्षणे:
- हा रोग सारकोस्पोरा तसेच अलटर्निया बुरशीच्या प्रजातीमुळे होतो.
- झाडाच्या पानावर, खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ट आकाराचे व आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.
- कालांतराने पानावरील ठिपक्यांचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
- आद्र हवामान या रोगाच्या प्रसारास अनुकूल ठरते.
रोग व्यवस्थापन:
- पेरणीपूर्वी बियाण्यास (कार्बॉक्सिन 37.5% + थायरम 37.5%) मिश्र घटक 3 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.
- रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास टेबुकोण्याझोल 10% डब्लूपी + सल्फर 65% डब्लूजी (हरू - सुमिटोमो ) 400 ग्रॅम प्रति 200 ली पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
तांबेरा रोग (Rust):
लक्षणे:
- तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
- हे ठिपके हळूहळू जांभळट व थोड्या उंचावलेल्या फोडात बदलतात.
- हे ठिपके गोल ते अंडाकृती आकाराचे असून विखुरलेले किंवा पुंजक्यांसारखे असतात.
- तांबेरा रोगाची लक्षणे पर्णकोषावर आणि फुलांच्या फांदीवरही दिसतात.
रोग व्यवस्थापन:
- रासायनिक खतांची संतुलित मात्रा द्यावी. युरिया शिफारसशी पेक्षा अधिक मात्रा देऊ नये.
- पेरणीसाठी तांबेरा प्रतिरोधक वाणांची निवड करावी.
- वेळेवर पेरणी करावी.
- पिकाच्या गरजेनुसार पाणी द्यावे.
- तांबेरा रोगाची लक्षणे दिसू लागताच प्रोपीनेब 70% डब्ल्यूपी (देहात - Zinacto) प्रति एकर 200 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.
मूळ कूज:
लक्षणे :
- पाने व खोड करड्या रंगाचे होतात आणि रोगग्रस्त पीक नष्ट होते.
- संक्रमित वनस्पतींची मुळे ठिसूळ आणि कोरडी होतात.
रोग व्यवस्थापन:
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करा. प्रतिरोधक वाणांची लागवड करा.
- जास्त तापमानातील रोपे लागवडीसाठी टाळा.
- कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - २.५ ग्रॅम ने प्रति किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी.
- कार्बेन्डाजिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टिन) - ४०० ग्रॅम एकर फवारावे.
- मॅन्कोझेब 64% डब्ल्यूपी + मेटलैक्सिल 8% (टाटा - रॅलीस मास्टर) - ५०० ग्रॅम एकर फवारावे.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या कोरफड पिकामधील प्रमुख रोगांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात कोरफडीचे पीक कुठे घेतले जाते?
भारतामध्ये प्रामुख्याने राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात व्यावसायिक पातळीवर कोरफडीचे पीक घेतले जाते.
2. कोरफड पिकासाठी महाराष्ट्रातील योग्य लागवड कालावधी कोणता?
कोरफडीची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते.
3. कोरफड पिकावरील तांबेरा रोग कसा ओळखायचा?
तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून, हा रोग कोरडफडीच्या पानांच्या खालच्या बाजूला सूक्ष्म ठिपक्यांच्या स्वरूपात दिसून येतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ