पोस्ट विवरण
अळू पिकातील प्रमुख कीटक आणि व्यवस्थापन (Aloo - Major pests and their management)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
अळू हे उष्ण कटिबंधातील एक महत्त्वाचे भाजीपाला पीक आहे. भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते. उत्तर भारतात अळूच्या कंदांना ‘आरवी’ असे म्हणतात. अळू या भाजीपाला पिकाचे उगमस्थान भारत - मलाया यामधील प्रदेश असून तेथून त्याचा प्रसार आग्नेय आशिया, चीन, जपान आणि पॅसिफिक बेटात झाला. कोकणातील नारळ आणि सुपारीच्या बागेत तसेच परसबागेत अळूच्या पिकाची लागवड होत आहे. आजच्या आपल्या या भागात आपण याच पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
अळू पिकावर प्रामुख्याने पाने कुरतडणारी अळी, तंबाखू अळी आणि मावा किडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. चला तर मग जाणून घेऊया यांच्या व्यवस्थापनाविषयीची माहिती:
पाने कुरतडणारी अळी:
पाने कुरतडणाऱ्या अळीची ओळख:
- ही एक बहुभक्षीय कीड आहे.
- या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशीरा पेरणी केलेल्या पिकावर होतो.
- मादी पतंग सूरुवातीला पिकाच्या व तणांच्या पानांवर तसेच कोवळ्या शेंड्यांवर एक-एक करून किंवा समूहाने 300 ते 450 अंडी घालते.
- अळीची लांबी 0.2 ते 1.5 इंच असते.
- अळीचा रंग भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो.
- अळीच्या शरीरावर करड्या रंगाचा पट्टा शरीराच्या दोन्ही बाजूने असतो.
पाने कुरतडणाऱ्या अळीची लक्षणे (Symptoms):
- अळी निशाचर असून दिवसा पिकाच्या सभोवतालच्या मातीमध्ये किंवा भेगांमध्ये लपून बसते.
- रात्री ती बाहेर पडते, जमिनीलगत रोप कातरून कोवळी पाने खाऊन उपजीविका करते.
उपाय (Remedy):
- उन्हाळ्यात खोल नांगरणी करा.
- दिवसा सिंचन करण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करा.
- इमामेक्टिन बेंजोएट 5% एसजी (धानुका - इ.एम. 1) 100 ग्रॅम / एकर 200 लिटरची पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- क्लोरपाइरीफॉस 50% + साइपरमेथ्रिन 5% ईसी (देहात - सी स्क्वेअर) 400 मिली / एकरची 200 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा
- जैव उत्पादन (Damman-Bio R 303+) 1 मिली - 1.5 मिली/लीटर फवारावे.
तंबाखू सुरवंट (Tobacco budworm):
तंबाखू सुरवंटाची ओळख:
- तंबाखू अळी एक बहुभुज किटक आहे.
- तंबाखू अळीमुळे पिकाचे थेट नुकसान होते.
- पतंग तपकिरी रंगाचे आणि 15 - 18 सेमी लांब असतात.
- पूर्ण विकसित प्युपा 35 - 40 मिमी लांब व पिवळसर हिरवा-तपकिरी असतो.
- अळू पिकावर जून ते सप्टेंबर या काळात किडींचा हल्ला होतो.
तंबाखू सुरवंटाची लक्षणे (Symptoms):
- पुंजक्यातून बाहेर पडलेल्या अळ्या सुरवातीस समूहाने राहतात, पानाच्या खालचा भाग खरवडून खातात.
- मोठ्या अळ्या पानावर मोठे छिद्र पाडून खातात. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असेल तर झाडाची पूर्ण पाने खाऊन फक्त शिराच शिल्लक राहिलेल्या दिसतात.
उपाय (Remedy):
- तंबाखू सुरवंटाच्या नियंत्रणासाठी या किडीच्या प्रजनन क्षमतेवर वार करायला हवा.
- एक जोडी हजारोच्या क्षमतेने अंडी घालत असल्याने जर आपण पतंग नियंत्रित केले तर पिकाचे मोठे नुकसान टळेल. यासाठी आपण शेतात कामगंध सापळे लावावेत.
- एकरी 6 सापळे बसवावेत.
- तसेच पिकाच्या चारही बाजूने एरंड पीक किंवा सापळा पिके घ्यावीत.
- क्लोरपायरीफॉस 20% ईसी (टाटा रैलिस-तफाबान) 400 मिली/प्रति एकरी किंवा
- क्विनालफोस 25% ईसी (धानुका-धानुलक्स) 400 मिली/प्रति एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
मावा कीटक (Aphid) :
मावा कीटकाची ओळख:
- मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
- मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.
मावा कीटकाची लक्षणे (Symptoms):
- हे कीटक कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
- त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
- ही कीड सोंडेद्वारे झाडातील अन्नरस शोधते.
- मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे झाडे वाळतात.
उपाय (Remedy):
- निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
- फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
- बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या अळू पिकातील प्रमुख किडींचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात अळूचे पीक कुठे घेतले जाते?
भारतामध्ये प्रामुख्याने दक्षिण आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये हे पीक घेतले जाते.
2. अळू पिकासाठी महाराष्ट्रातील योग्य हंगाम कोणता?
महाराष्ट्रातील खरीप हंगामात अर्थातच जून महिन्यात अळू पिकाची लागवड केल्यास अधिकचे उत्पादन मिळते.
3. अळू पिकातील तंबाखू सुरवंटाचा प्रादुर्भाव कसा ओळखायचा?
जून तर सप्टेंबर या काळात पानाचा खालील भाग खरवडलेला दिसल्यास तंबाखू सुरवंटाचा प्रादुर्भाव झाल्याचे ओळखावे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ