सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow
अमृतकाळात शेतीचा कलश रीताच

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्ष 2024-25 साठीचा अंतरिम अर्थसंकल्प नुकताच सादर केला आहे. खरे तर हे लेखानुदान असले, तरी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांपासून ते सर्वांनाच नवीन काही तरी आपल्या पदरात पडेल, अशी आशा होती. शेतकऱ्यांना प्रामुख्याने किसान सन्मान निधी योजनेतील वार्षिक रक्कम सहा हजारांवरून नऊ हजार होईल, तर करदात्यांना करसूट मर्यादा आठ लाख रुपये होईल, असे वाटत होते. परंतु या सर्व आशा फोल ठरल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी आपल्या भाषणात चार-पाच महिन्यांसाठीच्या लेखानुदानाऐवजी 2047 पर्यंतच्या विकसित भारताचा रोडमॅपच सादर केला.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
