पोस्ट विवरण
सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
13 Nov
Follow
अमरावतीतील ८० शेतकऱ्यांच्याच सोयाबीनला मिळाला हमीदर
हमीदराने सोयाबीन खरेदीसाठी 'नाफेड'ने जिल्ह्यात वीस केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर ८६६४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली, तरी आतापर्यंत प्रत्यक्षात ८० शेतकऱ्यांकडूनच १७३१ क्विंटल सोयाबीनची हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांचा रोष ओढावू नये यासाठी राज्य सरकारने सप्टेंबरमध्ये हमीदराने सोयाबीन खरेदीचा निर्णय घेतला. १५ ऑक्टोबरपासून 'नाफेड'च्या केंद्रांवरून राज्यात तेरा लाख टन सोयाबीन खरेदी करण्याचे लक्ष्यांक निश्चित करण्यात आले. त्यानुसार जिल्हानिहाय जिल्हा मार्केटिंग व विदर्भ मार्केटिंगला सबएजंट नियुक्त करीत 'नाफेड'ने खरेदी केंद्र सुरू केले.
44 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ