पोस्ट विवरण
सुने
कृषि
कृषि ज्ञान
मूँगफली
कृषी ज्ञान
DeHaat Channel
15 Jan
Follow

भुईमुगाची उत्कृष्ट वाण! (An excellent variety of Groundnut!)


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रात अग्रेसर राज्य असून, तेलबियांचे प्रमुख उत्पादक राज्य आहे. भुईमुग अर्थात शेंगदाणा, याची जगभरात 85 देशांमध्ये लागवड केली जाते. जगभरात होणाऱ्या भुईमुग उत्पादनात भारताचा क्रमांक दुसरा लागतो. भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत. महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत भुईमूग हे सर्वांत जुने तेलबिया पीक प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. महाराष्ट्रात सर्वाधिक भूईमुग उत्पादन करणारे जिल्हे म्हणजे अमरावती, धुळे, सातारा आणि उस्मानाबाद. देशातील एकूण उत्पादनापैकी 80 टक्के भुईमूग तेलासाठी, 10 टक्के प्रक्रिया करून खाण्यासाठी व 10 टक्के निर्यातीसाठी वापरले जाते. दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड करणे फायदेशीर ठरत आहे. भूईमुगास क्विन ऑफ ऑइल सीड्स म्हणून ही ओळखले जाते. चला तर मग आजच्या भागात भुईमुगाच्या काही विशेष वाणांविषयी जाणून घेऊया.

भुईमूग - देहात G-10:

  • देहात G-10 हे एक हायब्रीड प्रकारचे वाण आहे.
  • मे आणि जून महिन्यात पेरणीसाठी हे एक सर्वोत्तम वाण आहे.
  • या वाणाच्या पेरणीसाठी एकरी 60 ते 70 किलो बियाणे लागते.
  • या पिकाला गरजेनुसार पाणी द्यावे लागते.
  • हे वाण कापणीसाठी 100 ते 110 दिवसांत तयार होते.
  • या वाणाच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचं तर, या वाणाच्या पानाचा रंग हिरवा, शेंगांचा रंग फिकट पिवळा आणि धान्याचा रंग लालसर गुलाबी असा असतो.
  • या वाणातील प्रति शेंगेत 2 ते 3 शेंगदाणे असतात.
  • झाडाची उंची साधारणतः 15 ते 20 इंच इतकी असते.

फुले प्रगती (जे.एल.-24):

  • जळगावच्या तेलबिया संशोधन केंद्राने फुले प्रगती (जे.एल.-24) वाणाचे संशोधन केले होते.
  • फुले प्रगती (जे.एल.-24) हे वाण मध्यम ते हलक्या जमिनीत लागवड करता येते.
  • खरीप हंगामात या वाणाची लागवड करतात.
  • महाराष्ट्रात या वाणाची लागवड करता येते.

कोयना (बी-95):

  • निमपसऱ्या प्रकारातील ही जात पश्चिम महराष्ट्रात लागवडीस योग्य असून एकरी 45 ते 50 किलो बियाणे लागते.
  • 135 ते 140 दिवसांत हे वाण काढणीस येत असून दाणे मोठे टपोरे असतात.
  • 100 दाण्यांचे वजन 80 ते 90 ग्रॅम भरते.
  • यामध्ये तेलाचे प्रमाण 95% असून एकरी उत्पादन 22 ते 25 क्विंटल प्रति एकरी येते.

भुईमूग - G-20 / TG-37 A:

  • देहात G-20 / TG-37 A या हायब्रीड वाणांविषयी, या वाणाचा एकरी बियाणे दर 60 ते 65 किलो असून याची पेरणी जून ते मध्य जुलै या कालावधीत केल्यास पिकातून चांगले उत्पादन मिळते.
  • भुईमुगाचे हे वाण देखील 100 ते 105 दिवसांत कापणीयोग्य होते.
  • पानांचा रंग, शेंगांचा रंग, प्रति शेंगा दाण्यांची संख्या, झाडांची उंची ही इतर वाणांच्या झाडांसारखीच असते.

एस.बी.-11:

  • एस.बी.-11 ही जात पुर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे.
  • उपट्या प्रकारात मोडणारी ही जात 115 ते 120 दिवसांत तयार होते.
  • एकरी शेंगाचे उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळते.

यु.एफ.70 -103:

  • ही जात निमपसरी असून पुर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे.
  • 135 ते 140 दिवसांत काढणीस येते.
  • 12 ते 15 क्विंटल शेंगाचे उत्पादन एकरी मिळते.

आय.सी.जी.एस.-11:

  • ही जात निमपसरी असून 125 ते 130 दिवसांत काढणीस तयार होते.
  • 12 ते 18 क्विंटल शेंगाचे उत्पादन एकरी मिळते.
  • पूर्ण महाराष्ट्रभर लागवडीस योग्य आहे.

एम-13:

  • मराठवाडा, सोलापूर, नागपूर, पुणे भागात या जातीची लागवड करता येते.
  • ही जात पसरी वाढणारी असून 135 ते 140 दिवसात पेरणीपासून तयार होते.
  • शेंगाचे एकरी उत्पादन 8 ते 10 क्विंटल मिळते.

भुईमूग हे असे पीक आहे की त्यापासून सकस चारा, तेल, खाद्य (भाजके शेंगदाणे, चिक्की) सकस पेंड मिळते. अगदी भुईमुगाच्या टरफलापासून ही उत्तम खत मिळते. वरील वैशिष्ट्यांच्या वाणांची लागवड करून, शेतकरी समृद्ध होतील अशी आशा आहे. महाराष्ट्रात उपयुक्त ठरणाऱ्या या विशेष वाणांविषयी अधिक माहितीसाठी कंमेंट बॉक्समध्ये आपल्याला पडणारे प्रश्न विचारू शकता. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भारतात भुईमूग लागवडीचा हंगाम कोणता?

भारतात भुईमूग लागवडीचे खरीप, रब्बी आणि उन्हाळी असे तीन हंगाम आहेत.

2. उन्हाळी सोयाबीन लागवडीचा योग्य कालावधी कोणता?

ऊन्हाळी भुईमूग पेरणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारीपर्यंत असतो.

3. भुईमूग पिकासाठी योग्य जमीन कोणती?

भुईमूग पिकासाठी मध्यम प्रकारची, भुसभुशीत, चुना (कॅल्शियम) व सेंद्रिय पदार्थ यांचे योग्य प्रमाण असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य समजली जाते.

52 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ