पोस्ट विवरण
अनेक बुरशीजन्य रोगांवर कमाल उपाय बुरशीनाशक देहात अझिटॉप - श्री. योगेश पडोळ
"चांगल्या उत्पादनासाठी चांगल्या बियाण्यांसह महत्वाचे असते ते वेळोवेळी पिकाची काळजी घेणे. बुरशीजन्य अनेक रोग पिकाच्या आतोनात नुकसानीसाठी कारणीभूत ठरतात म्हणूनच त्यांचे योग्य वेळी योग्य बुरशीनाशकांचा वापर करून नियंत्रण करणे महत्वाचे आहे." असा सल्ला देहात कंपनीचे विक्री अधिकरी श्री योगेश पडोळ यांनी शेतकरी बांधवांना दिला.
जेवखेडा, जिल्हा- जालना येथील देहात केंद्र श्रीराम केएसके येथे दि. 18 जानेवारी 2024 रोजी शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी गावामधून शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शविली होती. या बैठकीत मार्गदर्शन करताना श्री. योगेश पडोळ यांनी देहातच्या अझिटॉप या ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशकाच्या प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक गुणधर्मांविषयी तसेच देहात शेतकऱ्यांसाठी पुरवीत असलेल्या सेवा, पशुखाद्य, पोषण उत्पादने, पीक संरक्षण उत्पादने अशा विविध उत्पादनांविषयी मार्गदर्शन केले. सोबतच खुराक 5000, देहात कॅटरकिल, देहात इल्लिगो, वेटनोकल गोल्ड, साबू अशा विविध देहातच्या उत्पादनांबद्दल आणि सेवांबद्दल विस्तृत माहिती दिली.
देहात अझिटॉप:
- अनेक बुरशीजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अझिटॉप हे ब्रॉड-स्पेक्ट्रम बुरशीनाशक आहे.
- अझिटॉपमध्ये खूप चांगले प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक गुणधर्म आहेत.
- अझिटॉपची दुहेरी प्रभावी क्रिया पिकाच्या अनेक टप्प्यांवर बुरशीजन्य संसर्गाचे नियंत्रण सुनिश्चित करते.
- अझीटॉपमुळे उत्पादन आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारते ज्यामुळे चांगला भाव मिळेल.
डोस -
300 मिली/एकर
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ