कृत्रिम रेतनावेळी जनावरांची घ्यावयाची काळजी (Animal care during artificial insemination)

नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
जास्त दूध देणाऱ्या परदेशी वळूचे वीर्य हे रेतनासाठी 100 टक्के, 75 टक्के, 50 टक्के या प्रमाणात वापरले जाते. प्रामुख्याने गाईमध्ये जर्सी, होल्स्टिन फ्रिजियन आणि म्हशीमध्ये मुन्हा, सुरती रेतमात्रेचा वापर करावा. गायीमध्ये कृत्रिम रेतन मोठ्या प्रमाणात केले जाते. याशिवाय म्हशी, शेळी, मेंढी, वराहामध्ये कृत्रिम रेतन केले जाते. चला तर मग आजच्या भागात जाणून घेऊया की या कृत्रिम रेतनावेळी जनावरांची नेमकी काय काळजी घ्यावी.
कृत्रिम रेतन केव्हा करावे?
- माजावर असलेल्या जनावरांना रेतन केंद्रावर आणल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत विश्रांती द्यावी. त्यानंतर कृत्रिम रेतन करावे.
- कृत्रिम रेतन करताना स्वच्छता फारच महत्त्वाची आहे.
- एआय गनवर लावण्यात येणारा प्लॅस्टिक शीट प्रत्येक वेळेस नवीन वापरण्यासाठी विनंती करावी.
- कृत्रिम रेतन गोठ्यातच करावे.
- अनावश्यक वाहतूक टाळावी.
- गाय व्यायल्यानंतर साधारण 60 ते 75 दिवसांत आणि म्हशी 90 ते 120 दिवसांत माजावर येणे अपेक्षित आहे.
- कालवड 250 किलो तसेच रेडी 275 किलो वजनाची झाल्यानंतर पहिला माज दाखवते. यासाठी पशुपालकाने माजावरील जनावरासंबधित पशुप्रजननाच्या सर्व नोंदी एका वहीत लिहून ठेवणे गरजेचे असते.
- योग्यवेळी कृत्रिम रेतन होण्यासाठी प्रत्येक जनावरांचा अंदाजे माजाचा कालावधी किती आहे याची माहिती शेतकऱ्याला असावी.
- कृत्रिम रेतनासाठी केवळ नियमित माजावर येणारी म्हणजे 21 (+-2) दिवसांनंतर माज चक्रातील जनावरे पात्र ठरतात.
- तज्ञ पशुवैद्यकाकडून रेतन करून घ्यावे.
माजाचा कालावधी आणि कृत्रिम रेतनाची वेळ:
- जनावरात योग्य वेळेस कृत्रिम रेतन केल्यासच गर्भधारणा होवू शकते.
- ही वेळ गाय, म्हशीची जात, त्यांचे आरोग्य आणि वेगवेगळ्या शारीरिक अवस्थेनुसार कमी अधिक वेगळी असू शकते.
- सर्वसाधारण माजाच्या उतरत्या काळात म्हणजेच तिसऱ्या टप्प्यात, माज संपण्यापूर्वी 6 ते 12 तास अगोदर कृत्रिम रेतन अपेक्षित असते.
- कृत्रिम रेतन सहसा दुपारी प्रखर उन्हाच्या वेळेमध्ये करणे टाळावे.
- अचूक रेतनात स्त्रीबीज सुटण्याची वेळ आणि शुक्राणू उपलब्धतेची वेळ जुळून आल्यामुळे फलन होण्याचे प्रमाण वाढते.
- गावठी गाय, म्हशीमध्ये माजाचा कालावधी 12 ते 18 तासांचा असतो.
- या जनावरांमध्ये सकाळी माज दिसून आल्यास दुपार होण्यापूर्वी किंवा माज दिसून आल्यास लगेचच कृत्रिम रेतन करून घ्यावे.
- देशी जातिवंत गाय, म्हैस आणि संकरित गायीमध्ये माजाचा कालावधी 18 ते 24 तासांचा असतो.
- या जनावरांमध्ये सकाळी माज दिसून आल्यास सायंकाळी तसेच सायंकाळी माज दिसून आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी (माज दिसून आल्यास 12 तासानंतर) कृत्रिम रेतन करावे.
- ज्या गायीमध्ये माजाचा कालावधी 30 ते 36 तासांचा असतो.
- या जनावरांमध्ये सकाळी माज दिसून आल्यास दुसऱ्या दिवशी सकाळी (माज दिसून आल्यास २४ तासानंतर) कृत्रिम रेतन करून घ्यावे.
कृत्रिम रेतन प्रक्रिया:
- कृत्रिम रेतनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेतमात्रा नेहमी उणे 196 अंश सेल्सिअस तापमान असलेल्या द्रव नत्र पात्रात साठवतात.
- एका रेतमात्रेत यशस्वी गर्भधारणेसाठी किमान 10 दशलक्ष जिवंत, रचनात्मक निर्दोष म्हणजे डोके, मान व सुरळीत शेपटी असलेले व योग्य हालचालक्षम शुक्राणू असले पाहिजेत.
कृत्रिम रेतनानंतरची काळजी:
- कृत्रिम रेतनानंतर वापरलेल्या रेतमात्रेवरील वळू क्रमांक, वळू जात, सिमेन स्टेशन, वर्ष तसेच रेतन केलेली वेळ, तारीख आणि 45 दिवसांनंतर गर्भ तपासण्याची तारीख यांची नोंद वहीत ठेवावी.
- रेतनानंतर जनावरांना 15 मिनिटे विश्रांती द्यावी. उत्तेजित करू नये, त्यानंतरच मोकळे सोडावे.
- माजावर आलेल्या तसेच कृत्रिम रेतन केलेल्या जनावरांना मारू नये.
- कृत्रिम रेतन केल्यानंतर जनावराच्या अंगावर गार पाणी टाकावे.
- कृत्रिम रेतन केलेली गाय जर 21, 42 आणि 63 दिवसांनंतर परत माजावर आल्या नसतील तर गाभण असण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी पशूतज्ज्ञाकडून गाय तपासून घ्यावी.
- जनावरे गाभण नसेल तर लगेच उपचार चालू करावा. गाभण असेल तर शास्त्रोक्त पद्धतीत आहार चालू करावा, त्यांची योग्य देखभाल घ्यावी.
कृत्रिम रेतनाचे फायदे:
- जास्त दूध देण्याची आनुवंशिक क्षमता असलेल्या वळूचा उपयोग करता येतो.
- प्रत्येक गोपालकास वळू ठेवण्याची गरज भासत नाही. त्यामुळे वळू पोसण्याचा खर्च वाचतो.
- नैसर्गिक प्रजननाने पसरणारे जननाचे रोग कृत्रिम रेतनाने पसरत नाहीत.
- नैसर्गिक प्रजननात वळूचे वीर्य अयोग्य असल्याचे लवकर लक्षात येत नाही परंतु कृत्रिम रेतनात वीर्याची अगोदर तपासणी केली जाते.
- अयोग्य वळूस त्वरित बाहेर काढता येते. त्यामुळे भविष्यातील हानी टाळता येते.
- गर्भधारणा होण्याची निश्चिती असते. वळू रेतमात्रा वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून रेतन करता येते.
तुमच्या कृत्रिम रेतनावेळी तुम्ही जनावरांची कशी काळजी घेता या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. जास्त दूध देणाऱ्या परदेशी वळूचे वीर्य हे रेतनासाठी किती प्रमाणात वापरले जाते?
जास्त दूध देणाऱ्या परदेशी वळूचे वीर्य हे रेतनासाठी 100 टक्के, 75 टक्के, 50 टक्के या प्रमाणात वापरले जाते.
2. कोणत्या जनावरात कृत्रिम रेतन मोठ्या प्रमाणात केले जाते?
गायीमध्ये कृत्रिम रेतन मोठ्या प्रमाणात केले जाते. याशिवाय म्हशी, शेळी, मेंढी, वराहामध्ये कृत्रिम रेतन केले जाते.
3. कृत्रिम रेतन केव्हा करावे?
माजावर असलेल्या जनावरांना रेतन केंद्रावर आणल्यानंतर 15 मिनिटांपर्यंत विश्रांती द्यावी. त्यानंतर कृत्रिम रेतन करावे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
