पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
23 May
Follow

जनावरांची ओळख चिन्हांकित करणे महत्वाचे (Animal Identification is Important)

नमस्कार पशुपालकांनो,

जनावराची वैयक्तिक ओळख ही जनावराचे पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत करते. अचूक नोंदींमुळे पशुपालकाला वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते. यासाठी जनावराची ओळख चिन्हांकित करणे महत्वाचे आहे.

जनावरांना ओळखता यावे यासाठी वापरल्या जाणाऱ्या विशेष चिन्हांना 'ओळख चिन्हे' असे म्हणतात. जेव्हा पशुपालकांकडे जनावरांची संख्या कमी असते, तेव्हा चिन्हांमुळे त्यांना प्रत्येक जनावराला ओळखणे आणि त्यांना एकमेकांपासून वेगळे ठेवणे शक्य होते. कळपाच्या अचूक उत्पादनाच्या नोंदी ठेवण्यासाठी जनावरांची ओळख महत्त्वाची आहे.

ओळख चिन्हांकित करण्याच्या पद्धती (Methods of Identification) :

गोंदणे (टॅटूइंग) :

  • या पद्धतीमध्ये सर्वप्रथम गोंदवल्या जाणाऱ्या भागाला कायमस्वरूपी शाईने किंवा रंगाने धुतले जाते. त्यानंतर त्या भागावर संख्या किंवा अक्षरांची बाह्यरेखा गोंदली जाते.
  • मुख्यतः पितळ किंवा स्टेनलेस स्टीलपासून तयार केलेले टॅटू वापरले जातात.
  • ही पद्धत शेळ्या, प्रौढ जनावरे आणि म्हशींमध्ये अतिशय प्रभावीपणे वापरली जाते. टॅटूइंग विशेषतः आतील कानात केले जाते.

टॅटूइंग करण्याची प्रक्रियाः

  • सर्वप्रथम जनावराला सुरक्षित बांधून त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवले जाते.
  • त्यानंतर गोंदण्यासाठी कानाच्या आतील भागावरील नको असलेले केस काढून टाकतात. त्यामुळे त्वचा पूर्णपणे - स्वच्छ होते.
  • टॅटूइंगचा चिमटा जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ केला जातो.
  • टॅटूइंग चिमट्यावर अक्षरे किंवा संख्येचे आपल्याला इच्छित असलेले लिखाण करावे.
  • पांढऱ्या कागदाच्या तुकड्यावर सर्वप्रथम गोंदावे. त्यामध्ये संख्या किंवा अक्षरांचा क्रम तपासावा. त्यानंतर गोंदविण्यासाठी कानाचे क्षेत्र आहे त्यावर अमिट शाई किंवा रंग लावावा.
  • कानाच्या आतील बाजूस टॅटूइंगचा चिमटा ठेवून थोडासा दाब दिला जातो. त्यानंतर पूर्णपणे दाब देऊन कानावर अंकांचा शिक्का बसतो.
  • हे करताना कानातील रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
  • पंक्चर झालेल्या खुणांमधून येणारे रक्त काढून टाकण्यासाठी स्वच्छ कापसाचा वापर करावा.
  • टॅटू केलेले क्षेत्र स्वच्छ करावे.
  • कानावर कायमस्वरूपी खूण असलेली जखम आठवड्याभरात बरी होते.

फायदेः

  • ही ओळख चिन्हांकित करण्याची सोपी आणि कायमस्वरूपी पद्धत आहे.
  • कोणत्याही वयाच्या जनावरांमध्ये या पद्धतीचा वापर करता येतो.
  • ही पद्धत कमी वेदनादायक आहे.
  • ही पद्धत कायदेशीररीत्या मान्य आहे. सर्व पशुधनासाठी योग्य आहे.

तोटेः

  • टॅटूइंगचे चिन्ह कालांतराने नाहीसे होते.
  • काळ्या रंगाच्या जनावरांमध्ये या पद्धतीचा कमी उपयोग होतो.
  • संख्या वाचण्यासाठी जवळून तपासणी करावी लागते.

टॅगिंग :

टॅगिंगमध्ये कानाला छेदून टॅग लावले जातात. टॅग विशिष्ट प्रकारचे असतात. त्यामध्ये संख्या दिलेली असते.

टॅगचे दोन प्रकार आहेत ते पुढीलप्रमाणे:

  1. स्वतः छेदणारे टॅग,
  2. न छेदणारे टॅग.
  • स्वतः छेदणारे टॅग थेट कानाला लावता येतात.
  • न छेदणारे टॅग लावण्यासाठी कानाला छिद्र करावे लागते.

टॅगिंग करण्याची प्रक्रियाः

  • जनावर सुरक्षित बांधून त्यांच्या हालचाली नियंत्रित कराव्यात.
  • टॅगिंग करावयाच्या जागेवरील केस काढून त्वचा स्वच्छ करावी.
  • टॅगिंगचा चिमटा जंतुनाशक द्रावणाने स्वच्छ करावा.
  • टॅगिंग चिमट्यावर टॅग योग्य स्थितीत ठेवावा. त्यानंतर टॅगिंग चिमटा कानावर योग्य स्थितीत ठेवावा, म्हणजेच तो कानाच्या दोन मुख्य असलेल्या रिब्समध्ये ठेवावा आणि टॅगसाठी जोराने छिद्र करावे.
  • रक्तवाहिन्यांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. टॅग कानावर नीट टोचला आहे का ते तपासून पाहावे.

फायदेः

  • टॅग वापरायला सोपा आहे.
  • टॅग सर्व प्रकारच्या हवामानात वापरता येतात.
  • टॅग स्वस्त आहेत. वाचायला सोपे आहेत.

तोटे :

  • काही वेळा टॅगमुळे कान फाटतात. योग्यरीत्या टॅगिंग न केल्यास ते हरवतात.
  • टॅगिंग करण्यासाठी कायमस्वरूपी चिन्हांकित शाई वापरली जाते. परंतु शाई कालांतराने फिकट होते.

बँडिंग :

  • या पद्धतीमध्ये, लाल-गरम लोह (हॉट आयर्न ब्रँडिंग) किंवा कॉस्टिक केमिकल्स (केमिकल ब्रँडिंग) वापरून जनावराच्या त्वचेवर विशेषतः मांडी, खांद्यावर संख्या किंवा अक्षरांची रूपरेषा ठेवून दाबली जाते.
  • द्रव नायट्रोजन वापरूनही ब्रँडिंग केले जाते त्याला फ्रिझ बॅण्डिंग किंवा कोल्ड बँडिंग म्हणतात.

बॅण्डिंग करण्याची प्रक्रिया:

  • सर्वप्रथम जनावराला घट्ट बांधून त्यांच्या हालचालीवर नियंत्रण आणावे.
  • बॅण्डिंग करायचे जे क्षेत्र आहे त्यावरील केस काढून त्वचा स्वच्छ करून घ्यावी.
  • सर्व जनावरांमध्ये बॅण्डिंग मागच्या चौथऱ्या वरची जी बाजू आहे तेथे केली जाते.
  • डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला बॅण्डिंग करावे.
  • गरम लोखंडी बॅण्डिंग करताना बॅण्डिंगचा लोखंडी रॉडला विशिष्ट अक्षरे किंवा नंबरासह आग लावावी. तो भाग लाल गरम होऊ द्यावा. हे गरम लाल आयर्न बॅण्डेड करण्याचा जायैवर ठेऊन हळूवारपणे दाबावे. त्या नंतर ते काढून टाकावे. जेणेकरून त्वचा अर्धवट जळाल्यामुळे कायमचे चिन्ह तयार होते.
  • जळालेल्या जागेवर जंतूनाशक लावावे, म्हणजे जखम होणार नाही.
  • फ्रिझ बॅण्डिंगमध्ये, द्रव नायट्रोजन द्रावण असलेल्या कंटेनरमध्ये विशिष्ट अक्षर किंवा क्रमांकासह बॅण्डिंग लोह रॉड ठेवावे. त्यानंतर बॅण्डिंग करायचे जे क्षेत्र आहे त्यावर अक्षर किंवा क्रमांक काही सेकंद दाबावा आणि नंतर ते काढून टाकावे.
  • फ्रिझ बॅण्डिंगमध्ये त्वचेवर कोरडे खवले बनतात, ते एका आठवड्यात बरे होतात. त्यानंतर कायमचे चिन्ह तयार होते.

फायदे :

  • बॅण्डिंगमुळे कायमस्वरूपी ओळख चिन्हांकित करता येते.
  • कोल्ड बॅण्डिंगमुळे त्वचेचे मूल्य कमी होत नाही.

तोटे :

  • हॉट बॅण्डिंगमुळे डाग निर्माण झाल्याने त्वचेचे मूल्य कमी होते.
  • कोल्ड बॅण्डिंगपेक्षा हॉट बॅण्डिंग अधिक वेदना देते.

गळ्यातील साखळी:

  • गळ्यातील साखळी किंवा दोरी, दुभत्या जनावरांच्यामध्ये ओळखण्याची एक सामान्य पद्धत आहे.
  • गळ्यातील साखळ्यांना त्या जनावराच्या ओळख क्रमांकाशी संबंधित एक क्रमांकित टॅग जोडलेला असतो.
  • साखळी किंवा दोरी मानेभोवती लावताना जनावराच्या डोक्यावरून न सरकण्या इतपत घट्ट असावी, परंतु लहान जनावरांना सहज श्वास घेता येईल आणि त्यांची वाढ होईल इतकी सैल असावी.
  • गळ्यात साखळ्या लावायला सोप्या असतात. जनावरांना वेदना देत नाहीत. त्या बऱ्यापैकी दिसतात.

फायदे :

  • गळ्यात साखळ्या लावायला सोप्या असतात, जनावरांना वेदना होत नाही.

तोटे :

  • वाढत्या जनावरांची वारंवार तपासणी न केल्यास, साखळी खूप घट्ट झाल्याने जनावरे गुदमरतात.
  • साखळ्या कायमस्वरूपी राहत नाहीत. जनावरांना जेव्हा एकत्र केले जाते तेव्हा गळ्यातील साखळ्या पाहणे कठीण होऊन जाते.

मायक्रो चिप:

  • मायक्रो चिप ही जनावरे ओळखण्याची नवीन पद्धत आहे.
  • कान किंवा शेपटीत मायक्रोचीप बसवतात. यामुळे मालकी किंवा जनावरे कोणत्या ठिकाणची आहेत याची कायमस्वरूपी ओळख होऊ शकते.
  • पशुतज्ज्ञ या पद्धतीची शिफारस करतात, कारण जेव्हा मायक्रो चिप बसविताना जनावरांना वेदना होत नाही.

मायक्रो चिपिंग करण्याची प्रक्रिया :

हायपोडर्मिक सुई वापरून जनावराच्या त्वचेखाली मायक्रो चिप बसवली जाते.

फायदे :

मायक्रो चिप्स कायमस्वरूपी असतात. जनावरांना वेदना होत आही.

तोटे :

  • मायक्रो चिप जनावरांच्या मांसामध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता असते.
  • मायक्रो चिप बसविण्यासाठी विशेष उपकरणाची आवश्यक असते.

ओळख चिन्हांकीत करण्याचे फायदे (Benefits of Identification):

  • वैयक्तिक ओळखीमुळे पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यास मदत होते.
  • अचूक नोंदींमुळे उत्पादकाला वैयक्तिक किंवा संपूर्ण कळपाच्या व्यवस्थापनाबाबत निर्णय घेण्यासाठी पुरेशी माहिती उपलब्ध होते.
  • एखाद्या विशिष्ट जनावराची मालकी दर्शविण्यासाठी किंवा मूळचा कळप सूचित करण्यासाठी देखील जनावराची ओळख महत्त्वाची आहे.
  • पशुपालक जनावरांच्या नोंदी सहज ठेवू शकतात.
  • चिन्हांमुळे मागील नोंदींच्या उपलब्धतेसह जनावरांवर उपचार करण्यात मदत होते.
  • येणाऱ्या प्रजनन हंगामापूर्वी सहजपणे बदली स्टॉक निवडता येतो.
  • जनावरांचे वर्तन आणि हालचालींचा मागोवा घेता येतो.
  • जनावरांची मालकी सांगता येते.
  • विमा दाव्यांसाठी देखील जनावरांची ओळख चिन्हांकित करणे महत्त्वाचे आहे.

या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. तुम्ही तुमच्या जनावरांना चिन्हांकित केले आहे का? कोणत्या पद्धतीने केले आहे? याविषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions)

जनावरांना चिन्हांकित करणे का महत्वाचे आहे?

जनावराचे पालकत्व, जन्मतारीख, उत्पादन नोंदी, आरोग्य इतिहास आणि इतर महत्त्वाच्या व्यवस्थापन माहितीच्या अचूक नोंदी ठेवण्यासाठी जनावरांना चिन्हांकित करणे महत्वाचे आहे.

जनावरांचे टॅगिंग म्हणजे काय?

कानाला छेदून जे टॅग लावले जातात त्याला जनावरांचे टॅगिंग करणे असे म्हंटले जाते. टॅग विशिष्ट प्रकारचे असतात. त्यामध्ये संख्या दिलेली असते.

टॅगिंगचे दोन प्रकार कोणते?

स्वतः छेदणारे टॅग व न छेदणारे टॅग असे टॅगिंगचे दोन प्रकार आहेत.



56 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ