अटल बांबू समृध्दी योजना! (Atal Bamboo Samruddhi Scheme!)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
भारत हा कृषीप्रधान देश आहे. शेतकऱ्यांना शेतीला पुरक व्यवसाय मिळावा यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून नवनवीन योजनांची आखणी करीत असतात. केंद्र सरकारची अशीच एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे अटल बांबू समृद्धी योजना! महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने बांबू लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे. बांबूपासून विविध वस्तू बनविल्या जातात आणि कमी कालावधीत येणारे व कमी पाण्यामध्ये मोठी होणारी ही वनस्पती असल्याने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा यासाठी आजच्या आपल्या या लेखात आपण अटल बांबू समृध्दी योजनेविषयी जाणून घेणार आहोत.
योजनेचे उद्दिष्ट:
बांबू सारख्या कमी कालावधीत मोठी होणारी वनस्पती जास्त उत्पन्न देते. बांबू पासून बनलेल्या वस्तू परदेशी बाजारात अधिक किमतीने विकल्या जातात. त्यामुळे भारतातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीतून एक उत्तम रोजगाराचा मार्ग उपलब्ध करुन द्यावा असे अटल बांबू समृद्धी योजना सुरु करण्यामागे केंद्र व राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.
येथे करा अर्ज
अटल बांबू योजनेसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp या लिंकवर क्लिक करुन अर्ज करु शकता.
योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे:
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- शेतजमीन विक्री करार/मालकी कराराची प्रत
- 7/12 अर्क
- भाडेकरू शेतकऱ्यांचे, भाडे करार किंवा भाडेपट्टी करार
- बँक खात्याची माहिती
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- स्वयं-सहायता गट (SHG), सहकारी संस्था आणि NGO, संस्था नोंदणी फॉर्म/परवाना आवश्यक असेल.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया:
- https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp पोर्टलला भेट द्या आणि अटल बांबू समृद्धी योजना निवडा.
- ऑनलाइन अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, जमिनीची माहिती, बांबूच्या प्रजातींची माहिती आणि बँक खात्याची माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- भरलेल्या अर्जाचे काळजीपूर्वक पूर्वावलोकन करा आणि सर्व तपशील तपासा.
- अटल बांबू समृद्धी योजना अर्ज सबमिट करण्यासाठी सबमिट बटणावर क्लिक करा.
- सबमिट केलेल्या अर्जाची वन अधिकाऱ्यांकडून पडताळणी केली जाईल.
- निवडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या अटल बांबू समृद्धी योजनेंतर्गत बांबूच्या रोपांच्या देखभालीसाठी वार्षिक अनुदान मिळेल.
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया:
- अटल बांबू समृद्धी योजनेचा ऑफलाइन अर्ज महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.
- अर्जातील माहिती काळजीपूर्वक भरा.
- अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अटल बांबू समृद्धी योजनेचा अर्ज सर्व कागदपत्रांसह बांबू विकास मंडळाच्या त्याच जिल्हा कार्यालयात सबमिट करा.
- संबंधित अधिकारी सबमिट केलेल्या अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
- बांबू लागवडीच्या जागेचे ग्राउंड व्हेरिफिकेशनही अधिकाऱ्यांकडून केले जाणार आहे.
तुम्ही अटल बांबू समृध्दी योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका. यासारख्या विविध योजनांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी योजना” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. शासनाद्वारे कोणत्या विभागाच्या वतीने अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे?
महसूल विभागातील रोजगार हमी योजना विभागाच्या वतीने बांबू लागवडीसाठी अटल बांबू समृद्धी योजना राबवली जात आहे.
2. अटल बांबू समृद्धी योजनेचे उद्दिष्ट काय?
भारतातील शेतकऱ्यांना बांबू लागवडीतून एक उत्तम रोजगाराचा मार्ग उपलब्ध करुन द्यावा हे अटल बांबू समृद्धी योजना सुरु करण्यामागे केंद्र व राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे.
3. अटल बांबू योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कुठे करावा?
अटल बांबू योजनेसाठी तुम्ही अर्ज करु इच्छित असाल तर https://intranet.mahaforest.gov.in/forestportal/index.php?option=bambooapp या लिंकवर क्लिक करुन अर्ज करु शकता.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
