पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
27 Nov
Follow

बागायती गव्हाची उशिरा पेरणी

बागायती गहू पिकाची उशिरा पेरणीची शिफारस ही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र काही भागांत 15 डिसेंबरनंतरही गहू पेरणी केली जाते. वास्तविक 15 नोव्हेंबरनंतर उशिरा पेरणी केल्यास पुढील प्रत्येक पंधरवड्यात हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी एक क्विंटलपर्यंत उत्पादनात घट येते. बागायती गव्हाची वेळेवर पेरणी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करण्याची शिफारस आहे. मात्र विविध कारणांमुळे शेतकऱ्यांना शिफारशीत वेळेत पेरणी करणे शक्य होत नाही. या वर्षी जून महिन्यात मॉन्सूनच्या पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे खरिपाच्या पेरण्या जुलै महिन्यात उशिराने झाल्या. परिणामी, खरीप हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन, कापूस पिकांसह अन्य पिकांच्या काढणीस विलंब झाल्याने गहू लागवडीस उशीर होत आहे.43 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ