पोस्ट विवरण
केळी पिकामधील खत व्यवस्थापन (Banana: Fertilizer Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
देव कार्यात अतिशय महत्वाचे स्थान असणाऱ्या केळी या पिकाची भारतातील विविध राज्यांमध्ये शेती केली जाते. दक्षिण भारत - केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, पश्चिम भारत - गुजरात, महाराष्ट्र, पूर्व भारत - आसाम, बिहार येथे लागवड केली जाते. केळीचे निरोगी पीक वाढविण्यासाठी केळी लागवडीच्या योग्य पद्धतींचे पालन करणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे. केळी हे पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा एक चांगला स्रोत आहे, जो कार्बोहायड्रेटचा देखील एक समृद्ध स्रोत आहे आणि त्यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात आहे. आजच्या आपल्या या भागात आपण केळी पिकामधील खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
प्रति झाड 200 ग्रॅम नत्र, 60 ग्रॅम स्फुरद व 200 ग्रॅम पालाश देण्याची शिफारस आहे. रासायनिक खतांचा कार्यक्षमपणे उपयोग होण्यासाठी बांगडी पद्धतीने खोलवर खते देऊन मातीने झाकावीत.
जमिनीतून रासायनिक खत देण्याचे वेळापत्रक:
बेसल डोस:
- शेणखत 6 ट्रॉली + सुपर फॉस्फेट 5 पोती
- 18:46:00 डीएपी (ईफको) 2 पोती + फिप्रोनिल 0.3% जीआर (देहात - स्ले माईट) 5 किलो + मिक्स मायक्रोन्युट्रीयंट्स बॅग (IFC) १ पोते. + बेन्टोनाईड सल्फर (देहात-न्यूट्री) 10 किलो + MOP (महाधन) 2 पोती + अ. सल्फेट 25 किलो + निंबोळी पेंड 2 पोती.
लागवडीच्या वेळी द्यायचे खत:
स्टिमगो अल्ट्रा (देहात न्यूट्री) 3 किलो/एकर (टॉप ड्रेसिंग किंवा पहिल्या सिंचनाच्या वेळी) वापरावे.
नवीन मुळी सुटण्यासाठी:
20 व्या दिवशी
ह्युमिक अॅसिड 500gm
जोमदार व सशक्त प्राथमिक वाढीसाठी:
25 ते 53 दिवस (पुढील तारखांप्रमाणे) : 25,32,39,46,53
19:19:19 (देहात न्यूट्री - NPK) 5 किलो + 40% N (इफको-युरीया) 10 किलो.
60 वा दिवस:
पोटॅशिअम नायट्रेट 13:00:45 (देहात न्यूट्री - KN03) 5 किलो + कॅल्शियम नायट्रेट (महाधन) 10 किलो.
सूक्ष्म अन्नद्रव्ये व मुळी वाढविण्यासाठी:
65 वा व 128 वा दिवस
मायक्रो - Dreep 1 किलो + (टाटा रैलीगोल्ड) 100 किलो
जोमदार व सशक्त द्वितीय वाढ:
71 ते 98 दिवस (पुढील तारखांप्रमाणे) : 71,78,85,92,98
12:61:00 (देहात न्यूट्री - MAP) 5 किलो + युरिया 10 किलो
105 वा दिवस
13:00:45 (देहात न्यूट्री - KN03) 5 किलो + कॅल्शियम नायट्रेट (महाधन) 10 किलो
चौथ्या महिन्यानंतर द्यावयाचा डोस:
एन-एर्जी (देहात न्यूट्री) 20 किलो एकर द्यावे.
मुख्य वाढ:
117 व 125 दिवस
13:40:13 (देहात न्यूट्री - NPK) 10 किलो + युरिया 10 किलो
घड निसवण्यासाठी व जास्त भार येण्यासाठी:
132 ते 160 दिवस (पुढील तारखांप्रमाणे) : 132, 139, 146,153,160
00:52:34 (देहात न्यूट्री - MKP) 5 किलो + युरिया 10 किलो
240 दिवसांनंतर घडांवर:
जिबरेलिक ऍसिड 40% डब्ल्यूएसजी (देहात-अकिलिस जीए) 12.5 ग्रॅम 200 लिटर पाण्यातून फवारावे.
लागवडी नंतर 1, 2, 3 महिने (देहात - बूस्ट मास्टर) हे जैव उत्तेजक 2-3 मिलि प्रति लीटर पाण्यातून द्यावे.
पाणी व्यवस्थापन :
- केळी पिकास ठिबक सिंचन पद्धत अत्यंत उपयोगी आहे.
- बाष्पीभवनाचा वेग, जमिनीची प्रतवारी, वाढीची अवस्था इत्यादी बाबींवर केळीची पाण्याची गरज अवलंबून असते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार केळी पिकात खत व्यवस्थापन केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या केळी पिकात कशाप्रकारे खत व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “बागायती पिके” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. केळी पिकास कोणते हवामान उपयुक्त आहे?
केळी हे उष्ण कटिबंधातील फळपीक असून त्यास उष्ण व दमट हवामान चांगले मानवते.
2. केळीचे पीक कोणत्या जमिनीत घेता येते?
केळीचे पीक मध्यम ते भारी, भरपुर सेंद्रीय पदार्थ असणाऱ्या, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या जमीनीत घेता येते. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 च्या दरम्यान असावा.
3. केळी पिकासाठी योग्य लागवड हंगाम कोणता?
मृग बाग (जून लागवड), कांदे बाग (ऑक्टोबर लागवड), फेब्रुवारी (खान्देश विभागासाठी) हा योग्य लागवड हंगाम आहे.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ