पोस्ट विवरण
सुने
कृषि
भिंडी
कृषी ज्ञान
DeHaat Channel
12 Apr
Follow

भेंडी लागवडीसाठी योग्य कालावधी आणि लागवडीचे संपूर्ण तंत्रज्ञान (Best season for Okra cultivation)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

भेंडीचे उगमस्थान आफ्रिकेमध्ये असून, भारतात भेंडीच्या वेगवेगळ्या अनेक प्रजाती उपलब्ध आहेत. भारतातील जवळ - जवळ सर्वच राज्यांमध्ये भेंडीचे पीक घेतले जाते. भेंडीचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या देशांमध्ये भारत अग्रेसर आहे. महाराष्ट्रातील देखील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी - जास्त प्रमाणात भेंडीची लागवड केली जाते. भेंडीला बाजारात वर्षभर चांगली मागणी असल्यामुळे या पिकापासून किफायतशीर उत्पन्न मिळविता येते. आजच्या आपल्या या लेखात उत्पन्नाचे चांगले स्रोत असणाऱ्या भेंडी पिकाच्या लागवडीविषयीची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.

हवामान (Weather) :

  • भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे.
  • 20 ते 40 अंश.सेल्सिअस तापमान असल्यास बियांची उगवण व झाडांची योग्य वाढ होते आणि फुलगळ होत नाही.
  • 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी तापमानाचा उगवणीवर परिणाम होतो.
  • समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान या पिकासाठी उपयुक्त असते.

भेंडी पीक लागवडीसाठी योग्य कालावधी (Season):

  • खरीप हंगाम : जून - जुलै
  • रब्बी हंगाम : थंडी सुरु होण्यापूर्वी
  • उन्हाळी हंगाम : 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी

जमीन (Soil) :

  • भेंडी पिकाचे पोषण जमिनीच्या वरील थरातून होत असते म्हणून मध्यम भारी ते काळी कसदार जमीन आणि चांगला निचरा होणारी जमीन या पिकाच्या चांगल्या वाढीसाठी उपयुक्त असते.
  • चोपण क्षारयुक्त व चुनखडी युक्त जमिनीत भेंडीची लागवड टाळावी.
  • वारंवार एकाच जमिनीत भेंडी या पिकाची लागवड करू नये.
  • सामू 6 ते 6.8 पर्यंत व क्षारता 0.2 पेक्षा कमी असणाऱ्या जमिनीत भेंडीची लागवड करावी.
  • पाण्याचा निचरा नसलेल्या जमिनीत वाढ खुंटते व फुलगळ होते.
  • हलक्या जमिनीत सेंद्रिय खताचा वापर करावा.

पूर्व मशागत (Land preparation for Okra) :

  • जमिनीची मशागत एक नांगरणी व दोन कुळवाच्या पाळ्या देऊन करावी.
  • जमीन भुसभुशीत करून घ्यावी.
  • एकरी 20 गाड्या शेणखत मिसळून तिसरी कुळवणी करावी.

दर एकरी प्रमाण (Seed Rate) :

  • खरीप हंगामासाठी एकरी 3 किलो
  • उन्हाळी हंगामासाठी एकरी 4 किलो
  • एक किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन ग्रॅम थायरम चोळावे

सुधारीत वाण (Varieties for Okra farming):

  • देहात DHS 1195 & 1197
  • एनएस 801 (नामधारी)
  • वीनस प्लस (गोल्डन सीड)
  • सम्राट (ननहेम्स)
  • सिंघम (बायर)
  • शक्ती (ननहेम्स)
  • राधिका (युपीएल)

लागवड (Cultivation) :

  • भेंडी पिकाची लागवड सरी वरंबा किंवा सपाट वाफ्यावर करतात.
  • खरिपात दोन ओळीतील अंतर 45 - 60 व दोन रोपांतील अंतर 30 - 45 सेमी ठेवावे तर, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी 45 बाय 15 किंवा 60 बाय 20 सेमी अंतरावर पेरणी करावी.
  • मजुरांची अडचण असल्यास पाभरीने पेरणी केली जाते.
  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे व हवामानानुसार 5 - 8 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.

भेंडी पिकात आच्छादनाचा वापर:

  • प्लॅस्टिक आच्छादनाचा वापर केल्यास भेंडी पिकाची वाढ व उत्पादनामध्ये वाढ होते.
  • लागवड अंतर - दोन ओळींमध्ये 2 फूट आणि दोन प्लेट्स 1.5 फूट
  • जमिनीमध्ये ओलावा टिकून राहतो.
  • आच्छादनामुळे अधिक प्रमाणात फुलांची संख्या, उत्कृष्ट प्रकारे फळधारणा, जास्तीचे फुटवे आणि फळांचे वजन वाढून उत्पादनामध्ये वाढ होते.
  • उन्हाळ्यात ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दोन ओळीत सुके गवताचे आच्छादन करावे.

अंतरमशागत:

  • शेतात दोन-तीन वेळा खुरपणी करून झाडांना भर द्यावी.
  • मसाजुरांची टंचाई असल्यास बेसलीन हे तणनाशक 2 ते 2.5 मिली 500 लिटर पाण्यातून पेरणीपूर्वी फवारावे.
  • तणनाशकाची फवारणी करताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा.
  • तणनाशकाच्या फवारणीनंतर एक दिवसाने पेरणी करावी.
  • फळे येणाऱ्या वेळेस रोपांना भर द्यावी.

खत व्यवस्थापन:

सेंद्रिय खते:

  • शेणखत/कंपोस्ट 15 - 20 बैलगाडी/एकर
  • गांडूळ खत 400 - 500 किलो प्रति एकर
  • निंबोळी पेंड 4 गोणी लागवडीवेळी

रासायनिक खते:

  • एसएसपी - 124 किलो, युरिया - 43 किलो, एमओपी - 33 किलो, स्टार्टर 4 किलो हा बेसल डोस पिकाला द्यावा.
  • 25 दिवसांनंतर - युरिया 40 किलो + बोरॉन 14.5% 2 किलो या प्रमाणात द्यावे.
  • पेरणी नंतर हलके पाणी द्यावे.
  • त्यानंतर 5 - 7 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

भेंडी पिकामध्ये आढळणाऱ्या किडी व रोग:

मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी. केवडा,

काढणी व उत्पादन :

  • पेरणी नंतर 35 - 45 दिवसात फुले येतात व त्यानंतर 5 - 6 दिवसात भेंडी तोडणी योग्य होते.
  • कोवळ्या भेंडीची काढणी तोडा सुरु झाल्यास 2 - 3 दिवसाच्या अंतराने काढणी करावी.
  • तोडणीसाठी भेंडी हार्वेस्टचा वापर देखील करता येतो.
  • निर्यातीसाठी 5 - 7 सेमी लांब कोवळ्या एकसारख्या फळाची तोडणी करावी.
  • काढणी सकाळी लवकर करावी.
  • काढणी नंतर शून्य ऊर्जा शीत कक्षा मध्ये भेंडीचे पूर्व शीतकरण करावे.
  • खरिपातील उत्पादन एकरी 4 - 5 टन तर उन्हाळी हंगामात 2.5 - 3 टन पर्यंत मिळते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून भेंडीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या भेंडी पिकाची लागवड कधी करता व पिकाच्या लागवडीकरिता कोणते तंत्रज्ञान वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. भेंडी पिकासाठी उपयुक्त हवामान कोणते?

भेंडी हे उष्ण व दमट हवामानात येणारे पीक आहे. समशीतोष्ण व भरपूर सूर्यप्रकाश असलेले हवामान हे भेंडी पिकासाठी उपयुक्त असते.

2. भेंडी पिकामध्ये आढळणाऱ्या प्रमुख किडी व रोग कोणते?

भेंडी पिकामध्ये मावा, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणारी अळी, भुरी आणि केवडा हे प्रमुख रोग व किडी आढळून येतात.

3. भेंडी पीक लागवडीसाठी योग्य कालावधी कोणता?

भेंडी पीक लागवडीसाठी खरीप हंगामातील जून - जुलै, रब्बी हंगामातील थंडी सुरु होण्यापूर्वीचा कालावधी आणि उन्हाळी हंगामातील 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा कालावधी योग्य आहे.

34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ