पोस्ट विवरण
पानावरील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Betel Leaf : Insects and Management)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रात देव कार्यात सुपारीच्या पानांना विशेष महत्व आहे. भारतात चौका चौकात किंवा हॉटेलच्या बाहेर पानाची टपरी हमखास बघायला मिळते. पानाच्या शेतीला नागवेलीची अथवा पानवेलीची शेती देखील म्हंटले जाते. नागवेलीचे मूळ इंडोनेशियातील जावा बेट मानले जाते. तेथून त्याचा आशिया खंडात व इतर देशात प्रसार झाला व भारत, श्रीलंका, अग्नेय आशियाई देश व आफ्रिकेतील काही देशांत या वेलीची लागवड करण्यात आली. आज भारतामध्ये महाराष्ट्र, गुजरात व बंगालमध्ये नागवेलीची मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. आज आपण याच नागवेलीच्या पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
खवले कीटक (Scale insects) :
खवले किडीची लक्षणे (symptoms of Scale insect):
- या किडी काड्यांतील, पानांतील, देठातील रस शोषून घेतात.
- किडीच्या उपद्रवामुळे पाने अशक्त बनतात.
- मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास वेल व फांद्या मरतात.
- राखाडी, तपकिरी अशा गोल आकाराचे थर पानांवर दिसून येतात.
- हलकी जमीन, पाण्याच्या पाळ्यांतील जास्त अंतर व व्यवस्थापनाकडे केलेले दुर्लक्ष, यामुळे या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतो.
खवले किडीचे व्यवस्थापन (Management of Scale insects):
- लैम्ब्डा-साइहलोथ्रिन 5% ईसी (सिंजेंटा-कराटे)ची एकरी 200 मिली प्रति 200 लिटर पाणी फवारणी करा किंवा
- बुप्रोफेझिन 25% एससी (टाटा-ऍप्लॉउड) ची एकरी 200 मिली प्रति 200 लिटर पाणी फवारणी करा.
कोळी (Mites) :
कोळी कीटकाची ओळख (Identification of Marigold Mites):
- कोळी ही कीड अष्टपाद वर्गातील असून, आकाराने सूक्ष्म असते. साध्या डोळ्यांनी दिसणे कठीण जाते.
- पानांच्या शिराजवळ किंवा बरेचदा सालीवर बारीक खळग्यात ती अंडी घालते.
- प्रौढ लांबट, पिवळे असून, पिल्ले फिक्कट पिवळसर असतात.
- पिले व प्रौढ कोळी दिसायला सारखेच असले, तरी आकार लहान - मोठा असतो.
कोळी कीटकाची लक्षणे (Symptoms of Mites):
- हे कीटक पानाच्या मागच्या बाजूस राहून पेशीतील रस शोषतात.
- प्रादुर्भावग्रस्त पानाच्या कडा खालच्या बाजूस मुडपल्या जातात.
- झाडाच्या खालच्या बाजूची पाने आकाराने मोठी गर्द हिरवी, राठ पण कुडतडलेली दिसतात.
- सर्व साधारणपणे पानाचे देठ लांबलेले आढळतात.
- प्रादुर्भावग्रस्त झाडांची वाढ खुंटते.
- उत्पादनात भारी घट होते.
कोळी कीटकाचे व्यवस्थापन (Management of Mites):
- नियंत्रणासाठी डायफेंथियूरोन 50% डब्ल्यूपी (सिजेंटा - पेगासस) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
- क्लोरफेनापीर 10% एससी (Inteprid - BASF) 300 ते 400 मिली प्रति एकर किंवा
- सायनोपायराफेन 30% (Kunoichi- Insecticide india) 80 ते 120 मिली प्रति एकर किंवा
- पायरिडाबेन 20% डबल्यु/डबल्यु डबल्युपी (हनाबी - गोदरेज) 200 ग्रॅम प्रति एकर किंवा
- फेनपायरॉक्सिमेट 5% एससी (सेडना - टाटा) 120 ते 240 मिली प्रति एकर किंवा
- स्पाइरोमेसिफेन 240 एससी 22.9% डब्ल्यू/डब्ल्यू (बायर - ओबेरॉन) 200 मिलीची प्रति एकर 200 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
पिठ्या ढेकूण (Mealy bugs) :
पिठ्या ढेकूण किटकाची ओळख (Identification of Mealybug) :
- गेल्या काही वर्षांपासून, द्राक्ष पिकावर या किटकाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे.
- प्रौढ मादीचे शरीर अंडाकृती, सपाट आणि मऊ असून रंग पांढरट लालसर असतो.
- डोके आणि पोट स्पष्टपणे वेगळे नसतात.
- मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात जवळपास 600 अंडी घालते. अंडी वाढत्या शेंड्यावर, फळांवर, सालीखाली, जमिनीलगत खोडाभोवती दिसून येतात.
- अंडी अंडाकृती, नारंगी रंगांची असतात.
पिठ्या ढेकूण किटकाची लक्षणे (Symptoms of Mealybug):
- पिठ्या ढेकूण किटक बुंध्यातील, ओलांड्यातील, पानांमधील, कोवळ्या फांदीमधील रसशोषण करतो यामुळे पाने पिवळी पडून सुकून जातात तसेच या किडीच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर पडतो त्यामुळे त्या ठिकाणी मुंग्या तसेच बुरशीची लागण झालेली दिसून येते.
- नवीन फुटीची वाढ खुंटते. नवीन फुटीचे रूपांतर वेलीत न होता यू आकाराच्या आकडीत होते.
- बुरशीमुळे पानांची अन्ननिर्मिती क्रिया मंदावते.
- पिठ्या ढेकूण हा कीटक उष्ण आणि कोरड्या वातावरणात जास्त आढळतो तसेच या किटकाच्या शरीरावर कापसासारखा चिकट थर असल्यामुळे यावर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.
पिठ्या ढेकूण किटकाचे व्यवस्थापन (Management of Mealybug):
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 500 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- बुप्रोफेझीन 25% एससी (एचपीएम-अपोलो) 400 मिली अधिक फिश ऑइल रोझीन सोप 500 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- झाडावरील रोग किंवा किडीच्या हल्ल्यामुळे येणारा ताण दूर करण्यासाठी देहात बूस्ट मास्टर 400 मिली प्रति एकर घाला.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास देहात लोकके 100 मि.लि. प्रति एकर या बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या पानावरील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा. तसेच ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
- सुपारीच्या पानांच्या लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
सुपारीची पाने अधिक पाऊस असलेल्या, सावलीच्या ठिकाणी चांगली वाढतात.
- सुपारीच्या पानांच्या लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
सुपारीच्या पानांच्या लागवडीसाठी चिकणमाती असणारी जमीन योग्य मानली जाते.
- सुपारीची लागवड कधी करावी?
सुपारीची लागवड पावसाळ्यात किंवा पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये करावी.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ