पोस्ट विवरण
सुने
बागवानी
कृषि ज्ञान
पान सुपारी
कृषी ज्ञान
DeHaat Channel
27 May
Follow

सुपारीची शेती (Betel nut crop Cultivation)

नमस्कार शेतकरी बंधु-भगिनींनो,

मसाल्याचे तसेच व्यापारी पीक म्हणून फार पूर्वीपासून आपल्याकडे सुपारीची लागवड केली जाते. भारतात सुपारीला केवळ आपल्या खाण्यातच नव्हे तर पुजा / उपासनेतही विशेष महत्त्व आहे. सुपारीचे झाड तयार झाले की 70 वर्षे भरीव उत्पन्न मिळते. भारतात सुपारीला वर्षभर मोठी मागणी असते. देशात सुपारीची लागवड प्रामुख्याने कर्नाटक, तामिळनाडू, मेघालय, केरळ, आसाम आणि कर्नाटक, पश्चिम बंगाल येथे केली जाते तसेच केरळ, गोवा व महाराष्ट्रात कोकण भागात देखील फार वर्षांपासून सुपारीची लागवड होते. आजच्या या भागात आपण देवकार्यात अतिशय महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सुपारी लागवडीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

सुपारी लागवडीसाठी जमीन (Soil):

 • सुपारीची लागवड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत करता येते, परंतु लागवडीसाठी चिकणमातीची माती अधिक योग्य समजली जाते.
 • सुपारी लागवडीसाठी जमीन 7 ते 8 pH मूल्याची असावी.
 • सुपारी लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.

सुपारी लागवडीसाठी हवामान (Weather):

 • या पिकास दमट आणि मध्यम तापमान मानवते.
 • 10 ते 38 अंश सेल्सिअस असे हवामान सुपारी पिकास मानवते.
 • सुपारीस समुद्राकाठची, वाळूची, गाळाची जमीन तसेच निचरा होणारी जमीन तसेच बारमाही ओलिताची सोय असावी लागते.

सुपारी पिकासाठी लागवड हंगाम (Planting season for Betel nut crop):

 • सुपारीची लागवड जून महिन्यात करावी.
 • अधिक पाऊस पडणाऱ्या भागात सप्टेंबर महिना लागवडीस योग्य ठरतो.

राेपांची निवड :

 • रोपे 12 ते 18 महिने वयाची असावीत.
 • अठरा महिने वयाच्या रोपांना कमीतकमी सहा पाने असावीत.
 • रोपांचा बुंधा जाड आणि उंची कमी असावी.
 • दाट सावलीत तयार केलेली उंच आणि लांब पानांची रोपे निवडू नयेत.
 • उपलब्धतेनुसार जातीची निवड करून लागवड करावी.
 • रोपांची उचल रोपवाटिकेतून पाऊस सुरू झाल्यानंतर जूनमध्ये करावी.
 • रोपांना आधार द्यावा.
 • सावलीची उपाययोजना करावी.
 • कृषी विद्यापीठ किंवा शासकीय मान्यताप्राप्त रोपवाटिकेतून रोपे घ्यावीत.

लागवड (Betel nut Cultivation) :

 • 2.7 x 2.7 मीटर अंतरावर 60x60x60 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत.
 • या अंतरावरील लागवडीत आंतरपिकांची लागवड करता येते.
 • खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा, शेणखत किंवा कंपोस्ट खत 20 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 1 ते 1.5 किलो आणि चांगली माती यांच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा.
 • निवड केलेले रोप मुळाभोवतालच्या मातीसकट वाफ्यातून काढावे.
 • खड्ड्याच्या मध्यभागी लावावे.
 • रोपाभोवताली असलेली माती पायाने दाबून घ्यावी.
 • रोपांची लागवड जूनमध्ये पाऊस सुरू झाल्याबरोबर करावी; मात्र लागवडीच्या ठिकाणी पाणी साचून राहत असल्यास पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये रोपांची लागवड करता येते.
 • रोपांना सुरवातीस चांगल्या वाढीसाठी सावली करावी. यासाठी रोपांच्या चारही दिशांना 10 ते 12 फूट अंतरावर उंच वाढणाऱ्या केळीची लागवड करावी.

निगा :

 • बागेभोवती कुंपण करून रोपांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करावे.
 • रोपे लावलेल्या खड्ड्यात पाणी साचणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • उन्हाळ्यात कडक उन्हापासून रोपांना इजा होणार नाही, याची काळजी घ्यावी.
 • केळीची सावली नवीन रोपांवर कमी पडत असेल, अशा ठिकाणी नारळ झावळ्यांची कृत्रिम सावली करावी.
 • रोपांच्या आजूबाजूला तण वाढू देऊ नये.
 • सद्यःस्थितीत उत्पादन देणाऱ्या बागेला पाणीपुरवठा करणे आवश्‍यक आहे.
 • झाडांना नेहमी व सतत पाणी मिळेल अशापद्धतीने नियोजन करावे.
 • ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फायदेशीर ठरते.
 • ठिबक सिंचन संचाच्या साहाय्याने सुपारीस 10 ते 15 लिटर पाणी प्रतिदिन द्यावे.
 • पाण्याची कमतरता असल्यास झाडाच्या बुंध्यात गवताचे, झावळाचे, प्लॅस्टिकचे आच्छादन करावे.
 • बागेतील सुकलेल्या झावळा, फोकटे, अपरिपक्व सुपारी फळे, कचरा वेळोवेळी गोळा करावा. त्यापासून उत्तम दर्जाचे गांडूळ खत तयार करावे.
 • बुंध्यात मातीची भर द्यावी.

सुपारी पिकासाठी खत व्यवस्थापन (Fertilizer management for Betel nut crop) :

 • 10 ते 20 किलो चांगले कुजलेले शेणखत 5 किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या झाडांना द्यावे.
 • नायट्रोजन 100 ग्रॅम, फॉस्फरस 40 ग्रॅम, पोटॅश 140 ग्रॅम प्रति झाड द्यावे.
 • 5 वर्षापेक्षा कमी वयाच्या झाडांना, वरील खतांपैकी निम्मे खत लागेलं.
 • ही खते जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात द्यावीत.

वाण (Varieties) :

 • श्रीवर्धनी (श्रीवर्धन रोठा)
 • मंगला
 • सुमंगला
 • श्रीमंगला
 • मोहीतनगर
 • कालिकत
 • एसएएस-1
 • हिरेहाल्ली उंच
 • हिरेहाल्ली ठेंगू

सुपारी पिकातील महत्वाच्या किडी व रोग (Important pests and diseases of Betel nut crop) :

 • खवले कीड
 • गेंड्या भुंगा
 • सोंड्या भुंगा
 • कोळे रोग
 • मूळ कूज
 • बांड रोग
सुपारीच्या फळांची काढणी आणि उत्पादन :

 • सुपारीची फळे तयार झाल्यावर त्यांचा रंग नारंगी होतो.
 • फळे तयार झाल्यावर संपूर्ण घड काढावा.
 • ऑक्टोबर ते जानेवारी काळात फळांची काढणी करावी.
 • एका पोफळीपासून दरवर्षी 3 ते 5 किलो सुकी सुपारी मिळते.

सुपारी पिकात घेतली जाऊ शकतात अशी आंतरपीके :

मिरपूड, कॉफी, व्हॅनिला, वेलची, लवंग आणि लिंबूवर्गीय पिके आंतरपीक म्हणून घेता येतात.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार सुपारीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या सुपारी पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. सुपारी लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?

दमट आणि मध्यम तापमान तसेच 10 ते 38 अंश सेल्सिअस असे हवामान सुपारी पिकास मानवते.

2. सुपारी लागवडीसाठी कोणती जमीन योग्य असते?

पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन सुपारीच्या लागवडीसाठी सर्वात योग्य मानली जाते.

3. सुपारी लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा?

सुपारी लागवडीसाठी जमिनीचा सामू 7 ते 8 पर्यंत असावा.

57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ