पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
1 year
Follow

भंडाऱ्यासह सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी

मॉन्सूनपूर्व पावसाने वादळी वाऱ्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भंडाऱ्याला मंगळवारी (ता. २८) सायंकाळी वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने झोडपले. तसेच सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यात देखील सोमवारी आणि मंगळवारी (ता. २८) पावसाने शेतीचे नुकसान केले. यादरम्यान मॉन्सूनपूर्व पावसामुळे प्रचंड उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तर खरीपाच्या लागवडीची जोरदार तयारी सुरू झाली आहे.


57 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ