पोस्ट विवरण
सुने
योजनाएं
शेतकरी योजना
DeHaat Channel
23 Dec
Follow

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

महाराष्ट्रात सन 1990 पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड योजना राबविण्यात येत असून, या योजनेअंतर्गत अर्थसहाय्य टप्प्याटप्प्याने दिले जाते.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी तसेच अनुसूचित जाती जमातीचे शेतकरी ज्यांचे फळबाग लागवडीकरता दोन हेक्‍टर पर्यंत क्षेत्र मर्यादित आहे, ते भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अनुदानास पात्र आहेत.

शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान:

  • अनुदान पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% यानुसार देण्यात येते.
  • लाभार्थी शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% असणे गरजेचे आहे.
  • हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण विहित केल्याप्रमाणे राखणे गरजेचे आहे.
  • अल्प, अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना या योजनेत प्राधान्य दिले आहे.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याची कोंकण विभागात कमीत कमी 10 गुंठे तर जास्तीत-जास्त 10 हेक्टर. तर इतर विभागात कमीत-कमी 20 गुंठे तर जास्तीत-जास्त 6 हेक्टर. जमीन असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे:

  • ठिबक सिंचन संच बसविणे आवश्यक आहे.
  • सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल
  • स्वतःच्या मालकीचा 7/12
  • संस्थात्मक लाभार्थांना योजनेचा लाभ देय नाही.
  • 7/12 वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक
  • परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम 2006 नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
  • इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.
  • अर्ज दाखल करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल ला भेट द्या.

तुम्ही या योजनेचा लाभ घेतला का? तुमची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला पाठवा. याशिवाय, आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून देखील तुम्ही देहातच्या कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता. तसेच भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, तुम्ही तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला विचारू शकता. अशाच इतर योजनांच्या माहितीसाठी देहातशी कनेक्टेड रहा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


67 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ