पोस्ट विवरण
सुने
बैंगन
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
16 Feb
Follow

वांगी लागवड तंत्रज्ञान (Brinjal Cultivation Technology)


वांगी लागवड तंत्रज्ञान (Brinjal Cultivation Technology) 

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

वांगी पिकाची लागवड वर्षभर सर्व हंगामात म्हणजेच खरीप, रब्‍बी आणि उन्‍हाळयातही करता येते हे तर आपल्याला माहीतच आहे. पण मित्रांनो कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात. भारतात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश व इतर राज्यांमध्ये वांगी पिकाची लागवड केली जाते. या पिकाखाली महाराष्‍ट्रातील अंदाजे 28,113 हेक्‍टरी क्षेत्र आहे.

जमीन (Soil for Brinjal Cultivation) : 

  • वांगी हे पीक सर्वप्रकारच्या जमिनीमध्ये येऊ शकते परंतु
  • वांगी या पिकासाठी चांगला निचरा होणारी मध्यम काळी कसदार जमीन उत्तम समजली जाते.
  • नदीकाठच्या गाळवट जमिनीत वांग्याचे भरपूर उत्पादन येते, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.

हवामान (Weather for Brinjal Cultivation) :

  • संकरित जातीच्या क्रांतीमुळे वांगी हे पीक सर्व प्रकारच्या हवामानात उत्तमप्रकारे घेता येते.
  • वांगी या पिकाला कोरडे आणि थंड हवामान चांगले मानवते.
  • ढगाळ हवा आणि एकसारखा पडणारा पाऊस पिकाला अनुकूल नाही. अशा हवामानात कीडी-रोगांचा फारच उपद्रव होतो.
  • सरासरी 13 ते 21 अंश सेल्सियस तापमानात हे पीक चांगले येते.
  • महाराष्ट्रातील हवामानात जवळपास वर्षभर वांग्याचे पीक घेता येऊ शकते.

वांग्‍याची लागवड तीनही हंगामात करता येते ती खालीलप्रमाणे (Brinjal can be cultivated in all three seasons as follows) :

  • खरीप बियांची पेरणी जूनच्‍या दुस-या आठवडयात आणि रोपांची लागवड जूलै, ऑगस्‍टमध्‍ये केली जाते.
  • रब्‍बी किंवा हिवाळी हंगामातील बियांची पेरणी सप्टेंबर अखेरीस करतात आणि रोपे ऑक्टोबर-नोव्‍हेंबरमध्‍ये लावतात.
  • उन्‍हाळी हंगामातील बियांची पेरणी जानेवारीच्‍या दुस-या आठवडयात पेरून रोपांची लागवड फेब्रुवारीत करतात.
  • वांगी साधारणपणे रोपांपासून घेतली जातात. रोपे किंवा बियाणे थेट शेतात पेरली जाऊ शकतात.
  • रोपे 4-6 आठवड्यांची झाल्यावर आणि 4-6 पाने असताना लावण्यासाठी तयार असतात.
  • सर्वसाधारणपणे, मातीचे तापमान 18-20 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचल्यावर वांग्याची लागवड करावी.

लागवडीसाठी वाण निवडताना लक्षात ठेवायच्या गोष्टी (Things to keep in mind while selecting Brinjal varieties for planting):

  • वांग्याच्या लागवडीसाठी सुधारित किंवा संकरित वाण निवडताना ठराविक बाबींचा विचार करणे महत्वाचे असते.
  • प्रामुख्याने त्या परिसरातील लोकांची मागणी असणारे वाण तसेच बाजारपेठेत हमखास चांगला भाव मिळणारे वाण निवडणे गरजेचे असते.
  • निवडलेले वाण शक्यतो भरपूर उत्पादन देणारे व रोग आणि किड यांना कमी प्रमाणात बळी पडणारे असावे व तेथील हवामानाशी मिळत-जुळतं घेणारे वाण निवडणे महत्वाचे असते.
  • वांगी पिकाची लागवड करताना प्रामुख्याने सुधारीत व संकरित जातीची निवड, रोपवाटिका व्यवस्थापन, लागवड पध्दत, खत व पाणी व्यवस्थापन व पीकसंरक्षण या बाबी फारच महत्वाच्या आहेत.
  • महाराष्ट्रात वांगी पिकाच्या बऱ्याच जातींची लागवड केली जाते.
  • वेगवेगळया विभागात रंग व आकारानुसार तसेच काटेरी व बिनकाटेरी विविध जाती लावल्या जातात.

वाण (Brinjal varieties) :

  • जांभळी पांढरी - काटेरी वाण : कल्पतरू - महिको, केईपीएच 218 - कुमार बायोसीड
  • जांभळी, पांढरी हिरवट - काटेरी वाण : महिको110-महिको, अजय - अंकुर
  • हिरवे जांभळे - काटेरी वाण : राकेश - अंकुर
  • हिरवे पांढरे - काटेरी वाण : अंकुर - पन्ना
  • जांभळे पांढरे - विना काटेरी वाण : महिको11
  • जांभळी - विना काटेरी वाण : सीमा 2 - अ‍ॅडवंटा, भटाई - अंकुर
  • गडद जांभळी - विना काटेरी वाण : 202 - केईपीएच , सायली - अंकुर
  • हिरवे - विना काटेरी वाण : कीर्ती - अंकुर, हर्षल - अंकुर
  • हिरवे जांभळे - विना काटेरी वाण : विजय - अंकुर

बियाण्यांचे प्रमाण (Seeds) :

जास्त वाढणा-या किंवा संकरित जातीसाठी जातीसाठी 60 ग्रॅम प्रति एकर बी पुरेसे होते.

रोपवाटिका (Nursery) :

  • वांग्याची रोपे गादीवाफ्यावर तयार करतात गादीवाफे 3x1 मी अंतराचे आणि 10-15 सेमी उंच करावेत गादीवाफ्याभोवती पाणी देण्यासाठी सरी ठेवावी.
  • एक हेक्टर वांगी लागवडीसाठी अश्या 15-10 वाफ्यांमधील रोपे पुरेशी होतात वांग्याच्या एक हेक्टर लागवडीसाठी 400-500 ग्राम बियाणे पुरेसे असते मात्र त्यापेक्षा जास्त म्हणजे 800-1000 ग्राम बियाणे पेरून अधिक रोपे तयार करून ठेवावीत म्हणजे काही रोपे न जगल्यास ही रोपे नांग्या भरण्यासाठी वापरता येतात.
  • गादीवाफ्यावरील रोपे 12-15 सेमी उंच झाल्यावर म्हणजे 6-8 पानांवर आल्यावर लावणीस तयार होतात.
  • बी पेरल्यापासून साधारणतः चार ते पाच आठवड्यात रोपे लागवडीसाठी तयार होतात बियांची उगवण होईपर्यंत वाफ्यांना सुरुवातीला झारीने आणि नंतर वाफ्याच्या भोवती असलेल्या सरीमधून गरजेनुसार पाणी द्यावे.

रोपांची लागवड (Cultivation of Brinjal) :

  • रोपलागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करुन चांगली मशागत करावी व शेणखत मिसळावे व जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य अंतरावर सऱ्या वरंबे पाडावेत, हलक्या जमिनीत 2.50 फूटx2.5 फूट, जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी 3 फूटx3 फूट अंतर ठेवावे.
  • मध्यम किंवा काळया कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 3 फूटx2.5 फूट अंतर ठेवावे.

खत व्यवस्थापन (Brinjal fertilizer Management) :

  • जमिनीच्या मगदुराप्रमाणे खतांच्या मात्रांचे प्रमाण कमी जास्त असू शकते. महाराष्ट्राच्या मध्यम काळया जमिनीसाठी एकरी 24 किलो नत्र, 8 किलो स्फुरद व 8 किलो पालाश द्यावे.
  • तसेच एनपीके 10:26:26 (इफको) 50 किलो, युरिया - 20 किलो, सल्फर - 4 किलो, स्टार्टर (देहात) 4 किलो आणि एन-एर्जी (देहात) 10 किलो चा बेसल डोस द्या.
  • संपूर्ण स्फूरद व पालाश व अर्धे नत्र लागवडीच्या वेळी आणि उरलेले अर्धे नत्र लागवडीनंतर तीन समान हप्त्यात विभागून दयावे.
  • पहिला हप्ता लागवडीनंतर एक महिन्याने, दुसरा हप्ता त्यानंतर एक महिन्याने आणि तिसरा शेवटचा हप्ता लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी द्यावा.

आंतरमशागत:

  • खुरपणी करुन पिकातील तण काढून टाकावे.
  • लागवडीनंतर 30 ते 40 दिवसांनी रोपांना मातीची भर द्यावी.
  • वेळोवेळी खुरपणी करुन पीक स्वच्छ ठेवावे.
  • पाण्याची पाळी, जमीनीचा प्रकार व हवामान यावर अवलंबून असते.
  • खरीप हंगामातील पिकास 10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळया द्याव्यात.
  • रब्बी आणि उन्हाळी पिकांस रोप लावणीनंतर लगेच पाणी द्यावे.
  • दुसरे पाणी 3 ते 4 दिवसांनी द्यावे. त्यानंतर हिवाळयात 8 दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळयात 5 ते 6 दिवसांनी पाणी द्यावे.
  • फुले येण्याचा काळ व फळे पोसण्याच्या काळात पाण्याचा ताण देवू नये. तसेच वेळच्यावेळी पिकास गरजेनुसार पाणी द्यावे म्हणजे चांगले उत्पादन मिळेल.

किड व रोग (Brinjal Insects and Diseases) :

वांगी पिकावर प्रामुख्याने तुडतुडे, मावा, पांढरीमाशी, व कोळी या रसशोषक किडी आणि शेंडा व फळे पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. तसेच बोकड्या किंवा पर्णगुच्छ व मर हे रोग दिसून येतात.

काढणी व उत्पादन (Brinjal Harvesting and production) :

  • रोप लावणीनंतर 10 ते 12 आठवडयांनी फळे तयार होतात.
  • फळे पूर्ण वाढून टवटवीत आणि चकचकीत असतानाच काढणी करावी.
  • 4 ते 5 दिवसांच्‍या अंतराने 10 ते 12 वेळा वांग्‍याची तोडणी करता येते.
  • वांग्‍याची काढणी साधारणपणे तीन ते साडेतीन महिने चालू राहते.
  • वांगी पिकाचे सरासरी एकरी उत्‍पादन जाती परत्‍वे 80 ते 100 क्विंटल पर्यंत येते.

तुम्ही तुमच्या वांगी पिकाची लागवड करताना कोणते तंत्र अवलंबता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. ही माहिती अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी पोस्ट लाईक आणि शेयर करायला विसरु नका.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

  1. वांगी पिकाची लागवड कोणत्या हंगामात करतात?

वांग्याचे पिक खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात घेता येते. कोरडवाहू शेतीत आणि मिश्रपीक म्‍हणूनही वांग्‍याची लागवड करतात.

  1. वांगी पिकाचा खोडवा घेता येतो का?

‘वांगी’ पिकाचा खोडवा वर्षभर यशस्वीरित्या घेता येतो.

  1. कोणत्या पिकानंतर वांगी घेऊ नये?

बटाटा, कांदा, टोमॅटो, मिरची पिकानंतर वांगी घेऊ नये, करणा कॉलर रॉट सारखे रोग होण्याची शक्यता असते.

39 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ