पोस्ट विवरण
सुने
ब्रोकोली
कृषि
कृषि ज्ञान
कृषी ज्ञान
DeHaat Channel
2 Oct
Follow

ब्रोकोलीची सुधारित लागवड (Broccoli Crop Cultivation with Improved Techniques: Brokoli Lagvad)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!

ब्रोकोली ही जरी विदेशी पिक असले तरी त्याची शेती भारतीयांसाठी एक वरदान ठरू शकते. कारण भारतीयांच्या आहारात आता ब्रोकोलीचा वापर वाढतच चालला आहे त्याच प्रमुख कारण म्हणजे ब्रोकोलीमध्ये असणारी जीवनसत्वे. भारतात ब्रोकोलीची लागवड हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्‍मीर, नीलगिरी हिल्स, उत्तर मैदानी प्रदेश आणि महाराष्ट्र आदी ठिकाणी होते. महाराष्ट्रात ब्रोकोलीची लागवड लहान क्षेत्रावर केली जाते. चला तर मग जाणुन घेऊया या ब्रोकोलीच्या लागवडिविषयीची माहिती.

ब्रोकोली लागवडीसाठी योग्य हवामान (Suitable Temperature for Broccoli Cultivation):

  • ब्रोकोलीला थंड आणि दमट हवामानाची आवश्यकता असते.
  • दिवस तुलनेने कमी असतील त्या म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसात ब्रोकोलीच्या फुलांची वाढ जास्त होते.
  • ज्या भागात पावसाचे प्रमाण कमी आहे तेथे देखील ब्रोकोली लागवड करता येते.
  • फुल निघण्याच्या वेळी उच्च तापमानामुळे फुले खवलेदार, पानेदार आणि पिवळी होतात.
  • महाराष्ट्रातील पाचगणी, महाबळेश्‍वर, प्रतापगड आदी भागांत उन्हाळ्यातही लागवड यशस्वी होते

ब्रोकोली लागवडीसाठी लागणारी जमीन (Suitable Soil for Broccoli Cultivation):

  • ब्रोकोलीचे पिक हे कोणत्याही जमिनीत घेतले जाऊ शकते.
  • चांगल्याप्रकारे पाण्याचा निचरा होणारी, माध्यम रेती मिश्रित जमीन लागवडीसाठी योग्य मानली जाते.
  • जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 च्या मध्ये असावा.
  • ब्रोकोली हलक्या जमिनीतही येऊ शकते मात्र त्यात पुरेशा प्रमाणात शेणखत किंवा इतर सेंद्रिय खतांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो.

ब्रोकोली लागवडीचा हंगाम (Suitable season for Broccoli Cultivation):

  • ब्रोकोली लागवडीसाठी हिवाळा उत्तम मनाला जातो.
  • उत्तर भारतात खासकरून मैदानी प्रदेशात हिवाळ्याच्या दिवसात ब्रोकोली लागवडीचा सल्ला दिला जातो.
  • ब्रोकोलीच्या व्यवस्थित वाढीसाठी व गड्ड्यांच्या चांगल्या पोषणासाठी तापमान 21-26 डिग्री सेल्शिअस दरम्यान असावे.

जमिनीची पूर्वमशागत:

  • जमिनीची पूर्वमशागत करण्यासाठी जमीन ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उभी- आडवी नांगरून (अंदाजे 40 सें.मी. खोल) ढेकळे फोडून भुसभुशीत करावी.
  • शेवटच्या कुळवणी वेळी एकरी 12 ते 15 मे. टन. चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून टाकावे.

ब्रोकोली लागवड पद्धती (Broccoli Cultivation):

हरितगृह, पॉली हाऊस तसेच शेड नेट खाली ब्रोकोलीचे पिक घेता येते. सध्या, ब्रोकोली हायड्रोपोनिक पद्धतीने वाढवण्याची पद्धत चांगली मानले जाते, ज्यामुळे लागवडीचा खर्च देखील कमी होईल आणि उत्पादन देखील चांगले येईल.

रोपे तयार करणे :

  • ब्रोकोली लागवडीसाठी प्रति एकर 19300 रोपे लागतात तर ही रोपे तयार करण्यासाठी 200 ग्रॅम बियाणे लागते.
  • ब्रोकोलीची फ्लॉवर प्रमाणे रोपवाटिका तयार करावी लागते.
  • ब्रोकोलीची रोपवाटिका तयार करण्याची योग्य वेळ ही ऑक्टोबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात असते.
  • पर्वतीय प्रदेशात ब्रोकोलीची ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात रोपवाटिका तयार करावी

गादी वाफे पद्धत:

  • गादी वाफ्यावर बी पेरून रोपे तयार करून लागवड करतात.
  • गादी वाफे एक मी. रुंद, 20 सें.मी. उंच, 10 मी. लांब आकाराचे तयार करण्यासाठी प्रथम जमीन नांगरून, कुळवून भुसभुशीत करून घ्यावी.
  • प्रत्येक गादी वाफ्यात अंदाजे 10 ते 15 किलो चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळून घ्यावे.
  • वाफ्याच्या रुंदीच्या समांतर 5 सें.मी. अंतरावर 2 सें.मी. खोलीच्या रेषा आखून त्यामध्ये अतिशय पातळ प्रमाणात बियांची पेरणी करावी.
  • बारीक गाळलेल्या शेणखताने बी झाकून घ्यावे.
  • बी पेरलेल्या गादी वाफ्यांवर पाणी दिल्यानंतर प्लॅस्टिक पेपरने झाकून घ्यावे.
  • बियांची उगवण सुरू झालेली दिसताच वाफ्यांवरून प्लॅस्टिक पेपर काढून टाकावा.
  • बिया सहा ते सात दिवसांत उगविलेल्या दिसतात.
  • एकरी लागवडीसाठी संकरित जातीचे बियाणे 125 ग्रॅम लागते.
  • रोपवाटिकेत रोपांच्या वाढीच्या काळात तापमान 20 ते 22 अंश से. असणे आवश्‍यक आहे, म्हणजे बियांची उगवण व रोपांची वाढ व्यवस्थित होईल.

प्लॅस्टिक ट्रेमध्ये रोपेनिर्मिती:

  • या पद्धतीत ट्रेमध्ये कोकोपीट मध्यम भरून बी टाकावे.
  • वरीलप्रमाणेच ट्रेमधील बी उगवून आल्यावर रोपांची काळजी घ्यावी.
  • पुनर्लागवडीसाठी रोपे 20-25 दिवसांत तयार होतात. म्हणजे रोपांना 5-6 पाने असून रोपांची उंची 12 ते 15 सें.मी. असते.

सुधारित जाती (Varieties for Broccoli Cultivation):

    • नामधारी 50 ब्रोकोली
    • IRIS हायब्रिड भाजीपाला बियाणे ब्रोकोली
    • IRIS CALI-09 ब्रोकोली बियाणे
    • TAHOE RZ F1 ब्रोकोली - रिक्क झवान
    • ऊर्जा उत्सव - ब्रोकोली F-1 संकरित बियाणे


आंतरमशागत :

  • पुनर्लागवडीनंतर 30 दिवसांनी वाफ्यावरील गवत-तण काढून माती 3-4 सें.मी. खोलीपर्यंत खुरप्याने हलवून घ्यावी.
  • माती हलविताना रोपांना मातीचा आधार द्यावा.
  • पुन्हा 20-25 दिवसांनी खुरपणी करून वाफे तणमुक्त व स्वच्छ ठेवावेत.
  • हरितगृहातील व खुल्या क्षेत्रात गादी वाफ्यावर केलेल्या लागवडीसाठी लागवडीपूर्वी प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन फायदेशीर ठरते, त्यामुळे तणांची वाढ होण्यास प्रतिबंध होतो, जमिनीचे तापमान नियंत्रित राहण्यास मदत होते.
  • झाडांची वाढ व उत्पादन समाधानकारक मिळून उत्तम प्रतीचे गड्डे मिळतात.

पाणी व्यवस्थापन (Water Management in Broccoli):

  • पिकाला ठिबक पद्धतीने किती व कशा प्रकारे पाणी द्यावे ही बाब महत्त्वाची आहे.
  • पिकाला दररोज किती लिटर पाण्याची संभाव्य गरज आहे हे प्रथम निश्चित करून दररोज पाणी देण्याचा कार्यक्रम निश्चित करावा.

ब्रोकोली पिकात आढळणारे कीटक (Pests in Broccoli):

  • काळी माशी
  • मावा
  • चौकोनी ठिपक्यांचा पतंग

ब्रोकोली पिकात आढळणारे रोग (Diseases in Broccoli):

  • रोपे कोलमडणे
  • घाण्या रोग
  • करपा किंवा काळे डाग
  • भुरी रोग
  • केवडा रोग

काढणी व उत्पादन (Harvesting and Production of Broccoli):

  • वाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा 90 ते 95 दिवसांत लागवडीपासून काढणीस तयार होतो.
  • विक्रीच्या दृष्टीने व चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने गड्ड्यांचा व्यास 8 ते 15 सें.मी. असतानाच काढणी करावी.
  • गड्डा घट्ट असताना त्यातील कळ्यांचे फुलात रूपांतर होण्यापूर्वीच काढणी करणे महत्त्वाचे. अशा गड्ड्यांची प्रत अतिशय चांगली असून, या अवस्थेत गड्ड्यातील फुले उमलत नाहीत.
  • काढणी सकाळी अथवा सायंकाळी करावी.
  • तयार गड्डे साधारणपणे 15 सें.मी. लांबीचा दांडा ठेवून कापून घ्यावेत.
  • मुख्य गड्डा काढून घेतल्यानंतर खाली पानांच्या बेचक्‍यांतून येणारे गड्डे पोसण्यास वाव मिळतो.
  • प्रत्येक गड्ड्याचे वजन सरासरी 300 ते 400 ग्रॅम असणे आवश्‍यक आहे.
  • एकरी 40 गुंठे क्षेत्रातून सुमारे 8 ते 9 टनांपर्यंत गड्ड्यांचे उत्पादन मिळते.
  • पारंपरिक लागवड पद्धतीपेक्षा गादी वाफ्यावर लागवड, ठिबक सिंचन तसेच त्याद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास चांगल्या प्रतीचे गड्डे काढणीस मिळतात.
  • आकारमान किंवा वजनाप्रमाणे प्रतवारी करून गड्डे स्वच्छ करावेत.
  • वायुविजनासाठी छिद्रे असलेल्या कोरूगेटेड बॉक्‍समध्ये ते 3 किंवा 4 थरांपर्यंत भरावेत.
  • पॅकिंग केलेल्या बॉक्‍सेसची रात्री (तापमान कमी असल्याने) वाहतूक करावी किंवा प्लॅस्टिक ट्रेमध्ये सभोवती बर्फ ठेवून तापमान कमी करून क्रेटमधून वाहतूक करावी.
  • पॅकिंग बॉक्‍सेसमधील तापमान वाढल्यास गड्ड्यांचा हिरवा रंग फिकट पिवळसर होऊन गड्ड्यांची प्रत कमी होते.

अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य हवामानानुसार ब्रोकोली लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या ब्रोकोली पिकाच्या लागवडीकरता कोणते तंत्र वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):

1. ब्रोकोली पिकाची लागवड कधी करावी?

ब्रोकोली पिकाची लागवड हिवाळ्यात करावी.

2. ब्रोकोलीचे पीक किती दिवसात येते?

वाणपरत्वे ब्रोकोलीचा गड्डा लागवडीपासून 90 ते 95 दिवसांत काढणीस तयार होतो.

3. ब्रोकोली पिकात आढळून येणारे मुख्य रोग कोणते?

ब्रोकोली पिकात रोपे कोलमडणे, घाण्या रोग, करपा किंवा काळे डाग, भुरी व केवडा हे मुख्य रोग आढळून येतात.

35 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ