पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
10 Jan
Follow

चार वर्षांनंतर पुसेगावात भरणार खिल्लार जनावरांचा बाजार

चार वर्षांनंतर पुसेगावात भरणार खिल्लार जनावरांचा बाजार

श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेदरम्यान भरणारा बैल बाजार लम्पी आणि इतर आजारांच्या सावटामुळे चार वर्षे भरला नव्हता. पश्चिम महाराष्ट्रात जातिवंत खिल्लार जनावरांसाठी प्रसिद्ध असलेला हा बैल बाजार ट्रस्ट यंदा मोठ्या प्रमाणावर भरविणार असल्याने राज्यातील शेतकरी आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लोकांसाठी पर्वणी ठरणार आहे. पुसेगावच्या बैल बाजाराला 75 वर्षांची परंपरा आहे. या ठिकाणी येणारे बैल हे उत्कृष्ट दर्जाचे असतात, अशी ख्याती आहे. बाजारात जातिवंत पशुधनाची संख्या उल्लेखनीय असते. त्यामुळे महाराष्ट्रासह कर्नाटक राज्याच्या अनेक भागांतून शेतकरी तसेच व्यापारी खिल्लार बैल आणि पशुधनाच्या खरेदी विक्रीसाठी या ठिकाणी मोठ्या संख्येने येतात.


50 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ