कोबी लागवड तंत्र व ड्रीप द्वारे खत व्यवस्थापन (Cabbage cultivation techniques and fertilizer management through drip)

नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
महाराष्ट्रामध्ये कोबीवर्गीय भाज्यांमध्ये कोबी ही भाजी अतिशय लोकप्रिय आहे. तसेच जवळ-जवळ सर्व जिल्ह्यात या पिकाची लागवड केली जाते. हे पिके थंड हवामानात होणारे असून सुधारित तसेच संकरित जातीच्या उपलब्धतेमुळे त्याची लागवड समशीतोष्ण आणि उष्ण हवामानात यशस्वीपणे करता येते. आजच्या या भागात आपण कोबी लागवड तंत्र व ड्रीप द्वारे खत व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
जमीन (Suitable Soil for Cabbage cultivation):
- कोबीच्या लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, मध्यम ते भारी जमीन निवडावी.
- जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.
हवामान (Suitable Weather for Cabbage cultivation):
- कोबी एक थंड हवामानातं येणारी वनस्पती आहे. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक असते.
- कोबीच्या जाती तापमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्यामुळे त्यांची निवड त्या-त्या हवामानाच्या गरजेनुसार करावी.
- अति प्रमाणात दंव कोबी पिकाचे मोठे नुकसान करते.
- पिकाच्या वाढीच्या काळात तापमान खाली गेल्यास गड्डा अतिशय लहान तयार होतो.
बियाण्याचे प्रमाण:
- एक एकर लागवडीसाठी हळव्या, निमगरव्या या जातींचे 240 ते 300 ग्रॅम बी लागते.
- संकरित वाणांचे बी 120 ग्रॅम लागते.
लागवड (Cabbage Cultivation):
- पिकाची रोपे तयार करताना गादी वाफ्यावर तयार करावी.
- वाफ्याच्या रूंदीस समांतर 12 ते 15 सेमी अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे.
- बियांची उगवण होईपर्यंत झारने पाणी द्यावे.
- बी पेरल्यापासून 4 ते 5 आठवडयात रोपे लागवडीस तयार होतात.
- लागवडीपूर्वी सरी वरंबे अथवा वाफे यांना खतांचा मात्रा द्यावी.
- लवकर येणा-या जातींकरीता 45 बाय 45 सेमी वर तर उशिरा येणा-या जातींना 45 बाय 60 सेमी किंवा 60 बाय 60 सेमी अंतरावर लागवड करावी.
जाती:
- वंडर बॉल (सेमिनीस)
- सेंट (सेमिनीस)
- BC-90 (सिजेंटा)
- BC-76 (सिजेंटा)
- टोकिता ग्रीन पेस्ट्रो 8228
खत व्यवस्थापन:
- लागवडीच्या वेळी युरिया 25 किलो + 12:32:16 50 किलो मायक्रोनुट्रीएंट 10 किलो + बोरॉन 1 किलो + सल्फर 5 किलो द्यावे.
- लागवडीनंतर 20 दिवसांनी युरिया 25 किलो + 10:26:26 50 किलो बोरॉन 1 किलो प्रति एकरी द्यावे.
कोबी पिकात ड्रिप द्वारे करावयाचे खत व्यवस्थापन:
- कोबी पिकाच्या लागवडीनंतरच्या पाचव्या दिवशी ड्रीपच्या साहाय्याने 98% पोटॅशिअम ह्युमेट (देहात न्यूट्री-पंच) एकरी 500 ग्रॅम, इनटेक (ट्रेड कॉर्पोरेशन इंटरनॅशनल S.A. Unipersonal) 500 मिली, किश रूट हेल्थ (फिशफा बायोजेनिक्स) 14 ग्रॅम प्रती एकर या प्रमाणात लागवडीनंतर खत ड्रीपने द्यावे.
- कोबी लागवडीनंतरच्या आठव्या दिवशी 0-40-34 (कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच-बासाफर प्लस) 500 ग्रॅम या प्रमाणात प्रति एकर खत ड्रीपने द्यावे.
- तिसरी फवारणी ही 10 व्या दिवशी करावी. या फवारणीमध्ये सल्फरसह पाण्यात विरघळणारे नायट्रोजन खत. 21% अमोनियम. (कॉम्पो एक्स्पर्ट जी.एम.बी.एच-नोव्हाटेक N-21) 2.50 किलो आणि सिलॉन (धनश्री-सी6 एनर्जी) 500 मिली एवढ्या प्रमाणात खत कोबी पिकासाठी ड्रीपने पुरवावे.
- कोबी पिकाची चौथी फवारणी 20 व्या दिवशी करायची आहे. त्यासाठी 0:9:46 (ट्रेड कॉर्पोरेशन इंटरनेशनल SAUnipersonal - न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड) 2.5 किलो, बासफोलियर केल्प SL (COMPO EXPERT) 500 मिली या प्रमाणात प्रती एकर ड्रीप च्या साहाय्याने कोबीला खत द्यावे.
- त्यानंतर पाचव्या फवारणीसाठी हायड्रोस्पीड CaB (COMPO EXPERT) 2.50 किलो, सिलॉन (धनश्री-सी6 एनर्जी) 500 मिली या प्रमाणात प्रती एकर ड्रीपच्या सहाय्याने लागवडीनंतर 25 व्या दिवशी कोबीला खत द्यावे.
- कोबीच्या लागवडीनंतर 30 व्या दिवशी 14:48 नोव्हाटेक (COMPO EXPERT) 2.5 किलो या प्रमाणात प्रती एकर ड्रीपने खत द्यावे.
- त्यानंतर कोबीची सातवी फवारणी 40 व्या दिवशी करावी. त्या फवारणीसाठी 6:27:00 न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड (रोवेन्सा नेक्स्ट) 2.50 किलो, 98% पोटॅशिअम ह्युमेट (देहात न्यूट्री-पंच) एकरी 500 ग्रॅम, इनटेक (500 मिली) या प्रमाणात प्रती एकर कोबीला देण्यात यावे.
- त्यानंतची आठवी फवारणी ही कोबी लागवडीनंतरच्या 50 व्या दिवशी करावी. त्यासाठी 14:48 नोव्हाटेक (COMPO EXPERT) 2.50 किलो हे प्रति एकर या प्रमाणात ड्रीप च्या साहाय्याने पिकाला द्यावे.
- त्यानंतर जी फवारणी कराची त्यासाठी 14:8:30 नोव्हाटेक (COMPO EXPERT) 2.5 किलो प्रती एकर या प्रमाणात कोबी लागवडीच्या 60 व्या दिवशी ड्रिप ने द्यावे.
- शेवटचे खत हे कोबी लागवडीच्या 70 व्या दिवशी द्यावे. त्यामध्ये 0:7:46 न्यूट्रीकॉम्प्लेक्स गोल्ड (ट्रेड कॉर्पोरेशन इंटरनेशनल SAUnipersonal) 2.5 किलो प्रति एकर या प्रमाणात ड्रीप ने द्यावे.
महत्वाच्या किडी व रोग:
- डायमंड बैक मोथ
- मावा
- घाण्या रोग
काढणी व उत्पादन:
- जातीपरत्वे कोबी 2.5 ते 3 महिन्यात तयार होतो.
- तयार गड्डा हातास टणक लागतो.
- कोबीचे 80 ते 100 किंटल एकरी उत्पादन घेता येते.
अशाप्रकारे कोबी लागवडीसाठी योग्य तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास व योग्य खत व्यवस्थापन केल्यास कोबीतून अधिक उत्पादन मिळविता येऊ शकते. तुम्ही तुमच्या कोबी पिकाचे व्यवस्थापन कसे करता? ड्रीपद्वारे कोणती खते देता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कोबी लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
फुलकोबी लागवडीसाठी मध्यम ते भारी, परंतु पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य आहे.
2. कोबी लागवडीसाठी योग्य हवामान कोणते?
फुलकोबी पिकाला हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमान फुलकोबीच्या वाढीस पोषक असते.
3. कोबी लागवडीसाठी जमिनीचा सामू किती असावा?
कोबी लागवडीसाठी जमिनीचा सामू जमिनीचा सामू 5.5 ते 6.5 असावा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
