कारली पिवळी होण्याची कारणे आणि व्यवस्थापन! (Causes and management of Bittergourd yellowing!)

नमस्कार शेतकरी मित्रांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कारले हे वेलवर्गीय पीक असून आरोग्यासाठी खुप महत्वाचे मानले जाते. हे पीक साधारण चार महिन्यांचे असते. बाजारपेठांमध्ये पांढऱ्या रंगाची तर निर्यातीसाठी हिरव्या रंगाच्या कारल्यांची भरपूर मागणी असते. कारले हे वेलवर्गीय पीक असल्यामुळे आधार देणे गरजेचे असते. कारण जमिनीवर वेलीची वाढ चांगली होत नाही व फळांचा जमिनीशी संपर्क आल्याने फळे सडण्याचे प्रमाण वाढते. यामुळे कारल्याला मंडप व ताटी पद्धतीने आधार दिला जातो. या पीकाला जास्त पाणी दिले गेल्यास वेली पिवळ्या पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर फळे लागण्याच्या काळात पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास फळांना योग्य आकार येत नाही व फळे वेडीवाकडी येतात. आजच्या आपल्या या भागात आपण कारली पिवळी होण्याची कारणे आणि व्यवस्थापन याविषयी जाणून घेणार आहोत.
कारली पिवळी होण्याची कारणे (Causes of Bitter Gourd yellowing):
- कारली पिकामध्ये फळ पिवळे पडणे ही समस्या पिकावर पाण्याचा ताण पडणे, परागीभवन व्यवस्तीत न होणे, फळ माशीचा प्रादुर्भाव, भुरी रोग तसेच बुरशीचा प्रादुर्भाव इत्यादी अनेक कारणांमुळे दिसून येते.
- कारल्याच्या वेलींमध्ये वाढत्या तापमानामुळे लहान फळे पिवळी पडण्याची समस्या अनेकदा दिसून येते.
- कारल्यामध्ये पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे देखील फळे लवकर पिवळी पडू लागतात.
- पाण्याअभावी देखील लहान कारल्यांची फळे पिवळी पडू लागतात.
- फळ माशीच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी होते आणि फळांचा दर्जा खराब होतो. फळांचा आकार लहान राहून फळ पिवळे पडते व नंतर गळून पडते.
कारली पिवळी पडल्यामुळे होणारे नुकसान (Damage due to Bitter Gourd yellowing):
- सर्वप्रथम लहान फळांसह जोडली गेलेली फुले सुकायला लागतात.
- पानांवर पिवळे डाग दिसू लागतात.
- वनस्पती पुरेशा प्रमाणात अन्न तयार करू शकत नाहीत.
- पिवळी पडल्यामुळे प्रभावित झाडे सुकतात आणि मरतात.
- उत्पादनात घट झाल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते
व्यवस्थापन (Management of Bittergourd yellowing):
- खरीप हंगामात या पीकाला 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे, तसेच उन्हाळ्यात 5 ते 6 दिवसाच्या अंतराने पाणी देणे उत्तम असते.
- कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यू पी (बाविस्टीन) 400 मिली प्रति 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. गरज भासल्यास 15 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.
- अल्फाकीपरमेथ्रिन 10% EC (देहात-फुलस्टॉप) 250-300 ग्रॅम/एकर 1.6 ग्रॅम/मध्ये मिसळून फवारणी करावी.
- पिकास पोषक तत्वांचा पुरवठा करण्यासाठी 10 ग्रॅम (देहात-एजी व्हायटल) 30 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही कारली पिवळी झाल्यास काय व्यवस्थापन करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “शेतकरी डॉक्टर” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कारली पिवळी होण्याची प्रमुख कारणे कोणती?
कारली पिकामध्ये फळ पिवळे पडणे ही समस्या पिकावर पाण्याचा ताण पडणे, परागीभवन व्यवस्तीत न होणे, फळ माशीचा प्रादुर्भाव, भुरी रोग तसेच बुरशीचा प्रादुर्भाव इत्यादी अनेक कारणांमुळे दिसून येते.
2. कारली हे पीक साधारण किती महिन्यांचे असते?
कारली हे पीक साधारण चार महिन्यांचे असते.
3. कारली पिकाला कशाच्या साहाय्याने आधार दिला जातो?
कारली पिकाला मंडप व ताटी पद्धतीने आधार दिला जातो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
