पोस्ट विवरण
सुने
कृषि समाचार
शेतकरी समाचार
DeHaat Channel
23 Jan
Follow

छत्रपती संभाजीनगर परिमंडलात चार सौर ऊर्जा प्रकल्प सुरू

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित व भरवशाचा वीजपुरवठा करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबवण्यात येत आहे. योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात गेल्या चार महिन्यांत चार सौर प्रकल्प सुरू करण्यात आले असल्याचे महावितरणकडून कळविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील प्रत्येकी दोन प्रकल्पांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. एकूण १६ हजार मेगावॅट क्षमतेचे सर्व प्रकल्प मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होऊन राज्यात शेतीसाठी पूर्णपणे सौर ऊर्जेवर निर्माण झालेल्या विजेचा पुरवठा होईल.


46 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ