गवार लागवड तंत्रज्ञान (Cluster bean Cultivation)
गवार लागवड तंत्रज्ञान (Cluster bean Cultivation)
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
गवार हे शेंगवर्गीय भाजीपीक महारष्ट्राच्या सर्व भागामध्ये कमी - अधिक प्रमाणात घेतले जाते. गवार हे ग्रामीण भागात अतिशय लोकप्रिय पिक आहे. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 8910 हेक्टर क्षेत्रावर गवार पिकाची लागवड होते. गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश येथे गवार हे पीक जनावरांसाठी हिरवा चारा म्हणून वापरले जाते. गवारीच्या पिकापासून निघणाऱ्या डिंकाला मोठी मागणी असल्यामुळे परकीय चलन मिळूवून देणारे पिक म्हणून याकडे पहिले जाते. या पिकाचे मुख्य वैशिष्ट म्हणजे राजस्थानसारख्या अति कमी पावसाच्या राज्यामध्ये देखील हे पीक बीजोत्पादनासाठी व्यापारी पीक म्हणून घेतले जाते. सोप्या तंत्राचा वापर केल्यास गवारीसारख्या अत्यल्प खर्चाच्या पिकातून भरपूर पैसा मिळविता येतो. म्हणूनच आजच्या आपल्या या भागात आपण गवार लागवड तंत्रज्ञाना (Cluster bean Cultivation) विषयीची माहिती जाणून घेणार आहोत.
हवामान (Weather) :
- गवार हे उष्ण हवामानातील पिक आहे.
- सरासरी 18 ते 30 अंश सेल्सिअस तपमानात गवार हे पिक उत्तम येते.
- खरीपातील उष्ण व दमट हवेमुळे गवार पिकाची वाढ चांगली होते.
- हिवाळी हंगामात गवार या पिकाची लागवड फायदेशीर ठरत नाही.
जमीन (Soil) :
- गवार हे पिक सर्व प्रकारच्या जमिनीत घेतले जाते.
- उत्तम पाण्याचा चांगला निचरा असलेल्या मध्यम ते भारी जमिनीत गवार या पिकाची वाढ चांगली होते.
- जमिनीचा सामू 7.5 ते 8 च्या दरम्यान असल्यास पिकाची वाढ चांगली होते.
लागवड कालावधी (Cultivation Time) :
- गवारीची लागवड खरीप व उन्हाळी हंगामात केली जाते.
- उन्हाळी गवारीची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यात करतात.
बियाण्याचे प्रमाण (Acre Seed):
- एकरी 5-10 किलो बी लागवडीस पुरेसे असते.
- बियाणे पेरण्यापूर्वी 4-6 किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम चोळावे.
गवार पिकासाठी सुधारीत वाण (Varieties):
पुसा सदाबहार, पुसा मोसमी, शरद बहार, पुसा नवाबहार, फुले गवार, नीलम 61
मशागत:
- लोखंडी नांगराने जमीन 15-20 सेमी खोल नांगरून प्रति एकरी 5-5.5 टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून घ्यावे.
- कुळवाच्या उभ्या आडव्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी, काडीकचरा धसकटे वगैरे वेचून घेऊन जमीन साफ करावी.
लागवड पद्धत (Cultivation):
- गवारीची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीत करता येते मात्र पोयट्याच्या उत्तम निचऱ्याची आणि सामू 7-7.5 असलेल्या जमिनीत गावरीचे चांगले उत्पादन मिळते.
- पाभरीने अथवा तिफणीने पेरणी करताना 45 सेमी अंतरावर पेरणी करावी आणि नंतर 15 दिवसांनी रोपांची विरळणी करून दोन रोपांतील अंतर 15-20 सेमी ठेवावे.
- फांद्यांच्या झाडातील अंतर 10 सेमी ठेवावे.
खते आणि पाणी व्यावस्थापन (Fertilizer and Water Management) :
- गवार हे शेंग वर्गातील कोरडवाहू पिक म्हणून घेतल्यास त्यास खताची फारशी जरुरत भासत नाही.
- बागायती पिकास लागवडीपूर्वी 50 किलो नत्र, 60 किलो पालाश द्यावे.
- जमिनीच्या मगदुराप्रमाणे पिकास पाणी द्यावे.
- गवार पिकला पिकाला पाणी माफक प्रमाणातच लागते परंतु फुले लागल्यापासून शेंगांचा भार पूर्ण होईपर्यंत नियमित पाणी द्यावे.
आंतरमशागत:
- पेरणीनंतर 10 ते 20 दिवसांनी रोपांची विरळणीकरून जोमदार व उत्तम वाढीतील अशा अंतराने रोपे ठेवावीत.
- 3 आठवड्यांनी खुरपणी करून तण काढून टाकावेत.
- दुसरी खुरपणी तणांचे प्रमाण पाहून करावी.
तण व्यवस्थापन (Weed Management):
- उन्हाळ्यातील किंवा खरीप हंगामातील गवार पिकाला गवताळ, रुंद पाने असलेल्या आणि वाळलेल्या तणांचा मोठा फटका बसतो.
- ओलावा, पोषक घटक आणि जागेसाठी पिकांची तणांशी होणारी स्पर्धा यामुळे काही वेळा 90% पर्यंत उत्पन्नात घट येऊ शकते. त्यामुळे पेरणीनंतर किमान सुरुवातीच्या 30 ते 35 दिवसांपर्यंत पीक तणमुक्त ठेवावे.
- सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या तणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाताने तण काढणे खूप प्रभावी आहे.
- पेरणीनंतर 25 आणि 45 दिवसांनी हाताने खुरपणी करणे पीक तणमुक्त ठेवण्यासाठी पुरेसे आहे.
- तथापि, काहीवेळा मजुरांच्या अनुपलब्धतेमुळे, पेंडिमेथालिन 30% ईसी (युपीएल-दोस्त) @1 ते 1.30 लिटर एकरी 200 लिटर पाण्यात मिसळून (पेरणीपासून 2 दिवसांच्या आत) वापरता येते.
गवार पिकात आढळून येणारे कीटक व रोग (Insect and Disease):
गवार पिकात प्रामुख्याने भुरी रोग, मर रोग व तुडतुडे हे रोग व कीटक आढळून येतात.
काढणी:
- गवारीच्या कोवळ्या शेंगा हंगाम आणि जातीनुसार साधारणपणे सहा ते आठ आठवड्यानंतर तोडणीला येतात.
- या शेंगांची तीन ते चार दिवसांनी नियमित तोडणी करावी.
- गवारीच्या कोवळ्या परंतु पूर्ण वाढलेल्या शेंगा तोडव्यात.
- शेंगा जास्त दिवस झाडावर राहिल्यास त्यांचे साल जाड होऊन त्यावरील रेषांचे प्रमाण वाढते.
उत्पादन:
गवारीच्या एक एकर लागवडीतुन सरासरी 0.4 ते 0.8 टन उत्पादन मिळते. तथापि, मातीचा प्रकार, हवामान, सिंचन आणि कीड व्यवस्थापन पद्धती अशा विविध घटकांवर अवलंबून वास्तविक उत्पादन बदलू शकते.
अशा प्रकारे योग्य रित्या, आपल्या शेतातील मातीनुसार योग्य वाण वापरून गवारीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळू शकते. तुम्ही तुमच्या गवार पिकाच्या लागवडीकरिता कोणते तंत्रज्ञान वापरता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. भारतात गवार पिकाची पेरणी करण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
गवार पिकाची लागवड साधारणत: भारतात जून ते जुलै महिन्यात केली जाते.
2. गवार लागवडीसाठी आदर्श तापमान किती आहे?
गवार लागवडीसाठी आदर्श तापमान 18 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान आहे.
3. गवार पिकात कोणते कीटक व रोग आढळून येतात?
गवार पिकात प्रामुख्याने भुरी रोग, मर रोग व तुडतुडे हे रोग व कीटक आढळून येतात.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ