पोस्ट विवरण
वेळीच करा कोंबड्यांमध्ये आढळून येणाऱ्या 'ब्रुडर न्यूमोनिया'चे नियंत्रण (Control of 'Brooder Pneumonia' in chickens)
नमस्कार पशुपालकांनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
पावसाळ्यात सतत साचणारे पाणी आणि वातावरणातील दमटपणामुळे बुरशीसाठी पोषक वातावरण तयार होते. पावसाळ्यात कोंबड्यांमध्ये होणारे बरेचसे आजार हे व्यवस्थापनातील दोषामुळे होतात. 'ब्रूडर न्यूमोनिया' हा त्यातीलच एक संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे. आज आपण याच महत्वाच्या आजाराविषयी आणि या आजरातून कोंबड्यांचे संरक्षण कसे करावे याविषयी जाणून घेणार आहोत.
ब्रूडर न्यूमोनिया म्हणजे काय (What is Brooder Pneumonia)?
- ब्रूडर न्यूमोनिया हा आजार एस्परजीलस फ्युमिगेटस बुरशीच्या प्रजातींमुळे होतो.
- हा आजार पहिल्या 2 ते 3 आठवड्याच्या पिलांमध्ये दिसून येतो.
- शेडमधील खाद्य भिजल्यावर त्यावर बुरशी वाढते.
- बुरशीचे बीजाणू श्वासाद्वारे श्वसनसंस्थेत प्रवेश करून फुफ्फुसाचा दाह (न्यूमोनिया) निर्माण करतात.
- ब्रूडर न्यूमोनियामुळे लहान पिल्लांची वाढ खुंटते, पिल्ले मृत्युमुखी पडतात.
- विशेषतः 7 ते 40 दिवसांच्या कोंबडीमध्ये या आजाराचा तीव्र प्रभाव दिसून येतो.
- प्रभाव कमी करण्यासाठी योग्य वेळी निदान होणे गरजेचे असते.
ब्रूडर न्यूमोनिया आजाराला कारणीभूत घटक कोणते (What are the factors that cause brooder pneumonia disease)?
कोंदट वातावरणातील अमोनिया आणि धूळ निर्मिती:
खराब हवेच्या गुणवत्तेमुळे पिल्लांच्या श्वसनसंस्थेवर ताण आल्याने संसर्ग होण्याची अधिक शक्यता असते.
जास्त आर्द्रता जिवाणू आणि बुरशीची वाढ:
जास्त आर्द्रता पिलांमध्ये श्वासोच्छ्वासाचे कार्य बिघडवू शकते, त्यामुळे श्वसनाचे आजार होतात.
तापमानातील जलद बदल किंवा विसंगत तापमान व्यवस्थापन:
यामुळे पिलांवर ताण येतो. प्रतिकारशक्ती कमी होते.
गर्दीची परिस्थिती:
- अशी परिस्थिती पिलांमध्ये तणावाची पातळी वाढवू शकते.
- संसर्गजन्य घटकांचा प्रसार सुलभ करू शकते.
- गर्दीमध्ये पिलांसाठी मर्यादित जागा असते, त्यामुळे त्यांचा दूषित आच्छादन आणि हवेतील रोगजनकांशी संपर्क वाढतो.
दूषित आच्छादनामुळे बुरशीची वाढ:
यामुळे पिलांचा श्वसनमार्ग आणि पचनमार्ग संक्रमित होतो.
अपुरे पोषण किंवा असंतुलित आहार:
पिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकते, ज्यामुळे त्यांना संक्रमण होण्याची अधिक शक्यता असते.
खराब पाण्याची गुणवत्ता किंवा दूषित पाणी:
यामुळे पिलांच्या पचन आणि श्वसन प्रणालीमध्ये रोगजनकांचा प्रवेश होतो.
कोंबड्यांची अव्यवस्थित हाताळणी, वाहतूक आणि आहार किंवा पर्यावरणीय परिस्थितीत:
या साऱ्यातील अचानक बदल यामुळे पिलांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. त्यांना श्वसन आजार होण्याची शक्यता असते.
जैवसुरक्षा उपाययोजना नसणे:
जैवसुरक्षा उपाययोजना नसल्यामुळे ब्रूडर हाऊसमध्ये रोगजनकांची वाढ आणि प्रसार होतो. ज्यामुळे पिलांमध्ये विविध आजार होतात.
ब्रुडर न्यूमोनियामुळे होणारे नुकसान व लक्षणे (Damage and Symptoms of Brooder Pneumonia):
- विकृती दर वाढतो.
- पिल्लांना श्वसनाचा त्रास होतो आणि कमी आहारामुळे अनेकदा वाढ खुंटलेली जाणवते.
- सुरवातीच्या संसर्गातून बचावलेल्या कोंबड्यांचे वजन सामान्यतः निरोगी कोंबड्यांच्या तुलनेत कमी होते. यामुळे उत्पादन खर्च वाढतो आणि एकूण नफा कमी होतो.
- आजारी कोंबड्यांना निरोगी कोंबड्यांच्या तुलनेत वजन वाढविण्यासाठी अधिक खाद्य आवश्यक असते. यामुळे उत्पादन खर्चात आणखी भर पडते.
- कुक्कुटपालनाचा निम्न दर्जा आणि उत्पादकता यामुळे बाजार मूल्य आणि नफा कमी होतो.
- आजारामुळे प्रामुख्याने श्वसनसंस्था बाधित होते.
- बाधित कोंबड्यांमध्ये भूक न लागणे, खोकला, श्वास घेते वेळी घरघर आवाज, नाकातून स्राव बाहेर पडणे ही लक्षणे दिसून येतात.
- श्वासोच्छ्वासाचा वेग वाढतो, श्वास गुदमरतो, श्वास घेण्यास त्रास होतो.
- डोळ्यावर सूज येते आणि डोळ्यातून स्राव बाहेर येतो.
- मज्जासंस्थेवर परिणाम झाल्यास गतिभंग, थरकाप, मान वाकडी होते, झटके, बेशुद्धी येऊन स्नायू आकुंचन पावतात, लंगडेपणा आणि मागच्या पायांना लुळेपणा येतो.
ब्रुडर न्यूमोनियाचे निदान व उपचार (Diagnosis and Treatment of Brooder Pneumonia):
- निदान बहुतेक वेळा लक्षणे व शवविच्छेदन करून केले जाते.
- प्रयोगशाळेत लिटर तसेच मृत कोंबडी नमुने तपासणीसाठी पाठवावेत.
- ब्रुडर न्यूमोनिया आजारावर कोणतीही लस उपलब्ध नाही. त्यामुळे उच्च पातळीच्या जैवसुरक्षेसह चांगल्या व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा.
- शेडचे निर्जंतुकीकरण करावे. स्वच्छता ठेवावी.
- प्रतिजैविक आणि बुरशी संवेदनशीलता चाचणी करून योग्य ती प्रति जैविक आणि बुरशीविरोधी औषधांचा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वापर करावा.
- बाधित कोंबड्यांना जीवनसत्त्वे आणि सहायक उपचार द्यावा. पिलांची योग्य काळजी घ्यावी.
- बुरशी आलेले कोंबडीचे खाद्य नष्ट करावे.
- शेडमध्ये योग्य वायूवीजन करावे. सापेक्ष आर्द्रतेचे नियंत्रण करावे.
शेडचे व्यवस्थापन (Management of Shed):
- नवीन पिले आणण्यापूर्वी ब्रूडर्स शेड, फीडर्स आणि वॉटरर्स पूर्णपणे स्वच्छ आणि निर्जंतुक करावेत.
- चांगल्या, स्वच्छ हॅचरीमधून पिलांची खरेदी करावी.
- शेडमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- उंदीर आणि कीटकांचे नियंत्रण करावे. खाद्य साठवण क्षेत्रापासून दूर ठेवण्यासाठी उपायांची अंमलबजावणी करावी.
- शेडमधील पाण्याची गळती किंवा ओलसरपणा टाळावा.
- आर्द्रता आणि धूळ यामुळे बुरशीचे बीजाणू तयार होऊ नयेत यासाठी शेडमध्ये चांगले वायूवीजन राहील याची खात्री करावी.
- शेडमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.
- शेडमध्ये योग्य आर्द्रता. (५० ते ७० टक्के) पातळी ठेवावी.
- पिलांच्या वाढीसाठी योग्य असे सातत्यपूर्ण तापमान राखावे.
- तापमान स्थिर ठेवण्यासाठी थर्मोस्टेंट आणि हीटर्सचा वापर करावा.
- स्वच्छ, कोरडे आणि दूषित नसलेले, बुरशीजन्यरहित खाद्य द्यावे.
- बुरशीची वाढ रोखण्यासाठी कोरड्या जागेत, उंचावर खाद्य साठवून ठेवावे.
- आर्द्रता आणि कीटकांपासून खाद्याचे संरक्षण करण्यासाठी वायुरोधक कंटेनर किंवा सायलोचा वापर करावा.
- नवीन खाद्य आणण्यापूर्वी डबे, शेड स्वच्छ आणि कोरडे असल्याची खात्री करावी. खाद्य बुरशी आणि विषारी पदार्थांपासून मुक्त असल्याची खात्री करावी.
- स्वच्छ, ताजे आणि निर्जंतुकीकरण केलेले पाणी ठेवावे.
- शेडमध्ये प्रवेश केवळ अत्यावश्यक कर्मचाऱ्यांपुरता मर्यादित ठेवा.
- रोगजनकांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छ कपडे, पादत्राणे वापरणे, हात स्वच्छ करणे आणि पाय निर्जंतुक द्रावणात बुडवणे आवश्यक आहे.
- आजाराचा प्रसार रोखण्यासाठी नवीन किंवा आजारी पिलांना मुख्य कळपापासून दूर ठेवावे.
- श्वसनाचा त्रास किंवा इतर आजारांच्या लक्षणांसाठी पिलांचे नियमित निरीक्षण करावे. लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत.
- तापमान, आर्द्रता आणि हवेच्या गुणवत्तेसाठी शेडच्या वातावरणाची नियमित तपासणी करावी.
- बुरशी किंवा ओलसरपणाच्या कोणत्याही लक्षणांसाठी नियमितपणे खाद्याची तपासणी करावी.
तुमच्या कोंबड्यांमध्ये 'ब्रुडर न्यूमोनिया' रोगाची कोणती लक्षणे दिसून आली आणि तुम्ही काय उपाययोजना केल्या या विषयीची माहिती इतर पशुपालकांसह शेयर करा. या पोस्टमध्ये नमूद केलेल्या गोष्टी तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर, अशा अजून माहितीसाठी "पशु ज्ञान" चॅनेलला फॉलो करा. तसेच ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. 'ब्रूडर न्यूमोनिया' म्हणजे काय?
'ब्रूडर न्यूमोनिया' हा एक संसर्गजन्य परंतु सांसर्गिक नसलेला बुरशीजन्य आजार आहे. हा आजार एस्परजीलस फ्युमिगेटस बुरशीच्या प्रजातींमुळे होतो.
2. 'ब्रूडर न्यूमोनिया' हा आजर किती वयाच्या पिल्लांमध्ये दिसून येतो?
'ब्रूडर न्यूमोनिया' हा आजर पहिल्या 2 ते 3 आठवड्याच्या पिल्लांमध्ये दिसून येतो.
3. 'ब्रूडर न्यूमोनिया' आजाराला कारणीभूत घटक कोणते?
कोंदट वातावरणातील अमोनिया आणि धूळ निर्मिती हे ब्रूडर न्यूमोनिया आजाराला कारणीभूत घटक आहेत.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ