पोस्ट विवरण
कोथिंबीर पिकातील प्रमुख कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन (Coriander : Major Pests, Symptoms and Control)
नमस्कार शेतकरी बंधूंनो,
देहात परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे!
कोथिंबिरीचे पीक अवघ्या 45 ते 50 दिवसांत तयार होते आणि त्यानंतर लगेचच शेतकरी बांधवांची कमाई सुरू होते. कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. त्यामुळे कोथिंबीरीच्या लागवडीस चांगला वाव आहे. सुधारित व संकरित वाणांच्या बियाण्यांपासून सुमारे 2 ते 3 वेळा कोथिंबीर काढता येते. तसेच, मसाल्याच्या पिकांमध्ये कोथिंबीरची लागवड अत्यंत फायदेशीर मानली जाते, कारण त्याची लागवड करण्यासाठी कमी खर्च आणि कमी वेळ लागतो. हे पीक लवकर तयार होते आणि नफाही चांगला मिळतो. मात्र योग्य हवामान व जमीन न मिळाल्यास कोथिंबीर पिकामध्ये विविध प्रकारचे कीटक आढळून येतात. कीटकांमुळे होणारे पिकाचे नुकसान टाळण्यासाठी आज आपण कोथिंबीर पिकातील प्रमुख कीटकांविषयी व त्यांच्या व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
कोथिंबीर पिकात आढळून येणारे कीटक:
- मावा
- नाग अळी
- सुरवंट
मावा कीटक (Aphid) :
मावा कीटकाची ओळख (Identification of Coriander Aphid):
- मावा कीटक हा अतिशय लहान असतो.
- मावा कीटक हिरव्या किंवा तपकिरी रंगाचा असतो.
मावा कीटकाची लक्षणे (Symptoms of Aphid):
- हे कीटक कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषून घेतात.
- त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.
- ही कीड सोंडेद्वारे अन्नरस शोधते.
- मावाच्या अधिक प्रादुर्भावामुळे पीक वाळते.
मावा कीटकाचे व्यवस्थापन (Management of Apid):
- निंबोळी अर्क (5%) - 400 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 17.8% एसएल (बायर-कॉन्फिडोर) 100 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी किंवा
- डायमेथोएट 30% ईसी (टाटा-टॅफगोर) 160 मिली 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर फवारणी करावी.
- इमिडाक्लोप्रिड 70% डब्ल्यूजी (सल्फर मिल्स-प्रोन्टो) 12 ते 20 ग्रॅम एकरी फवारावे किंवा
- फेनप्रोपॅथ्रिन 30% ईसी (सुमिटोमो- मियोथ्रिन) 100 मिली/ 200 लिटर एकरी फवारावे किंवा
- बीटा-सायफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड 300 ओडी (8.49 + 19.81% डब्ल्यू/डब्ल्यू) (बायर-सोलोमोन) 80 मिली/एकरी फवारावे.
नाग अळी (Leaf Miner) :
नाग अळीची ओळख (Identification of Coriander Leaf Miner):
- कोणत्याही पिकाच्या पानावर नागमोडी आकाराचे पिवळे / पांढरे पट्टे दिसले की समजावे नाग अळीचा प्रादुर्भाव झाला आहे.
- या अळीचे प्रौढ रूप काळी माशी असते.
नाग अळीची लक्षणे (Symptoms of Leaf Miner):
- नाग अळीचा प्रादुर्भाव पीक लहान असताना दमट हवामानात कोवळ्या पानांवर होतो.
- ही अळी पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोड्या, पिवळट, जाड रेषा दिसतात.
- पाने पिवळी पडून गळतात.
नाग अळीचे व्यवस्थापन (Management of Leaf Miner):
- क्विनालफॉस 25% ईसी (सिजेंटा-एकालक्स) 400 मिलि 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी किंवा
- कार्टॅप हायड्रोक्लोराइड 75% एसजी (धानुका-मोर्टार) 400 ग्रॅम 200 लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी. किंवा
- नीम तेल 400 मिली एकरी फवारावे.
सुरवंट (Cutworms):
कटवर्मची ओळख (Identification of Coriander Cutworms):
- कटवर्म सर्वसाधारणपणे दिसायला सारखे असतात.
- ते खूप कमी केसांसह गुळगुळीत असतात आणि पूर्ण वाढ झाल्यावर सुमारे दोन इंच लांब असतात.
- मोठे झाल्यावर ते सामान्यत: 'C' आकारात दिसतात.
- वेगवेगळ्या प्रजाती एकमेकांपेक्षा वेगळ्या दिसू शकतात आणि त्या तपकिरी, गुलाबी, हिरवा, राखाडी किंवा काळा यासारख्या रंगांमध्ये असतात.
- काही कटवर्म एकसमान रंगाचे असतात तर काही पट्टेदार असतात.
- काही अळ्या निस्तेज असतात आणि काही चकचकीत किंवा चमकदार दिसतात.
- कटवर्म हे अळ्यांच्या स्वरूपात असतात.
कटवर्मची लक्षणे (Symptoms of Cutworms):
- कटवर्म कोथिंबीरच्या कोवळ्या रोपांना खातात, आणि मातीतच कापून टाकतात.
कटवर्मचे व्यवस्थापन (Management of Cutworms):
- शेतातील भेगा आणि खड्ड्यांवर असलेल्या अळ्या सकाळी आणि संध्याकाळी हाताने उचलून नष्ट करा.
- उन्हाळ्याच्या महिन्यांत नांगरणी करा.
- प्रकाश सापळा लावा.
- नर पतंगांना आकर्षित करण्यासाठी फेरोमोन सापळे 5 एकरी लावा.
- क्लोरपायरीफॉस 20% ईसी (टाटा रॅलीस-तफाबान) 0 .4 लिटर/एकर किंवा कडुनिंब तेल 3% सारख्या कीटकनाशके ड्रेंचिंग करताना पाण्याद्वारे सोडा.
फवारणी करताना घ्यावयाची काळजी:
- फवारणीसाठी गढूळ पाणी वापरू नये. स्वच्छ पाणीच वापरावे.
- फवारणी द्रावण प्लास्टिक बकेटमध्ये करावे.
- शक्य झाल्यास फवारणीच्या वेळेस आपण स्वतः शेतात हजर राहावे.
- फवारणीच्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यास शक्यतोवर फवारणी करू नये व केल्यास बेस्ट स्टीकरचा वापर अवश्य करावा. तरीही ताबडतोब पाऊस पडल्यास फवारणीचा फायदा होत नाही.
- औषध तयार करताना प्रथम थोड्या पाण्यात घेऊन नंतर जास्त पाण्यात मिसळावे व व्यवस्थित ढवळून घ्यावे.
- फवारणी शक्यतोवर सकाळी व दुपारी 4 नंतर करावी. जास्त उन्हामध्ये कृषी रसायनांचे विघटन होते व पाहिजे तसे परिणाम दिसत नाहीत.
- तणनाशकांचा पंप फवारणीसाठी शक्यतोवर वापरू नाही.
- एकाच औषधाचा किंवा एकाच गटातील औषधांचा सतत वापर करू नये. त्यामुळे किडींमध्ये प्रतिकारशक्ती वाढते.
- कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके, एकत्र फवारताना त्यांची सुसंगतता पडताळून पाहावी. द्रावण घट्ट झाल्यास, फाटल्यास किंवा न विरघळल्यास फवारू नये.
- फवारणीसाठी तयार करून ठेवलेल्या द्रावणाचा ताबडतोब वापर करावा, ते जास्त काळ ठेवू नये.
- फवारणी सर्व झाडावर खालीवर पानांच्या मागे-पुढे एकसमान होईल याची काळजी घ्यावी.
तुम्ही तुमच्या कोथिंबीर पिकामधील प्रमुख कीटकांचे व्यवस्थापन कसे करता? याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently asked Questions):
1. कोथिंबीर पिकास कोणते हवामान योग्य आहे?
अतिपावसाचा प्रदेश वगळता महाराष्ट्रातील सर्व हवामानात वर्षभर कोथिंबीरीची लागवड करता येते.
2. कोथिंबीर लागवडीसाठी योग्य जमीन कोणती?
कोथिंबीर लागवडीसाठी पाण्याचा अधिक निचरा होणारी आणि जमीनीचा पीएच 6-8 च्या दरम्यान असणारी जमीन योग्य मानली जाते.
3. कोथिंबीर पिकाला लागणारे रोग कोणते?
कोथिंबीर पिकावर प्रामुख्याने मर व भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ