पोस्ट विवरण
सुने
अनार
कृषि ज्ञान
बागायती पिके
DeHaat Channel
4 Dec
Follow

डाळिंब पिकात डिसेंबर महिन्यात करावयाची कामे

नमस्कार शेतकरी बंधूंनो,

डाळिंब पिकांची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्‍हयात प्रामुख्‍याने होत असून इतर जिल्‍हयातही मोठया प्रमाणावर लागवड होत आहे. सद्यस्थितीत महाराष्‍ट्रामध्‍ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्‍टर क्षेत्र असून त्‍यापैकी सुमारे 41000 हेक्‍टर क्षेत्र उत्‍पादनाखाली आहे. त्‍यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्‍पादन व 328 कोटी रुपये उत्‍पन्‍न मिळते. आज आपण याच डाळिंबाच्या पिकात डिसेंबर महिन्यात काय कामे करावी याविषयीची माहिती जाणून घेणार आहोत.

अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन :

- शेणखत 15 ते 20 किलो किंवा शेणखत 10 ते 15 किलो अधिक 2 किलो गांडूळ खत अधिक 2 किलो निंबोळी पेंड प्रति झाड किंवा 7.5 किलो कुजलेले कोंबडी खत अधिक 2 किलो निंबोळी पेंड प्रति झाड द्यावे.

- 255 ते 280 ग्रॅम नत्र (490 ते 610 ग्रॅम युरिया प्रति झाड), 63 ग्रॅम स्फुरद (सिंगल सुपर फॉस्फेट 395 ग्रॅम प्रति झाड) आणि 200 ग्रॅम पालाश (335 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) 488 ग्रॅम कॅल्शिअम (2.88 किलो जिप्सम) आणि 80 ग्रॅम मॅग्नेशिअम (800 ग्रॅम मॅग्नेशिअम सल्फेट) प्रति झाड द्यावे व हलके पाणी द्यावे.

- जैविक फॉर्म्यूलेशन उदा. ॲझोस्पिरिलम स्पेसिज, ॲस्परजिलस नायजर, ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि पेनिसिलिअम पिनोफायलम यांची आपल्या शेतात वाढ करण्यासाठी यांना चांगल्या कुजलेल्या शेणखतात 1 : 25 या प्रमाणात मिसळावे. यामुळे जमिनीतून पसरणाऱ्या रोगांच्या प्रादुर्भावाला अटकाव होतो. तसेच झाडाची प्रतिकारक्षमता वाढवते. या मिश्रणाचे सावलीत वेगवेगळ्या ठिकाणी बेड तयार करावे. त्यामध्ये 15 दिवस 60 ते 70 टक्के ओलावा ठेऊन, दर 2 दिवसांनी उलथा-पालथ करत राहावी. हे फॉर्म्युलेशन्स शेतात वापरण्यापूर्वी त्यात देहात-स्टार्टर, रायझोफॅगस इरेगुल्यारिस किंवा ग्लोमस इंट्राडॉलिसिस हे जैविक फॉर्म्युलेशन 10 ते 15 ग्रॅम प्रति झाड प्रमाणे मिसळावे. हे एकत्रित मिश्रण 10 ते 20 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणे द्यावे.

- दिलेल्या खतांचा पुरेपूर वापर होण्यासाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. मुरमाड जमिनीत 3 ते 4 दिवसांच्या अंतराने 15 ते 20 लिटर आणि पोयटा प्रकारच्या जमिनीत आठवड्याच्या अंतराने 10 ते 15 लिटर पाणी द्यावे.

- मातीचा प्रकार आणि झालेला पाऊस यानुसार पाऊस बंद झाल्यावर 2 ते 5 दिवस पाणी देऊ नये.

कीड व्यवस्थापन :

- जिथे शेवटच्या फळ तोडणीला उशीर झालेला आहे किंवा थोडा अवधी राहिलेला आहे तर तिथे कीडनाशकांची फवारणी टाळावी.

अ) विश्रांती काळात खोड किडा, खोड पोखरणारी अळी, मावा, कोळी, पाने खाणारी अळी आणि रस शोषणारे कीटक (मिलीबग, खवले कीड, फूलकिडे इ. यांचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात आढळतो. त्यांच्या नियंत्रणासाठी फवारणी प्रति लिटर पाणी

1) पानांवर प्रादुर्भाव कमी असल्यास ॲझाडिरॅक्टिन 1%ईसी (10 हजार पीपीएम) (नीमटेन)/ कडुनिंब तेल 3 मिलि प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करा.

2) मध्यम किंवा अधिक प्रादुर्भाव असेल, तर 15-20 दिवसांच्या अंतराने पुढीलपैकी 2 ते 3 फवारणीचे नियोजन करावे.

लॅम्बडा सायलोथ्रिन 5% ईसी (सिजेंटा-कराटे) 0.5 ते 0.75 मिलि किंवा इंडोक्साकार्ब 14.5% एससी (अ‍ॅग्रीव्हेंचर-इंडोकार्ब) 0.75 मिलि किंवा सायॲण्ट्रानीलिप्रोल 10.26% ओडी (एफएमसी-बेनेविया) 0.75 मिलि किंवा थायामेथोक्झाम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 0.5 ग्रॅम अधिक स्टिकर- स्प्रेडर 0.3 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करा.

ब) शॉट होल बोरर प्रादुर्भाव दिसून येत असेल, ड्रेचिंग प्रति लिटर पाणी

झाड पोखरत जाताना होणाऱ्या जखमेवर एक प्रकारची बुरशी वाढते. या बुरशीवर ही कीड उदरनिर्वाह करत असते. त्यामुळे पुढील प्रमाणे कीटकनाशक आणि बुरशीनाशक दोन्हीची ड्रेंचिंग करावी. किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असेल, तर ड्रेचिंग प्रति लिटर पाणी

- पहिली ड्रेंचिंग : इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-ईलिगो) 2 ग्रॅम अधिक प्रोपिकोनॅझोल 25% ईसी (क्रिस्टल-टिल्ट) 2 मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करा.

खोडावर लेप लावणे : पाणी 10 लिटर अधिक गेरू किंवा लाल माती 4 किलो अधिक इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-ईलिगो) 20 मिलि अधिक कॉपर ऑक्सिक्लोराइड 50% डब्ल्यूपी (धानुका-धानुकॉप) 25 ग्रॅम मिसळून ही पेस्ट तयार करून जमिनीपासून 2 ते 2.5 फुटांपर्यंत खुंटावर लावावी.

- दुसरे ड्रेंचिंग : थायामेथोक्झाम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 2 ग्रॅम अधिक कार्बेन्डाझिम 50% डब्ल्यूपी (क्रिस्टल-बाविस्टीन) 2 ग्रॅम.

क) बागेत स्टेम बोररचा प्रादुर्भाव आढळल्यास : खालील टप्प्याप्रमाणे उपाययोजना कराव्यात.

- कोवळ्या रोपांच्या कॅनॉपीमध्ये स्टेम बोररचे प्रौढ बीटल आहेत का, ते पाहात. कांबी आढळल्यास फिप्रोनील ५% एससी (धानुका - फॅक्स) २ मिली प्रति लिटर या मिश्रणात बुडवून नियंत्रण करावे.

- प्रौढ बीटलचा प्रादुर्भाव आढळल्यास, 1% नीम तेल किंवा कडूनिंबयुक्त कीटकनाशक ॲझाडिरॅक्टिन 1%ईसी (10 हजार पीपीएम) (नीमटेन) (10 हजार पीपीएम) 3 मिलि अधिक प्रति 0.30 मिलि स्प्रेडर स्टिकर प्रति लिटर या प्रमाणे खोडावर फवारणी करावी.

- कीटकांमुळे पडलेली छिद्रे बायडिंग वायरने वर आणि खाली साफ करा. खराब छिद्रांमध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-ईलिगो) 2 ग्रॅम प्रति लिटरने इंजेक्ट करून पूर्ण भरेपर्यंत छिद्रात सोडावे. नंतर ओल्या चिखल/मातीने छिद्र बंद करावे. या प्रक्रियेनंतर खाली पडलेली लाकडाची भुकटी काढून जागा साफ करावी. उपचारानंतर 24 तासांनंतर पुन्हा निरिक्षण करावे. जर ताजी लाकडाची भुकटी दिसल्यास वरील प्रमाणे प्रक्रिया पुन्हा करावी. किंवा पुढील उपाययोजनांची अंमलबजावणी करावी.

1) ड्रेंचिंग : इमामेक्टिन बेंझोएट 5% एसजी (देहात-ईलिगो) 2 ग्रॅम अधिक प्रोपिकोनॅझोल 25% ईसी (क्रिस्टल-टिल्ट) 2 मिलि. प्रति लिटर पाणी.

2) खोडावर फवारणी : प्रति लिटर पाणी, थायामेथोक्झाम 25% डब्ल्यूजी (देहात-असेर) 1 ते 2 ग्रॅम.

अशाप्रकारे डाळिंबाच्या पिकात डिसेंबर महिन्यात योग्य व्यवस्थापन केल्यास पिकाच्या उत्पादनात वाढ होऊ शकते. याविषयी अधिक माहितीसाठी आपण आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून अथवा कंमेंट्सद्वारे देहातमधील कृषी तज्ज्ञांकडून मोफत सल्ला मिळवू शकता.

28 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ