डाळींब बागेतील मधमाशी व्यवस्थापन
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
डाळिंब पिकाची लागवड अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, वाशिम या जिल्हयात प्रामुख्याने होत असून इतर जिल्हयातही मोठया प्रमाणावर केली जाते. सद्यस्थितीत महाराष्ट्रामध्ये डाळिंब पिकाखाली 73027 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी सुमारे 41000 हेक्टर क्षेत्र उत्पादनाखाली आहे. त्यापासून 410000 मेट्रीक टन इतके उत्पादन व 328 कोटी रुपये उत्पन्न मिळते. डाळींब पीकात कळी सेट होण्यात मधमाश्या मुख्य भुमीका बजावत असतात. म्हणूनच आजच्या या लेखात आपण डाळींब बागेतील मधमाशी व्यवस्थापनाविषयी जाणून घेणार आहोत.
मधमाशीमुळे पिकाला होणारे फायदे:
- परागीकरण क्रिया सोप्प्या व जलद गतीने होते.
- मधमाश्यांमुळे झालेल्या परागीकरणानंतरच फुलाचे रूपांतर फळामध्ये होते.
टीप:
काहीवेळा शेतात फवारलेल्या कीटकनाशकांमुळे मधमाश्या पिकाकडे आकर्षित होत नाहीत. म्हणून मधमाश्यांची हानिकारक कीटकनाशके वापरणे टाळावे.
आता जाणून घेऊया मधमाश्यांना आकर्षित कसे करावे याविषयी:
उपाय 1:
डाळिंब बागेत बहार धरतेवेळेस प्रत्येक 2 ते 4 झाडांमध्ये मोहरी पिकाची लागवड करावी. मोहरी आणि डाळिंबाचा फुल येण्याचा काळ एकच असल्यामुळे मोहरीच्या पिकाकडे जास्त मधमाश्या आकर्षित होतात त्यामुळे डाळिंब पिकाला परागीकरणात फायदा होतो.
उपाय 2:
मधमाशी आकर्षित करण्यासाठी फवारणी:
1. ताक = 5 लिटर
2. काळा गुळ = 1 किलो
3. दालचिनी = 50 ग्रॅम
हे वरील साहित्य 5 लिटर पाण्यात मिसळून 10 तास भिजून घ्यावे व त्यानंतर ते गाळून घेऊन 190 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक एकर बागेत सकाळी सूर्योदयापूर्वी फवारणी करावी.
उपाय 3:
मिश्रण तयार करणे शक्य नसल्यास बाजारातून ऑर्चिड कंपनीचे हनी बी ऍट्रॅक्टन आणून त्याची 2 मिली/लिटर पाणी फवारणी करून मधमाशीला आकर्षित करता येऊ शकते.
शेतात मधमाशीच्या प्रति एकर दोन पेट्या लावाव्यात.
आम्हाला खात्री आहे वरील उपाययोजनांचा वापर करून तुम्ही डाळिंब पिकात मधमाश्यांचे योग्यप्रकारे व्यवस्थापन करू शकाल. तुम्ही या व्यतिरिक्त पिकात मधमाश्या आकर्षित करण्यासाठी काय करता याबद्दलची माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसह कमेंट्सद्वारे शेयर करा. सोबतच या लेखाला लाईक करायला आणि लेखावर कमेंट करायला विसरू नका. यासारख्या विविध पिकांच्या महत्वपूर्ण माहितीसाठी “कृषी ज्ञान” चॅनेलला फॉलो करा. तसेच तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-1036-110 वर संपर्क साधून कृषी तज्ञांकडून मोफत सल्ला मिळवा.
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ