पोस्ट विवरण
सुने
पशु पालन
पशु ज्ञान
DeHaat Channel
1 year
Follow

डास आणि कीटकांपासून दुभत्या जनावरांचे करा संरक्षण

नमस्कार पशुपालकांनो,

कीटक, अळ्या आणि डासांची उपस्थिती हे अनेक प्रकारच्या रोगांना आमंत्रण आहे. आजकाल डास आणि विविध कीटकांपासून सुटका करण्यासाठी अनेक प्रकारची रासायनिक कीटकनाशके बाजारात उपलब्ध आहेत. मात्र या हानिकारक रासायनिक पदार्थांच्या वापरामुळे दुभत्या जनावरांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होतो. अशा परिस्थितीत काही सेंद्रिय पद्धतींचा अवलंब करणे हा एक उत्तम पर्याय आहे. अशी अनेक झाडे आणि वनस्पती आहेत ज्यांचा वापर करून आपण डास, माश्या आणि कीटकांना सहजपणे दूर करू शकतो. नैसर्गिक/सेंद्रिय पद्धतीने कीटकांना कसे पळवायचे याविषयी सविस्तर माहिती मिळवण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

कडुलिंब:

कडुलिंबाचा समावेश नैसर्गिक औषधांमध्ये होतो. यासोबतच कडुलिंब हे त्याच्या कीटकनाशक गुणधर्मामुळेही महत्त्वाचे समजले जाते. कडुलिंबाची पाने जाळून, धुवा करून डासांना सहज दूर करता येते.

शेवंती(क्रायसॅन्थेमम):

क्रायसॅन्थेममची वाळलेली फुले जाळणे आणि त्याचा धुवा करणे हा देखील डास आणि माश्यांपासुन मुक्त होण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

झेंडू:

झेंडूची लागवड आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. हे एक चांगले नैसर्गिक कीटकनाशक आहे.

तुळशी:

तुळशीची पाने डासांच्या अळ्या मारण्यासाठी उपयुक्त असतात.

लिंबू:

लिंबू, संत्री, गोड लिंबू यांसारख्या लिंबूवर्गीय फळांच्या सालीमध्ये डी-लिमोनेन नावाचा पदार्थ आढळतो. त्याचा तीव्र वास डास आणि इतर कीटकांना दूर करण्यास मदत करतो.

नैसर्गिक पद्धतीने कीटकांना कसे दूर करावे?

  • यासाठी प्रथम 100 ग्रॅम सुकलेली कडुलिंबाची पाने, 100 ग्रॅम झेंडूची फुले व पाने, 200 ग्रॅम शेवंती क्रायसॅन्थेममची फुले, 100 ग्रॅम सुकलेली तुळशीची पाने, फुले व डहाळे, 50 ग्रॅम गुलाबाची फुले, 100 ग्रॅम वाळलेले लिंबू किंवा 10 ग्रॅम लिंबाची पाने घ्या. 100 ग्रॅम आंब्याची वाळलेली पाने सिमेंट किंवा लोखंडी भांड्यात टाकून त्याचा धूर करावा.
  • यानंतर, जनावरांच्या घराचे दरवाजे, खिडक्या, पंखे आणि बल्ब 5 ते 10 मिनिटे बंद करा आणि धुर होऊ द्या.
  • सुमारे 10 मिनिटांनंतर, धुराचे भांडे बाहेर काढा आणि सर्व दरवाजे व खिडक्या 15 मिनिटांसाठी बंद ठेवा.
  • यानंतर दारे-खिडक्या उघडा आणि पंखा लावून धूर बाहेर काढा.
  • कीटक आणि अळ्या काही वेळात बाहेर येतील.

तुमच्या जनावरांना डास आणि कीटकांपासून वाचवण्यासाठी तुम्ही कोणती पद्धत वापरता ते आम्हाला कमेंट्सद्वारे सांगा?

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर ही पोस्ट लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


55 Likes
2 Comments
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ