सुने
शेतकरी समाचार
DeHaat Channel
3 Nov
Follow
ड्रॅगन फ्रूटचा हंगाम ९५ टक्के आटोपला

राज्यातील ड्रॅगन फ्रूटची विक्री जवळपास ९५ टक्के आटोपला आहे. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात ड्रॅगन फ्रूटच्या दरात तब्बल पन्नास टक्क्यांनी घसरण झाली आहे. सध्या ड्रॅगन फ्रूटला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक ताळमेळ काठावरच आले आहे. परिमाणी ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी काहीसा संकटात सापडला आहे. राज्यात सुमारे १० हजार एकरांवर लागवड असल्याचा अंदाज ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी आणि महाराष्ट्र ड्रॅगन फ्रूट असोसिएशनने व्यक्त केला आहे. कमी खर्च, कमी जोखिम आणि अपेक्षित मिळणार दर यामुळे राज्यात ड्रॅगन फ्रूटची लागवड वाढू लागली आहे. गेल्या वर्षभरात ७०० ते ८०० एकरांनी क्षेत्र वाढले आहे.
55 Likes
Like
Comment
Share
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ
