पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
22 Mar
Follow

देहात कंपनीचे CBL वापरा ऊसाचा गोडवा आणि उत्पादन वाढवा - श्री. विशाल राजेभोसले (DeHaat CBL is best for Sugarcane)

देहात कंपनीचे CBL वापरा ऊसाचा गोडवा आणि उत्पादन वाढवा - श्री. विशाल राजेभोसले (DeHaat CBL is best for Sugarcane)

देहात कंपनीचे क्रॉपबायोलाइफ (CBL) हे एक अत्याधुनिक 100% सेंद्रिय बायोफ्लॅव्होनॉइड्सचे संयुग असून, त्याचा वापर शेतकऱ्यांनी ऊस उत्पादनात वाढ, सुधारित उत्पादन रेशो (गुणोत्तर) आणि उच्च पोषण पातळी यासारखी विविध कापणीची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी करावा असे आवाहन बेंबळे, ता. माढा, जि. सोलापूर येथील कदम कृषी केंद्र येथे आयोजित केलेल्या बैठकीत देहात कंपनीचे नेटवर्क विस्तार प्रमुख श्री विशाल राजेभोसले यांनी केले.

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला तालुक्यातून 20 पेक्षा अधिक शेतकरी बांधव उपस्थित होते. ही विशेष बैठक देहातचे विक्री अधिकारी श्री. उमेश शिंदे, श्री. महेश खंडागळे व श्री. स्वप्निल काळुबारमे यांच्याद्वारे आयोजित करण्यात आली असून या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना देहातच्या इतर उत्पादनांच्या वापराविषयी तसेच, देहात किसान अ‍ॅप्लिकेशन व देहातच्या इतर सेवांविषयी देखील माहिती दिली.

CBL चा उपयोग:

  • CBL जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे उत्सर्जन करून जमिनीचे आरोग्य चक्र आणि साखर उतारा  प्रभावीपणे सुधारते.
  • CBL ऊस उत्पादनात वाढ, सुधारित उत्पादन रेशो (गुणोत्तर) आणि उच्च पोषण पातळी यासारखी विविध कापणीची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते.
  • CBL मधील फेनॉलिक संयुगे पोषण पातळी आणि मुळांच्या विकासाला चालना देतात. रोग आणि तणावाप्रती वनस्पतीची लवचिकता वाढवतात.
  • CBL प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढवून, मुळांचे उत्सर्जन व पोषक तत्वांचे शोषण वाढवते, वातावरणातील कार्बन आणि मातीचे आरोग्य सुधारते.

वापरण्याचे प्रमाण:

  • लागवडीच्या वेळी 50 मिली/100 लिटर पाणी
  • वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (फुटव्यांची अवस्था) लागवडीनंतर @1 ते 2 महिन्यांनी 100 मिली/एकर
  • वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (कांडी निर्मितीची सुरुवात) लागवडीनंतर @3 ते 5 महिन्यांनी 120 मिली/एकर
  • परिपकवतेच्या अवस्थेत @10 ते 12 महिन्यांनी किंवा कापणीपूर्वीच्या शेवटच्या महिन्यात 120 मिली/एकर
34 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ