देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट वाण - श्री. विशाल राजेभोसले. (DeHaat Company DWS 555 Best Cultivation Variety of Wheat - Shri. Vishal Rajebhosale)
देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट वाण - श्री. विशाल राजेभोसले. ( DeHaat Company DWS 555 Best Cultivation Variety of Wheat - Shri. Vishal Rajebhosale.)
गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगांसारख्या रोगांप्रति सहनशील असणारे, आकर्षक कणीसे असणारे असे देहातचे DWS 555 वाण सर्वोत्कृष्ट असून त्याची लागवड सर्वांनी करावी, असा सल्ला देहात कंपनीच्या नेटवर्क विस्तार प्रमुख श्री विशाल राजेभोसले यांनी अकोला जिल्ह्यातील अकोली जहागीर गावातील मोहन कृषी सेवा केंद्र येथे आयोजित केलेल्या "पिक पाहणी कार्यक्रम" कार्यक्रमात शेतकरी बांधवांना दिला.
देहात कंपनीच्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा विशेष "पिक पाहणी कार्यक्रम", अकोल्यातील अकोली जहागीर गावातील मोहन कृषी सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील 220 हुन अधिक शेतकरी बांधवांनी 7 देहात केंद्रांसह उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमात भरघोस व दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबद्दलची माहिती तसेच, देहातच्या सेवा, देहाताची इतर उत्पादने, व पशु खाद्य याबद्दलची देखील माहिती शेतकरी बांधवांना दिली.
हा "पिक पाहणी कार्यक्रम" देहातचे अकोला जिल्हा प्रक्षेत्र अधिकारी श्री. आदित्य सुधाकर जायले यांनी आयोजित केला असून, सदर कार्यक्रमाला श्री. विशाल राजेभोसले, श्री सुमेध चौरे, श्री मयूर मुरूमकर आणि अकोला जिल्हा विस्तार प्रमुख श्री. निखिल मुरूमकर यांनी देखील प्रमुख उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले.
DWS - 555:
- झाडाची उंची: 98-105 सेमी
- प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती
- उच्च उत्पन्न
- आकर्षक कणीसे
- 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम
- काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील.
- पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान
बियाणे दर: 40 किलो/एकर
जारी रखने के लिए कृपया लॉगिन करें
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ