पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
29 Mar
Follow

देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 वाण म्हणजे भरमसाठ उत्पादन - श्री. विशाल राजेभोसले. (DeHaat DWS 555 variety of wheat is Best - Mr. Vishal Rajebhosle)

गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी आकर्षक कणीसे असणारे, काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगांसारख्या रोगांप्रति सहनशील असणारे असे देहातचे DWS 555 वाण सर्वोत्कृष्ट असून त्याची लागवड सर्वांनी करावी, असा सल्ला देहात कंपनीच्या नेटवर्क विस्तार प्रमुख श्री विशाल राजेभोसले यांनी सातारा जिल्ह्यातील सस्तेवाडी गावातील धनश्री कृषी भंडार येथे आयोजित केलेल्या "पिक पाहणी" कार्यक्रमात शेतकरी बांधवांना दिला.

देहात कंपनीच्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीच हा विशेष "पिक पाहणी" कार्यक्रम, साताऱ्यातील सस्तेवाडी येथील धनश्री कृषी भंडार येथे आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमाला सस्तेवाडी येथील 100 पेक्षा अधिक शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमात भरघोस व दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबद्दलची माहिती तसेच, देहातच्या सेवा आणि CBL याबद्दलची देखील माहिती दिली.

हा विशेष "पीक पाहणी" कार्यक्रम देहातचे विक्री अधिकारी श्री. ऋत्विक बेस्के, श्री. साहिल शहा, श्री. उमेश शेडगे व श्री. प्रणय शेंडे यांच्याद्वारे आयोजित करण्यात आला असून या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना देहातच्या इतर उत्पादनांच्या वापराविषयी तसेच, देहात किसान अ‍ॅप्लिकेशन व देहातच्या इतर सेवांविषयी देखील माहिती दिली.

DWS - 555:

 • झाडाची उंची: 98-105 सेमी
 • प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती
 • उच्च उत्पन्न
 • आकर्षक कणीसे
 • 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम
 • काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील.
 • पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान

बियाणे दर: 40 किलो/एकर

CBL चा उपयोग:

 • CBL जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे उत्सर्जन करून जमिनीचे आरोग्य चक्र आणि साखर उतारा  प्रभावीपणे सुधारते.
 • CBL ऊस उत्पादनात वाढ, सुधारित उत्पादन रेशो (गुणोत्तर) आणि उच्च पोषण पातळी यासारखी विविध कापणीची उद्दिष्टे साध्य करण्यात मदत करते.
 • CBL मधील फेनॉलिक संयुगे पोषण पातळी आणि मुळांच्या विकासाला चालना देतात. रोग आणि तणावाप्रती वनस्पतीची लवचिकता वाढवतात.
 • CBL प्रकाशसंश्लेषण क्रियेचा वेग वाढवून, मुळांचे उत्सर्जन व पोषक तत्वांचे शोषण वाढवते, वातावरणातील कार्बन आणि मातीचे आरोग्य सुधारते.

वापरण्याचे प्रमाण:

 • लागवडीच्या वेळी 50 मिली/100 लिटर पाणी
 • वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (फुटव्यांची अवस्था) लागवडीनंतर @1 ते 2 महिन्यांनी 100 मिली/एकर
 • वाढीच्या सुरुवातीच्या टप्प्यात (कांडी निर्मितीची सुरुवात) लागवडीनंतर @3 ते 5 महिन्यांनी 120 मिली/एकर
 • परिपक्वतेच्या अवस्थेत @10 ते 12 महिन्यांनी किंवा कापणीपूर्वीच्या शेवटच्या महिन्यात 120 मिली/एकर
47 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ