पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
24 Nov
Follow

देहात कंपनीचे गव्हाचे DWS 555 लागवडीसाठी सर्वोत्कृष्ट वाण - श्री. निखिल मुरुमकार

गव्हाच्या चांगल्या उत्पादनासाठी काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगांसारख्या रोगांप्रति सहनशील असणारे, आकर्षक कणीसे असणारे असे देहातचे DWS 555 वाण सर्वोत्कृष्ट असून त्याची लागवड सर्वांनी करावी, असा सल्ला देहातचे अकोला जिल्हा विस्तार प्रमुख श्री. निखिल मुरुमकार यांनी अकोल्यातील महतोडी येथील आदित्य कृषी सेवा केंद्र येथे आयोजित केलेल्या बैठकीत शेतकऱ्यांना दिला.

देहात कंपनीच्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठीची विशेष बैठक, अकोल्यातील महतोडी येथील आदित्य कृषी सेवा केंद्र येथे आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यक्रमाला महतोडी येथील शेतकरी बांधवांनी उपस्थिती दर्शवली. सदर कार्यक्रमात भरघोस व दर्जेदार उत्पन्न देणाऱ्या गव्हाच्या DWS 555 या वाणाबद्दलची माहिती तसेच, देहातच्या सेवा, पशु खाद्य, न्यूट्रीवन उत्पादन, पीक संरक्षण याबद्दलची देखील माहिती दिली.

DWS - 555:

  • झाडाची उंची: 98-105 सेमी
  • प्रतिकूल परिस्थितीत पडण्यास सहनशील वनस्पती
  • उच्च उत्पन्न
  • आकर्षक कणीसे
  • 1000 धान्यांचे वजन: 46 ग्रॅम
  • काळा गंज, कर्नाल बंट आणि ब्लाइट रोगां प्रति सहनशील
  • पेरणीची वेळ: 10 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर दरम्यान

बियाणे दर: 40 किलो/एकर


41 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ