पोस्ट विवरण
सुने
देहात उत्पाद
देहात महाराष्ट्र
DeHaat Channel
2 Feb
Follow

देहातचे न्यूट्रीवन बूस्ट मास्टर वनस्पतिवृद्धीसाठी उत्पादन कमाल - श्री. प्रमोद मुरारी

देहातचे न्यूट्रीवन बूस्ट मास्टर वनस्पतिवृद्धीसाठी उत्पादन कमाल - श्री. प्रमोद मुरारी

देहातचे बूस्ट मास्टर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असून त्याचा वापर जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन तमनर आखाडा, ता. राहुरी, जि. अहमदनगर येथे आयोजित "देहात चौपाल" या विशेष कार्यक्रमात देहातचे राष्ट्रीय विस्तार प्रमुख श्री प्रमोद मुरारी यांनी केले.

राहुरी तालुक्यातील कृषीधन ऍग्रो एजन्सी येथे हा :देहात चौपाल" कार्यक्रम आयोजित करण्यात आला होते. श्री. मुरारी यांनी यावेळी बूस्ट मास्टरचा उत्पादनवाढीसाठी होणारा वापर आणि त्यामुळे वाढणारे उत्पन्न यासोबतच खुराक ८००० आणि वेटनोकल गोल्ड या उत्पादनांविषयी आणि त्यांच्या वापराविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. देहातचे अहमदनगर जिल्हा विक्री अधिकारी श्री सुजित भोसले यांनी देहात किसान अप्लिकेशन विषयी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन केले. तसेच या विशेष कार्यक्रमाला देहातचे राष्ट्रीय विस्तार प्रमुख श्री प्रमोद मुरारी आणि पीक विशेषतज्ञ श्री विजयकुमार गायकवाड, श्री सचिन सर्जे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शविली.

बूस्ट मास्टर चा वापर:

- याच्या वापरामुळे झाडाची वनस्पतिवृद्धी वाढते.

- यामुळे झाडांना मातीतील पोषकद्रव्ये शोषण्यास मदत होते.

- हे अजैविक ताण कमी करण्यास मदत करते आणि वनस्पतींमध्ये पोषक तत्वांचे प्रभावी वितरण वाढवते.

- हे झाडांच्या रंग आणि वाढीस प्रोत्साहन देते.

खुराक 8000:

- 15-20 लिटर दूध देणाऱ्या जनावरांसाठी योग्य

- 24% प्रथिने आणि 4.75% फॅटने समृद्ध

वापरण्याचे प्रमाण: 350 ग्रॅम / लिटर दूध उत्पादन

वेटनोकल गोल्ड:

- जनावरांच्या शरीरातील कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यास उपयुक्त

- दूध उत्पादनात वाढ

- दात आणि हाडे मजबूत होतात

वापरण्याचे प्रमाण: 10 मिली प्रति लिटर दूध किंवा 100 ग्रॅम प्रति दिन


30 Likes
Like
Comment
Share
फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ

फसल चिकित्सक से मुफ़्त सलाह पाएँ